Using Banana Leaves For Eating And Steaming Food : हिरवीगार, लांब केळीची पाने लग्नसमारंभ, बरेच पारंपरिक उत्सव आणि पाककृतींचा अविभाज्य भाग आहेत, असे म्हणायला हरकत नाही. केळीची पाने विशेषतः भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये वापरली जातात. नैवेद्यासाठीसुद्धा केळीच्या पानांचा उपयोग केला जातो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? या सगळ्या गोष्टींसाठी केळीची पाने का वापरली जातात. क्रिश अशोक यांनी त्यांच्या नवीन रील व्हिडीओमध्ये केळीची पाने वापरण्यामागील “विज्ञान” नमूद केलं आहे. केळीच्या पानात काही सुगंधी व आरोग्यदायी पॉलीहेनॉल्स आहेत, जे तुम्ही फक्त केळीच्या पानावर ( Banana Leaves) अन्न वाढून खाल्ल्यावर नाही तर यासाठी तुम्हाला केळीच्या पानात अन्न वाफवून त्याचे सेवन करावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ, डॉक्टर मोनल वेलांगी (पीएचडी) यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, केळीच्या पानांना खूप वेगळी अशी मातीची चव असते आणि त्याच्या पृष्ठभागावर थोडासा मेणासारखा लेप असतो, यामध्ये फायबर सामग्री सुमारे ७२ टक्के असते. त्यामुळे झाडावरून केळीचे पान तोडल्यावर ते लांब पट्ट्यांचे अतूट धाग्यासारखे लेप देते; ज्यामुळे ते चघळणे कठीण जाते.

मानवी शरीरात सेल्युलेजची कमतरता असते, त्यामुळे केळीचे पान पचण्यास कठीण जाऊ शकते. केळीच्या कच्च्या पानात फायबर खूप जास्त प्रमाणात असते ; जे पोट पोट खराब करू शकतात. पण, केळीच्या पानाचे काही आश्चर्यकारक गुणधर्म आहेत, ज्याचा फायदा स्वयंपाक करताना घेता येतो, ते पुढीलप्रमाणे :

हेही वाचा…Masaba Gupta: गरोदरपणात सर्दी, खोकला झाल्यास काय करावं? मसाबा गुप्ताचा ‘हा’ घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

केळीच्या पानांची रचना :

केळीच्या झाडापासून मिळणाऱ्या केळीच्या पानांच्या पृष्ठभागावर मेणासारखा लेप असतो. हे कोटिंग केळीच्या पानांना स्वच्छ करणे सोपे बनवते. केळीची पाने वाफवलेले मोदक, मोमो आणि मासे यांसारखे काही पदार्थ शिजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच ही पद्धत एक आरोग्यदायी स्वयंपाक पर्याय म्हणून ओळखली जाते; विशेषत: गोवा आणि भारतातील पारशी पाककृतींमध्ये हे खूप प्रचलित आहे. अगदी चायनीज पाककृती, मांसाचे काही पदार्थ वाफवण्यासाठी केळीच्या पानांचा वापर करतात. दक्षिण भारतात केळीच्या पानांचा मोठा आकार आणि लवचिक स्वरूपाचा उपयोग घरामध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्यासाठी केला जातो. पण, असं करताना पाने पूर्णपणे स्वच्छ करणे आणि ताजी पाने निवडणे महत्वाचे आहे, असे डॉक्टर मोनल वेलांगी सांगतात.

केळीच्या पानांमध्ये अन्न वाफवल्यावर होणाऱ्या रासायनिक व शारीरिक प्रक्रिया:

डॉक्टर मोनल वेलांगी यांच्या मते, एखादा पदार्थ वाफवताना केळीच्या पानांपासून मिळणारा रस, त्यांच्या गोड मातीचा सुगंध यामुळे अन्नाला एक अनोखा स्वादिष्टपणा येतो. याव्यतिरिक्त, केळीच्या पानातील अर्क अन्नामध्ये प्रवेश करतात. “प्राण्यांवरील संशोधनात केळीच्या पानांच्या अर्काचे (रुटिन) मधुमेहविरोधी उपाय सुचवले आहेत. पण, यावर अजून अभ्यास होणं बाकी आहे; तर केळीच्या पानांमध्ये अन्न वाफवल्यावर किंवा शिजवल्यावर पानांमधून पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्सदेखील बाहेर पडतात, जे अन्नात प्रवेश करतात आणि हे शरीराला अँटिऑक्सिडंट फायदे देतात. हे अँटिऑक्सिडंट्स मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या रोगांपासून दूर ठेवण्यात मदत करू शकतात.

अन्न शिजवताना आणि वाढताना केळीच्या पानांचा वापर करण्यामागील सांस्कृतिक किंवा पारंपरिक कारणे :

संस्कृतमध्ये केळीच्या पानांना ‘कदली’ पाने म्हणतात आणि हिंदू पौराणिक कथांमध्ये ते खूप पवित्र मानले जाते. म्हणून हिंदू धर्मातील वैदिक विधी आणि धार्मिक पूजांसाठी आवश्यक असलेल्या सामग्रीच्या यादीमध्ये केळीची पाने आवर्जून दिसतात. याचा वापर प्रसाद वाटण्यासाठीसुद्धा केला जातो. या प्रथेने शतकानुशतके भारतामध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोन प्रदान केला आहे. अलीकडील हवामान बदलाच्या चिंतेमुळे, केळीच्या पानांचा नैसर्गिक टेबलमॅट्स आणि सर्व्हिंग डिश म्हणून सतत वापर करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे डॉक्टर मोनल वेलांगी म्हणतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banana leaves science very beneficial for your health specific cultural or traditional reasons behind the use of banana leaves must read asp
Show comments