अलीकडच्या काळात आयुर्वेदातील औषधी वनस्पतींचे अनेक फायदे आपल्यासमोर विज्ञानाच्या माध्यमातून समोर येत आहेत. अश्वगंधा महिलांच्या बरोबरीने पुरुषांना सुद्धा अनेक गोष्टीत वरदान ठरत आहे. माणसासाठी अश्वगंधा अमृतापेक्षा कमी नाही. कोविड काळामध्ये अश्वगंधाचा खूप वापर झाला होता. अश्वगंधा म्हणजे काय?अश्वगंधा हा अॅडाप्टोजेन नावाच्या वनस्पतींच्या वर्गाचा एक भाग आहे जो चहा, पावडर, टिंचर आणि पूरक आहार म्हणून किंवा त्यांच्या कच्च्या स्वरूपात सेवन केल्यास त्यांच्या आरोग्याच्या फायद्यांसाठी ओळखला जातो. भारतीय जिनसेंग, हिवाळी चेरी किंवा त्याच्या वैज्ञानिक नावाने विथानिया सोम्निफेरा म्हणून देखील ओळखले जाते, अश्वगंधा एक हर्बल झुडूप आहे ज्याची मुळे आणि बेरी त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरली जातात. अश्वगंधा ही एक बिनविषारी औषधी वनस्पती आहे जी तणाव आणि चिंता नियंत्रित करण्याच्या क्षमतेसाठी अमेरिकेत लक्ष वेधून घेत आहे. ही औषधी वनस्पती शतकानुशतके जुन्या आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अश्वगंधाचा (Ashwagandha) शरीराला पिळदार वळण देण्यासाठी व आकर्षक करण्यासाठीसुद्धा उपयोगात आणली जात आहे. अश्वगंधाचे औषधी गुणधर्म असल्याने आता अनेक औषधांमध्ये सुद्धा अश्वगंधाचा वापर केला जातो. अश्वगंधाला सामान्यतः रोगप्रतिकारक शक्तीवर्धक म्हणून मान्यता मिळाली आहे. स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त शरीरातील चरबी कमी करण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरते. अश्वगंधा शरीरातील साखरेची पातळी कमी करून मधुमेहापासून सरंक्षण करते. अश्वगंधा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात सुद्धा मदत करते. अश्वगंधाचा तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो. आणखी वाचा: Health Special: लोणची चवदार, पण प्रमाणातच, अन्यथा… अश्वगंधात आयुर्वेदिक औषधीचे बरेच घटक असल्याने त्याने शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी तसेच ह्रदयाचे विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा मदत होते. अश्वगंधामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूशी संबंधित दुखापतींमध्येसुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कर्करोगासारख्या गंभीर आजारातसुद्धा अश्वगंधाचा उपयोग त्याच्या पेशींच्या वाढीस थांबवण्यात वापरण्यात येते. अश्वगंधाचे पुरुषांना फायदेशरीरातील जिवंतपणा टिकवून ठेवण्यात अश्वगंधाचा खूप मोठा फायदा पुरुषांना होऊ शकतो. त्याबरोबरंच पुरुषांमध्ये जर टेस्टेरॉनचे प्रमाण कमी असेल व त्यामुळे ते जर लैंगिक समस्यांना सामोरे जात असतील तर अश्वगंधा हे त्यासाठी बूस्टर ठरू शकते. वाढत्या वयामुळे पुरुषांमध्ये टेस्टोरॉनचे प्रमाण कमी होऊ शकते. पुरुषांची ऊर्जा सुद्धा कमी होऊ शकते. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने पुरुषांच्या टेस्टोरॉनची पातळी सुधारून पुरुषांना लैंगिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. पुरुषांना मानसिक तणावांमुळेसुद्धा अनेक गंभीर आजारांना सामोरे जावं लागते. पुरुषांच्या असलेल्या लैंगिक समस्येत 'इरेक्टाइल डिसफंक्शन' हा एक महत्वाचा आजार आहे. पुरुषांमध्ये होणाऱ्या या आजारामुळे पुरुषांना अनेक वेळा नैराश्याला सामोरे जावं लागतं आणि त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. पुरुषांमध्ये आढळणारी कारणे ही मानसिक आरोग्य व्यवस्थित नसण्याची लक्षणे आहेत. यासर्व गोष्टीत अश्वगंधा पुरुषांना वरदान म्हणून लाभदायी ठरते. आणखी वाचा: Health special: निरोगी आयुष्यासाठी मीठ किती खावे? पुरुषांमध्ये अनेक वेळा तणावामुळे किंवा जेनेटिक कारणांमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची कमी होते, त्यामुळे पुरुषांचे वंध्यत्व तसेच लैंगिक कार्यावर त्याचा खूप परिणाम होतो. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने पुरुषांचे वंध्यत्व सुधारण्यात खूप फायदा होऊन त्यांचे लैंगिक कार्यसुद्धा पूर्ववत साधारण होण्यास मदत होते. अश्वगंधामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढून त्याची गतिशीलता सुद्धा वाढते हे वैद्यकीय अभ्यासाने आता मान्य केले आहे. अश्वगंधाचे महिलांसाठी फायदे महिलांना अनेक कारणांमुळे मासिक पाळीचे अनेक त्रास होतात. मासिक पाळीच्या अनियमिततेने महिलांमध्ये डोकेदुखी, झोपेच्या समस्या, अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात. संशोधकांनी केलेल्या संशोधनात अश्वगंधाच्या नियमित सेवनाने महिलांना त्यांचे मासिक पाळीची नियमितता सुधारण्यात मदत होते. तसेच मासिक पाळीच्या अनियमिततामुळे त्यांना होणाऱ्या समस्येवर सुद्धा अश्वगंधामुळे फायदा होतो. महिलांमध्ये सुद्धा पुरुषांप्रमाणे अनेक लैंगिक आजार असतात. त्यातील कामवासना, कामोत्तेजनाचा अभाव, लैंगिक संबंधांवेळी असाधारण त्रास, वंध्यत्व, प्रजनन क्षमतेची कमी अश्या अनेक समस्यांवर अश्वगंधा हे अतिशय प्रभावी औषध म्हणून काम करते. महिलांसाठी अश्वगंधा हे एक अमृत रसायन म्हणून काम करते. अश्वगंधाचे 7 आरोग्यदायी फायदे१. तणाव आणि चिंता दूर करते२. रक्तातील साखर आणि चरबी कमी करते३. स्नायू आणि सामर्थ्य वाढवते४..मेंदूला शक्ती देते. ५. हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते६. वीर्य पुस्ती करते. हे औषध वीर्यविकार नाशक आहे७. मेदोहर आहे. दररोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ १-१ अश्वगंधाच्या पानाला हाताने कुस्करून गोळी बनवून जेवायच्या आधी रिकाम्या पोटी पाण्याबरोबर गिळा. हल्ली तर अशवगंधाच्या गोळ्या बाजारात मिळतात. याचे नियमित सेवन करत असता त्याबरोबर फळे, भाज्या, ताक यावर राहून वजन कमी करता येते. अश्वगंधाचे काही दुष्परिणाम आहेत का?अश्वगंधाच्या दुष्परिणामांमध्ये बद्धकोष्ठता, अनुनासिक रक्तस्त्राव, खोकला, तंद्री आणि भूक न लागणे यांचा समावेश असू शकतो. ही लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात. आपण आपल्या निरोगीपणाच्या आहारात अश्वगंधा जोडण्याचा विचार करीत असल्यास, प्रथम आपल्या डॉक्टरशी आपल्या प्रकृती स्वरूपाबाबत चर्चा करून त्यानुसार मात्र घ्यावी.