Indian Gooseberry Benefits :”बाजारात किंवा तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे असे एक फळ आहे जे फक्त ५ रुपयांना मिळते पण त्याचे किमान ५० फायदे आहे” असे मत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. माधव वाधवान यांनी भारतातील सर्वात प्राचीन सुपरफूडबाबत आपल्या इंस्टाग्राम व्हिडीओबाबत व्यक्त केले.
या फळाचे पोषण मुल्याबाबत सांगताना ते म्हणाले की, यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे २० संत्र्याइतके आहे. या फळात फायबर्स आहेत जे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. हे कोलेस्ट्रोल आणि ब्लड शुगर कमी करते. तसेच यात अँन्टीऑक्सिडंट आहे ज्यामध्ये गॅलिक अॅसिड, एलॅजिक अॅसिड आणि फ्लॅवोनाईड्स. हे सर्व घटक तुमच्या आतड्याचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करते.
तसेच ते पुढे म्हणाले की, “या फळात असलेले फायबर हे आतड्यातील जीवांनूचे अन्न म्हणून उपयोगी ठरते, तसेच यामुळे बद्धकोष्टतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते. मग हे छोटसं फळ ज्याचे इतके फायदे आहेत ते आपण का खात नाही? पण या फळाचे नाव काय आहे? – आवळा. रोज दोन आवळे खाल्यास तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये फरक जाणवले. “
आयुर्वेदामध्ये आणि पारंपारिक आहारामध्ये आवळ्याला (Indian gooseberry) महत्त्व असले तरी हा विज्ञानानुसार दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे समजून घेतले पाहिजे.
आवळ्याबाबत द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना ब्लुम क्लिनिकच्या आयुर्वेदतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ डॉ. अंजना कालिया यांनी सांगितले की,” या फळाला मिळणाऱ्या महत्त्वास ते खरंच पात्र आहे पण काही महत्त्वाच्या गोष्टी देखील लक्षात घ्यायला हव्यात.
आवळा खरंच आतडे आणि यकृताचे आरोग्य सुधारू शकते का? (Can amla really improve liver and gut health?)
डॉ. कालिया यांच्या मध्ये, “आवळ्याच्या फायद्यांना पाठिंबा देणारे वैज्ञानिक पुरावे वाढत आहे पण; तरीही त्याकडे स्वतंत्र उपचार म्हणून न पाहता, पुरक अन्न म्हणून पाहिले पाहिजे.”
आतडे आणि यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळा फायदेशीर आहेत हे सांगणाऱ्या अभ्यासांमध्ये वाढ होत आहे पण उपलब्ध पुरावे हे आवळ्याला स्वतंत्र उपचार म्हणून वापरण्यापेक्षा, पुरक अन्न म्हणून वापरण्यावर भर देणारे आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या मते, हे फळ जे अँटीऑक्सिडंटने, विशेषत: व्हिटॅमिन सी आणि फॉलीफेनॉल्सने समृद्ध आहे ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दाह किंवा सूज कमी करण्यास मदत करू शकते. ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दाह किंवा सूज हे दोन घटक फॅटी लिव्हर आजार आणि यकृताला होणारी इजा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
आवळ्यामध्ये फायबर आणि बायोअॅक्टिव्ह संयूगेदेखील असतात जे पचनक्रिया सुलभ करण्यास आणि आतड्यातील जीवांनूच्या वाढीस फायदेशीर ठरते असेही त्यांनी सांगितले.
तरीही डॉ. कालिया यांनी असा इशारा दिला की, आतापर्यंत करण्यात आलेल्या बहुतेक अभ्यासांमध्ये सहभागींचे गट तुलनेने लहान होते. मोठ्या मानवी गटांवर क्लिनिकल चाचण्यांची अजूनही गरज आहे. निरोगी आहार पद्धतीचा भाग म्हणून तुमच्या रोजच्या आहारात एक ते दोन ताजे आवळे समाविष्ट केले जाऊ शकतात, परंतु यकृत किंवा पचनसंस्थेच्या विकारांवरील वैद्यकीय उपचारांची जागा ते घेऊ नयेत.”
आवळा पौष्टिक कशामुळे होतो? (What makes amla so nutritious?)
व्हिटॅमिन सी हे शरीरातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यासाठी यकृताचे संरक्षण करणाऱ्यां पेशींना मदत करते. त्याबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. असे डॉ. कालिया यांनी सांगितले.
त्या सांगतात की, आवळ्यातील पॉलिफेनॉन्स आणि इतर अॅन्टिऑक्सिडंट संयूगे देखील शरीरात गंभीर आणि दीर्घकाळापासून असलेले दाह किंवा सूज (chronic inflammation) कमी करण्यास मदत करते. शरीरात गंभीर आणि दीर्घकाळापासून असलेले दाह किंवा सूज (chronic inflammation) हे यकृतांच्या आजार विकसित होण्यास कारणीभूत ठरते.
या फळात नैसर्गिकरित्या फायबरचे प्रमाणही जास्त असते. हे फायबर आतड्याची नियमित हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करते, पचनक्रिया सुधारते आणि आतडयातील जीवानूंचे अन्न म्हणून प्रीबायटिक सारखेकार्य करते, आतड्यांत निरोगी सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत करते,असेही त्यांनी सांगितले.
डॉ. कालिया यांच्यामते, पोषक तत्वे एकत्रितपणे पचनक्रियेस आणि संपूर्ण पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत करतात.
आवळा कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कमी करतू शकते का?(Can amla lower cholesterol and blood sugar?)
नियमितपणे आवळा खाल्यास LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यास मदत करते, त्याचबरोबर HDLम्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी देखील चांगली वाढवते. आवळ्यातील ऑक्सिटंड संयुगे इन्सिलून सेन्सिटिव्हिटी सुधारतात आणि उपाशीपोटी ब्लड शुगरची पातळी कमी करण्यास मदत करते.
हे फायदे विशेषतः खालील लोकांसाठी लागू आहेत:
प्रीडायबिटीज(Prediabetes)
टायप २ मधूमेह (Type 2 diabetes)
मेटाबोलिक सिंड्रोम (Metabolic syndrome)
कोलेस्ट्रॉलची पातळी किंचित वाढलेली (Mildly elevated cholesterol levels)
मात्र, त्या यावर जोर देतात की “आवळ्याकडे निरोगी जीवनशैलीला पूरक म्हणून पाहिले पाहिजे, सिद्ध झालेल्या उपचारांना पर्याय म्हणून नव्हे.”
“आवळाचा वापर उपचार म्हणून नव्हे, तर एक पूरक कार्यात्मक अन्न म्हणून केला पाहिजे. तो डॉक्टरांनी सांगितलेली औषधे किंवा संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल यांसारख्या जीवनशैलीतील बदलांना पर्याय नाही,” असे त्या म्हणतात.
मधुमेहाची औषधे घेणाऱ्या लोकांनाही त्या सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. “मधुमेहाची औषधे घेणाऱ्यांनी त्यांच्या ब्लड शुगरवर लक्ष ठेवावे, कारण आवळा या औषधांचा ग्लुकोज कमी करण्याचा परिणाम वाढवू शकतो,” असे डॉ. कालिया नमूद करतात.
टीप: हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही नित्यक्रम सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्या.
