Wrong Food Combinations with Milk: आपण अनेकदा चांगल्या चवीसाठी दोन किंवा अधिक खाद्यपदार्थ एकमेकांत मिसळतो. पण काही पदार्थ एकत्र मिसळून खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? यामुळे तुमच्या ओटीपोटात दुखणे, सूज येणे, थकवा येणे, गॅस आणि अस्वस्थता होऊ शकते. जर तुम्ही याचे जास्त वेळ सेवन केले तर त्यामुळे त्वचेवर पुरळ, पाचन समस्या आणि श्वासाची दुर्गंधी येऊ शकते.

फूड कॉम्बिनेशनबद्दल बोलायचे झाले तर आपण अनेकदा दूध इतर पदार्थांसोबत मिसळून पितो. दूध हा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात सामान्य आणि महत्त्वाचा पदार्थ आहे. तुम्हाला माहित आहे की दूध हे स्वतःच एक अन्न आहे आणि ते काही खाद्यपदार्थांमध्ये मिसळता नये? दूध हे प्राण्यापासून मिळणारे प्रोटीन आहे जे इतर प्रोटीन पदार्थांमध्ये मिसळू नये. चला जाणून घेऊया कोणते ५ खाद्यपदार्थ ज्यासोबत दुधाचे सेवन चुकूनही करू नये…

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

( हे ही वाचा: Mouth Ulcer: तोंडात फोड आल्याने खाणं अवघड झालंय? ‘हे’ घरगुती आराम देतील चटकन आराम)

आंबट पदार्थ आणि दूध

हेल्थ लाईनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार दुधामध्ये साइट्रस किंवा आम्लयुक्त पदार्थ मिसळू नयेत. हेल्थ लाइननुसार, व्हिटॅमिन सी समृद्ध फळे दुधात मिसळू नयेत. दूध पचायला जास्त वेळ लागतो आणि दूध आणि लिंबू किंवा कोणतेही साइट्रस फळ एकत्र मिसळल्यास दूध घट्ट होते. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. काही लोकांना लॅक्टोजची देखील समस्या असते, याचा अर्थ ते दुधातील लैक्टोज पचवू शकत नाहीत.

केळी आणि दूध

हेल्थ लाईननुसार दूध आणि केळीचे मिश्रण जड असते आणि ते पचायला खूप वेळ लागतो. अन्न पचत असताना तुम्हाला थकवा जाणवेल. जर केळी मिल्कशेक पित असाल, तर पचन सुधारण्यासाठी त्यात चिमूटभर दालचिनी किंवा जायफळ पावडर घाला.

( हे ही वाचा: भाताचे सेवन ‘या’ तीन आजारांवर विषासमान परिणाम करते; वेळीच जाणून घ्या..)

मुळा आणि दूध

मुळा आणि दूध यांचे साधारणपणे कोणतेही मोठे दुष्परिणाम होत नाहीत. मात्र जेवणापूर्वी त्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यांच्या गरमीमुळे पोटात जळजळ होऊ शकते. आयुर्वेदानुसार मुळा खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये.

मासे आणि दूध

दुधाचा थंड प्रभाव असतो तर दुसरीकडे माशांचा गरम प्रभाव असतो. हे कॉम्बिनेशन असंतुलन निर्माण करते ज्यामुळे शरीरात रासायनिक बदल होऊ शकतात. डॉ. प्रीतम मून, सल्लागार फिजिशियन, मुंबई यांच्या मते , “मासे आणि कोणत्याही प्रकारचे मांस दुधासोबत कधीही खाऊ नये, कारण यामुळे पचनाच्या समस्या आणि जडपणा देखील येऊ शकतो.” म्हणून सावध रहा. अन्यथा, या मोठ्या चुकीचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो.

( हे ही वाचा: Uric Acid: युरिक अॅसिडने बॉर्डर लाइन पार केलीय? तर आजच खायचे सोडा ‘हे’ ५ पदार्थ)

दूध आणि दही

दही दुधात मिसळू नये. आयुर्वेदानुसार, कोणतेही आंबवलेले पदार्थ दुधात मिसळू नये कारण ते शरीरातील वाहिन्या किंवा स्रोटास (Channels or Srotas) अवरोधित करू शकतात. याशिवाय आयुर्वेदानुसार दूध आणि दही दोन्ही एकत्र खाल्ल्याने कफ वाढतो आणि पचनावरही परिणाम होतो.