Kidney Sugar Connection :मुत्रपिंड म्हणजे किडनी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करते. पण, किडनीचे कार्य फक्त विषारी घटक फिल्टर करण्यापूरते मर्यादीत नाही. आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी(Blood sugar level) नियंत्रित करण्याचे सर्वात महत्त्वाचे काम देखील किडीन पार पाडते. जेव्हाही ब्लड शुगरबाबत चर्चा होते तेव्हा पँक्रियाज, इन्सुलिन, आहार आणि व्यायाम या गोष्टींची चर्चा होते पण मधुमेह आणि किडनीचा संबध तितकाच महत्त्वाचा आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेह नियंत्रणात नसेल तर किडनीच्या अगदी लहान फिल्टरचे देखील नुकसान होते आणि डायबिटिक नेफ्रोपॅथी सारख्या गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. किडनीमधील रिनल ग्लूकोनियोजेनिसिस प्रक्रियेद्वारे शुगर नियंत्रणात कसे ठेवते?
याबाबत सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह प्रशिक्षक कनिका मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले की,जास्तीत जास्त लोकांनी हे समजून घेतले तर बरे होईल की किडनी फक्त टाकाऊ पदार्थ फिल्टर करत नाही तर रीनल ग्लूकोनियोजेनेसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे ग्लुकोज देखील नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. या प्रक्रियेत किडनीतील उती(टिश्यू) ग्लुकोजची निर्मिती करतात. तसेच किडन ग्लुकोज शोषण्याच्या प्रक्रियेद्वारे फिल्टर केलेली शुगर लघवीवाटे बाहेर जाऊ देण्याऐवजी ते पुन्हा रक्त प्रवाहात सोडते.
मधुमेह आणि किडनीचे कनेक्शन (The connection between diabetes and the kidneys)
हाय ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास किडनीचे फिल्टरिंग यूनिट्स(Nephrons)वर दाब येतो आणि ते कडक किंवा कठिण होऊ लागतात. निरोगी किडनी रक्तातील प्रोटीन (Albumin) ला अडवते पण किडनी खराब झाल्यास हेच प्रोटीन लघवीवाटे शरीरातून बाहेर फेकले जाते. जेव्हा फिल्टर काम करणे बंद करते तेव्हा शरीरात पाणी, मीठ आणि विषारी घटक साचतात.
किडनी ब्लड शुगरला कसे नियंत्रणात ठेवते? (How do the kidneys control blood sugar?)
किडनीमध्ये Renal Gluconeogenesisनावाची प्रक्रिया पार पडते. यामध्ये किडनीतील ऊती गरज पडल्यास ग्लुकोजची निर्मिती करतात. विशेषत: जेव्हा व्यक्ती दिर्घकाळापर्यंत काही खात नाही किंवा उपवास करतो तेव्हा शरीरात रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यासाठी ही प्रक्रिया मदत करते. याशिवाय किडनी रक्त फिल्टर करताना ग्लूकोज देखील फिल्टर करते. सामान्य परिस्थितीमध्ये शरीर या ग्लूकोजला लघवीवाटे बाहेर जाऊ देत नाही. उलट त्यास पुन्हा रक्तामध्ये पोहचवते. यालाच Glucose Reabsorption म्हणजेच ग्लुकोजचे पुन्हा शोषण होते. ही प्रक्रिया SGLT2 (Sodium-Glucose Cotransporter-2) नावाचा वाहक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. मधुमेहावरील काही समस्या या SGLT2 ला टार्गेट करून काम करतात ज्यामुळे अतिरिक्त ग्लूकोज लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते.
किडनी आणि ब्लड शूगरचा संबध एकतर्फी नाही (The relationship between kidneys and blood sugar is not one-sided.)
मधुमेह आणि किडनीचा संबधाबाबत अनेकांना असे मानले जाते की, दिर्घकाळ हाय ब्लड शुगर किडनीला नुकसान पोहचवते. पण, हा संबध एकतर्फी नसतो. किडनी शरीरात इन्सुलिनला तोडण्यासाठी किंवा साफ करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते तेव्हा इन्सुलिन शरीरामध्ये जास्त काळापर्यंत राहू शकते. याशिवाय किडनीची कार्यक्षमतेमध्ये बदल ग्लुकोजला पुन्हा शोषण्याची प्रक्रिया आणि शरीरच्या इन्सुलिन प्रतिक्रिया देखील प्रभावित करतो. म्हणून, किडनीच्या कार्यातील सुरुवातीचे बदल आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण यांच्यात संबंध असू शकतो. पण, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीमध्ये किडनीच्या सौम्य समस्यांमुळे थेट मधुमेह होतो. किडनी आणि ग्लुकोज चयापचय यांच्यातील संबंध गुंतागुंतीचा आहे आणि तो अनेक घटकांवर अवलंबून असतो.
किडनीचे आरोग्य निरोगी आणि मधुमेह नियंत्रणात कसे ठेवावे? (How to keep kidney health healthy and diabetes under control?)
- चांगले किडनी आणि चयापचय आरोग्य राखण्यासाठी काही सवयी उपयुक्त ठरू शकतात, जसे की:
- शरीर नियमितपणे सक्रिय ठेवा. नियमित शारीरिक हालचालींमुळे मधुमेह नियंत्रणात राहतो आणि किडनीचे आरोग्यही राखले जाते.
- आहारात अतिरिक्त मीठ आणि अतिरिक्त सोडियम टाळा. कमी मीठ खाल्ल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते.
- अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करा.
- पुरेसे पाणी प्या, परंतु गरजेपेक्षा जास्त पिण्याचा प्रयत्न करू नका.
- रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
- जर तुम्हाला मधुमेह किंवा किडनीच्या आजाराचा धोका असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या रक्तातील साखर आणि किडनीच्या कार्याची तपासणी करून घ्या.
- तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय उच्च-प्रथिनयुक्त आहार घेऊ नका, विशेषतः जर तुम्हाला किडनीच्या आजाराचा धोका असेल.
टीप: ही माहिती सामान्य आरोग्यविषयक जागृतीसाठी आहे. मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा कोणताही त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे औषध सुरू करू नका. योग्य निदान आणि उपचारांसाठी संबंधित वैद्याचा सल्ला घ्या.
