Bhabhi Ji Ghar Par Hai Star Firoz Khan Dies: अमिताभ बच्चन यांची नक्कल करत विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे फिरोज खान यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले आहे. प्रसिद्धी मालिका भाभी जी घर पर है मधील त्यांची विनोदी भूमिका घरोघरी पोहोचलीहोती . इंडियन एक्सस्प्रेसने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार फिरोज यांना उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे प्राणघातक हृदयविकाराचा झटका आला होता.

डॉ. अमन सलवान, सल्लागार- इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारतात भयंकर उष्णतेची लाट पसरली आहे. अति उष्णतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो अर्थात यात अन्य घटकही कारणीभूत असतात. मात्र उष्णतेमुळे घाम येण्याचे प्रमाण वाढल्याने निर्जलीकरण वाढते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येतो. घामाद्वारे इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान होऊन हृदयाचे कार्य बिघडू शकते. याशिवाय डॉ. सलवान यांच्या मते अतिउष्णतेमुळे हृदयविकारचा धोका वाढण्याची आणखीही कारणे आहेत, ज्याचा प्रभाव खालीलप्रमाणे दिसून येऊ शकतो..

 • वाढलेली हृदय गती: शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी परिश्रम करते, ज्यामुळे हृदयाची गती वाढते व हृदयावर ताण येतो.
 • शारीरिक आणि थर्मल तणाव हृदयाच्या अंतर्निहित स्थितींना वाढवू शकतो.
 • अगोदरच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या असणाऱ्या पुरुषांना अधिक धोका असू शकतो. अतिवजन व कामामुळे येणारा ताण सहन न झाल्याने हृदयावर भार येऊ शकतो.

उष्णतेच्या लाटेत हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमोपचार काय करावे?

डॉ. सलवान सांगतात की, उष्णतेच्या लाटेत हृदयविकाराच्या झटक्यासाठी प्रथमोपचार करताना आधी अति उष्णतेचा शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केला पाहिजे

 • शरीर थंड करणे: व्यक्तीला थंड वातावरणात न्या किंवा शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड, ओले कपडे द्या.
 • हायड्रेशन: जर ती व्यक्ती शुद्धीत असेल आणि पाणी पिण्यास सक्षम असेल तर, निर्जलीकरण टाळण्यासाठी घोटभर पाणी द्या.
 • महत्वाच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवा, कारण उष्णता जलद बदल घडवून आणू शकते.
 • एस्पिरिन द्या आणि आवश्यक असल्यास CPR करा व निरीक्षण चालू ठेवा
 • रुग्ण व मदत करणारे दोघांनीही अतिश्रम टाळावेत अन्यथा याचा आणखी विपरीत परिणाम होऊ शकतो.

डॉ. सलवान यांनी नमूद केले की, भारतात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक कारणांमुळे वाढत चालला आहे जसे की बैठी जीवनशैली, दीर्घकाळापासून चालू असेलेली क्रोनिक आजाराची स्थिती, वृद्धत्व, आधुनिक जीवनातील तणाव, प्रदूषण आणि हानिकारक पदार्थांच्या संपर्कात येण्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

हे ही वाचा<<पाम तेल म्हणजे कचरा नाही, ICMR ने मान्य केले पाम ऑइलचे फायदे; आरोग्यतज्ज्ञांनी सांगितली वापराची योग्य पद्धत

पुरुष व स्त्रियांमध्ये येणारा हृदयविकाराचा झटका कसा वेगळा असतो?

 • कमी वयात पुरुषांना सामान्यतः स्त्रियांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.
 • स्त्रियांना सहसा कमी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे जाणवतात, ज्यामुळे निदान आणि उपचारांना उशीर होतो.
 • स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीदरम्यान इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे धोका वाढतो.
 • स्त्रियांना कमी आक्रमक उपचार आणि हृदयविकाराच्या जोखमीची कमी जाणीव असू शकते.