EY Employee Death : कामाच्या तणावामुळे एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. बिग फोर अकाउंटिंग आणि कन्सल्टिंग फर्मपैकी एक असणाऱ्या अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) मध्ये काम करणारी अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिलचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्यचा दावा तिच्या आईने केला आहे. ईवाय कंपनीचे चेअरमन राजीव मेमाणी यांना तिच्या आईने पत्र लिहिले. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी गुरुवारी सांगितले की, “कामगार मंत्रालयाने तक्रारीची दखल घेतली आहे आणि कामाच्या ठिकाणी असुरक्षित आणि त्रासदायक वातावरणाचा आरोपांबाबत सखोल चौकशी सुरु केली आहे.

या तरुणीच्या आईने लिहिलेले हृदयद्रावक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकारणाची चौकशी सुरु झाली. अ‍ॅना हिची आई अनिता ऑगस्टिन यांनी आपल्या पत्रात आपल्या मुलीवर कामाच्या अतिताणाचा कसा परिणाम झाला यावर प्रकाश टाकला आहे. २० जुलै रोजी तिच्या मृत्यू झाला आणि तिच्या या दुःखद मृत्यूला कामाचा ताण कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी कंपनीच्या या नवीन वातावरणाबाबत आणि इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरील संभाव्य परिणामाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

Orbito tripsy treatment of 86 year old man with heart problem was successful Pune news
हृदयविकारावर ८६ वर्षीय वृद्धाची मात! ऑरबिटो-ट्रिप्सी उपचार प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
Success Story Dr Syed Sabahat Azim
Success Story : वडिलांच्या निधनामुळे सोडलं आयएएस पद; ३० खाटा टाकून सुरू केली आरोग्य सेवा; वाचा अझीम यांची यशोगाथा
Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

आजच्या वेगवान जगात कामाच्या ताणामुळे बऱ्याच कर्मचाऱ्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे नुकसान होत आहे. त्यांना दिलेल्या मुदतीमध्ये (डेडलाईनमध्ये) काम पूर्ण करण्यासाठी आणि लक्ष्य(टार्गेट) साध्य करण्यासाठी अतिताणाचा सामना करावा लागतो. दीर्घकाळ काम करणे हे कर्मचऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्रासदायक ठरते. बराच काळ अतितणावाचा सामना केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

एखाद्याच्या शरीरावर आणि मनावर अतिताणाचे तात्काळ परिणाम काय होतात?

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राकेश गुप्ता याबाबत दी इंडियन एक्स्पेसला माहिती देताना सांगितले की “तुमचे शरीर तुम्हाला तणावावर त्वरीत प्रतिक्रिया देण्यास मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जेव्हा हा प्रतिसाद बऱ्याचदा ट्रिगर केला जातो (जसे की कामाच्या तीव्र ताणामुळे), ते आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. कॉर्टिसॉल आणि एड्रेनालाईन सारखे तणाव वाढवणारे हॉर्मोन्स बाहेर पडतात. हे हॉर्मोन्स हृदयाची गती, रक्तदाब आणि श्वासोच्छवासाची गती वाढवतात.

कालांतराने ही सतत सतर्कतेची स्थिती सामान्य शारीरिक कार्यावरही परिणाम करते, ज्यामुळे डोकेदुखी, स्नायूंवर ताण, पचन समस्या आणि झोपेचे विकार होतात. मानसिकदृष्ट्या व्यक्तींची चिंता वाढते, चिडचिड होते आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते, ज्यामुळे उत्पादकता कमी होते.

हेही वाचा – इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

दीर्घकालीन आरोग्य धोके काय आहेत? (What are the long-term health risks?)

नोएडा एक्स्टेंशन येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मानसोपचार विभागाचे सल्लागार, डॉ सरस प्रसाद यांनी याबाबत दी इंडियन एक्स्पेसला माहिती देताना चेतावणी दिली की,”जेव्हा कामाचा अतिताण येतो तेव्हा त्याचे गंभीर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. सततच्या तणावामुळे नैराश्य, चिंता आणि बर्नआउट यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या मानसिक आरोग्य समस्यांकडे लक्ष न दिल्यास आत्महत्येच्या विचारांसारख्या गंभीर परिस्थितींमध्ये वाढ होऊ शकते.”

नोएडा एक्स्टेंशन येथील यथार्थ हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ निशांत सिंग यांनी याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की,”दीर्घकाळापर्यंत कामाशी संबंधित ताण हायपोथॅलेमिक-पिट्यूटरी-ॲड्रेनल (HPA) अ‍ॅक्सिस(axis) आणि सीमपथेटिक नर्व्हस सिस्टम (sympathetic nervous system)सक्रिय करते, ज्यामुळे कोर्टिसोल आणि कॅटेकोलामाइन्समध्ये (तणाव वाढवणारे हार्मोन्स) सतत वाढ होते. यामुळे उच्च रक्तदाब, हृद्याचे ठोक्यांचा वेग असमान्यपणे वाढणे (tachycardia) आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी ताण वाढू शकतो.

हेही वाचा – तुमच्या मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा….

डॉ कुमार म्हणाले की,” तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तुमचे शरीर कमकुवत होते, त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते आणि अकाली वृद्धत्व वाढवते.

अतिताण प्राणघातक ठरू शकतो का?

डॉ कुमार म्हणाले की, “दीर्घकाळापर्यंत कामाशी संबंधित ताण घातक ठरू शकतो. उच्च रक्तदाब आणि हृदय गती वाढल्याने हृदयविकाराच्या घटना घडू शकतात.”

“हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या गंभीर घटना, जसे की मायोकार्डियल इन्फेक्शन ( myocardial infarction) किंवा स्ट्रोक हे दीर्घकालीन तणावामुळे उद्भवू शकतात आणि ते प्राणघातक असू शकतात “असे डॉ सिंग यांनी सांगितले.

अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये, तणावामुळे उद्भवणारे मानसिक आरोग्य समस्या, जसे की गंभीर नैराश्य किंवा आत्महत्येची प्रवृत्ती प्राणघातक ठरू शकते.

हेही वाचा – तुम्ही रोज किती पाणी पिता? तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्याची योग्य पद्धत जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनी कशी मदत करू शकते?

मानह वेलनेसच्या क्लिनिकल डायरेक्टर एक्सलन्स आणि मुख्य मानसशास्त्रज्ञ देबस्मिता सिन्हा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, कर्मचाऱ्याच्या मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय पावले उचलावी हे सुचवले आहे.

  • टीम लीडर्स आणि मॅनेजर्स यांनी त्यांच्या वर्तनामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल संवेदनशील असणे आवश्यक आहे.
  • तरुण कर्मचाऱ्यांना त्यांच्या कल्याणाच्या गरजा स्पष्ट करण्यासाठी एक व्यासपीठ दिले जावे, जिथे त्यांचे मत ऐकले जाईल आणि त्याबाबत मॅनेजमेंटने आवश्यक कारवाई केली पाहिजे
  • मदतीसाठी आपात्कालिन तज्ज्ञांचे नंबर दिले पाहिजे आणि त्याबाबत कर्मचाऱ्यांना जागरुक केले पाहिजे.
  • सर्व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा आणि मानसिक क्षमतेबद्दल माहिती द्या, ज्यामध्ये त्रासाची चिन्हे ओळखणे आणि वेळेत उपाय करणे समाविष्ट आहे.
  • आरोग्यदायी सवयी निर्माण करण्यासाठी कामाचा ताण कमी करणाऱ्या गोष्टींचा समावेश करा.
  • सर्वांची भावनात्मक किंवा मानसिक त्रासाची चिन्हे ओळखण्याची क्षमता वाढवा.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित सर्वेक्षण घेऊन लोकांचे म्हणणे ऐकले पाहिजे.