Isabgol More Than a Remedy for Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्याने जगभरात अनेक नागरिक त्रस्त आहेत. कोलेस्ट्रॉल हा शरीराचा छुपा शत्रू ठरू शकतो. पण या समस्येबाबत एक चांगली गोष्ट अशी की, डायबिटीज किंवा अन्य गंभीर आजारांसारखा कोलेस्ट्रॉलचा त्रास हा आयुष्यभर टिकणारा नसतो. जर आपण योग्य जीवनशैली व आहाराचे पालन केले तर आपल्याला नक्कीच कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकतो. आज आपण कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी जगभरात ख्यात आयुर्वेदिक उपचारांमधील एक सोपा उपाय पाहणार आहोत. तज्ज्ञांचं माहितीनुसार या एका आयुर्वेदिक पदार्थाचे सेवन केल्यास शौचावाटे खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढून टाकण्यास मदत होऊ शकते.
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार इसबगोल हा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास नामी उपाय ठरू शकतो. अभ्यासक सांगतात की, इसबगोलच्या नियमित व प्रमाणित सेवनाने आतड्यांमध्ये एक बारीक लेयर तयार होतो जो खराब कोलेस्ट्रॉलचे शोषण रोखण्यास मदत करतो.
अलीकडेच नॅशनल लायब्ररी व मेडिसिनमध्ये या संदर्भात एक संशोधन प्रकाशित झाले होते. यानुसार प्रतिनिधींना १२ आठवड्यांसाठी दिवसाला ७ ग्रॅम इसबगोलचे सेवन करण्यास सांगितले होते. यानंतर त्यांच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ८. ७ टक्के कमी होऊन 0.42 mmol/l इतके झाले होते. दुसरीकडे ज्या उमेदवारांनी दिवसाला १०.५ ग्रॅम इसबगोलचे सेवन केले होते त्यांच्यात खराब कोलेस्ट्रॉल ९. ७ टक्के कमी झाले होते. सलग सहा महिन्यांसाठी ज्या प्रतिनिधींनी इसबगोलचे सेवन केले त्यांच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल हे 10.6-13.2 टक्के वरून 7.7-8.9 टक्क्यांपर्यंत आले होते.
कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी इसबगोलचे सेवन कसे कराल?
तुम्ही शरीर सुदृढ ठेवण्यासाठी रोज इसबगोलचे सेवन करू शकता. साधारण एक चमचा इसबगोल गरम पाण्यासह घेतल्याने अनावश्यक घटक व कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर पडण्यास मोठी मदत होऊ शकते. टाइम्सच्या माहितीनुसार, एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला १०- १२ ग्रॅम इसबगोलचे सेवन करायला हवे.
हे ही वाचा<< Cholesterol वाढल्यास पायात दिसून येतात ‘ही’ ३ मोठी लक्षणे; हातातही सतत जाणवतात वेदना
याशिवाय पाणी पिण्याची सवयही शरीरासाठी आवश्यक आहे. शरीरातील अनावश्यक व खराब झालेले घटक लघवी व शौचावाटे बाहेर पडतात पण त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शौचास नियमित जाण्यात कोणतीही टाळाटाळ करू नका.
दरम्यान जर आपल्याला आयुर्वेदिक उपायांनी कोणतीही शारीरिक तक्रार जाणवत असेल तर त्वरित आपल्या वैद्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.