scorecardresearch

Premium

नवजात चिमुकलीची बोटं बघून कुटुंबाला आश्चर्याचा धक्का! ‘पॉलीडॅक्टिली’ स्थिती व त्याचे उपचार काय?

Rare Birth Condition: बाळाची आई, सरजू देवी (२५ वर्ष) हिने आठव्या महिन्यात बाळाला जन्म दिला. पण नवजात बाळाचे हात पाय पाहून कुटुंब चकित झालं आणि चक्क तिची पूजा करू लागलं, नंतर डॉक्टरांनी सांगितलं की..

Baby Girl With 26 Fingers and Toes Family Shocked Started Worshipping Doctor Explain Polydactyly Condition Signs Treatment
पॉलीडॅक्टिली म्हणजे काय? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Baby Girl With 26 Fingers: अलीकडेच उघडकीस आलेल्या एका विचित्र घटनेत एका चिमुकलीला जन्मतःच २६ बोटं असल्याचे समजतेय. राजस्थानमधील या चिमुकलीच्या हाताला (प्रत्येकी) सात अशी चौदा बोटं तर पायाला (प्रत्येकी) सहा अशी बारा बोटं आहेत. चिमुकलीच्या जन्मानंतर तिच्या कुटुंबीयांनी व आजूबाजूच्या लोकांनी तिला देवीचा अवतार समजून पुजायला सुरुवात केली. पण ही वैद्यकीय स्थिती असून त्याला ‘पॉलीडॅक्टिली’ असे म्हणतात अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, बाळाची आई, सरजू देवी (२५ वर्ष) हिने आठव्या महिन्यात बाळाला जन्म दिला. २६ बोटांची चिमुकली या दुर्मिळ अनुवांशिक स्थितीतही पूर्णपणे निरोगी आहे. ही स्थिती नेमकी कशामुळे उद्भवते व त्यावर उपचार काय याविषयी इंडियन एक्सप्रेसने डॉक्टरांशी संवाद साधला आहे. आपणही ही स्थिती समजून घेऊया..

पॉलीडॅक्टिली म्हणजे काय?

डॉ प्रीथिका शेट्टी, सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ, आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे यांनी सांगितले की, अशी स्थिती मुळात अनुवांशिक असते आणि त्याची तीव्रता व्यक्तिपरत्वे कमी जास्त होऊ शकते. यामुळे काही प्रकरणात एखादे बोट अधिक असते तर काहींना एकाहून अधिक बोटं असू शकतात. हात व पायाच्या बोटांवर या स्थितीचा प्रभाव होऊ शकतो.डॉ शोभा गुप्ता, वैद्यकीय संचालक आणि IVF विशेषज्ञ, मदर्स लॅप IVF सेंटर नवी दिल्ली, यांनी सांगितले की, केवळ मानवच नव्हे तर प्राण्यांच्या प्रजातींमध्ये सुद्धा पॉलीडॅक्टीली असू शकते.

minor raped half naked and bleeding viral video
“फाशी द्या किंवा गोळ्या घाला”, उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची मागणी
suriya visited fans home who died in road accident
चाहत्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच अभिनेता सूर्याने घेतली कुटुंबियांची भेट; पालकांना दिला धीर, Photo Viral
Amroha jail prisoner
तुरुंगात पतीला भेटायला यायची पत्नी, दुसऱ्या कैद्याच्या प्रेमात पडली, सुटकेनंतर दोघेही फरार, संपूर्ण प्रकरण वाचून डोकंच धराल
parents care assets, responsibility children, Section 23 Indian Penal Code
मातापित्यांची मालमत्ता हवी, पण त्यांची जबाबदारी नको?… वृद्ध आई-वडिलांनी हे वाचायलाच हवं!

डॉ. शेट्टी सांगतात की, सामान्यतः, अतिरिक्त बोटांचा आकार कमी असू शकतो आणि वाढही पाच बोटांच्या तुलनेत कमी असू शकते. या बोटांची त्वचा मऊ असते तसेच यामध्ये अनेकदा सांधे किंवा हाडे नसतात. साधारणतः करंगळी किंवा अंगठ्याच्या शेजारी हे अधिकचे बोट असू शकते. भ्रूण जेव्हा त्याच्या आईच्या पोटात वाढत असते, तेव्हा हाताला सुरुवातीला पॅडलसारखी एकच त्वचा तयार होते मग हळूहळू त्यातून बोटं तयार होतात जर या प्रक्रियेत वेळ लागत असेल तर कधीकधी एक बोटाचे दोन भाग होऊन अधिकचे बोट तयार होऊ शकते.

पॉलीडॅक्टिलीची तपासणी कशी केली जाते?

डॉ शेट्टी सांगतात, “अन्य वैद्यकीय सिंड्रोमचा एक भाग म्हणून पॉलीडॅक्टिली होऊ शकतो. बाळाच्या जन्मापूर्वी अल्ट्रासाऊंडद्वारे किंवा जन्मानंतर प्रत्यक्ष पाहिल्यावर पॉलीडॅक्टीलीचे निदान होऊ शकते. यासाठी प्रभावित हात आणि पायाचा एक्स-रे आवश्यक असतो.” तर डॉ गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, “निदान झाल्यावर बाळाच्या ​​​​परिस्थितीनुसार बालरोगतज्ञांकडून उपचार पद्धती ठरवल्या जातात, अतिरिक्त बोटांमुळे समस्या उद्भवल्यास, हे बोट काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करता येऊ शकते”

हे ही वाचा<< सफरचंद सोलून खावे की न सोलता? तुम्ही रोज सफरचंद खायला हवे का? डॉक्टरांनी सांगितलं हेल्थचं गणित

पॉलीडॅक्टिली टाळता येते का?

पॉलीडॅक्टिली टाळणे कठीण आहे कारण ही अनुवांशिक स्थिती आहे. पण, पॉलीडॅक्टिली किंवा इतर अनुवांशिक विकारांचा इतिहास असलेल्या कुटुंबांना समुपदेशनाचा फायदा होऊ शकतो. पॉलीडॅक्टिलीची अनुवांशिक स्थिती असलेल्या काही कुटुंबांसाठी, जन्मपूर्व अनुवांशिक चाचणी फायद्याची असू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Baby girl with 26 fingers and toes family shocked started worshipping doctor explain polydactyly condition signs treatment svs

First published on: 21-09-2023 at 11:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×