Ayurveda doctor advice consume roasted garlic in ghee gives amazing benefits in winter season | Loksatta

तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही

लसूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुपात तळून खाल्ल्यास शरीराला दुहेरी फायदा होतो. लसूण तुपात भाजून खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
photo(freepik)

Roasted Garlic Benefits: लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लसणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.

हृदयासाठी चांगले आहे

लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

श्वसनासंबंधित रोग चांगले होतात

लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.

( हे ही वाचा: पालक आणि पनीर एकत्र चुकूनही खाऊ नका, नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम)

पचनासाठी चांगले

लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.

प्रतिकारशक्ती वाढते

तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.

( हे ही वाचा: ‘या’ ब्लड ग्रुपला असतो हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! यात तुमचा तर सहभाग नाही ना? जाणून घ्या)

हाडे मजबूत होतात

लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 20:39 IST
Next Story
Period Rashes Tips: मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्समुळे येणाऱ्या रॅशेसने त्रस्त आहात? ‘अशी’ करा सुटका; मिळेल त्वरित आराम