Ban on Ashwagandha Leaves; Roots Still Permitted : भारतातील अन्नसुरक्षा नियामक भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अलीकडेच अश्वगंधाच्या पानांचा आणि त्यांच्या अर्काचा (extract) वापर पूरक (supplements) आणि न्यूट्रास्युटिकल्समध्ये करण्यावर बंदी घातली आहे. ही कारवाई आयुष मंत्रालयकडून व्यक्त करण्यात आलेल्या सुरक्षाविषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे संपूर्ण अश्वगंधावर बंदी आलेली नसून केवळ विशिष्ट भागाच्या वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

अश्वगंधाच्या पानांवर बंदी; मुळांचा वापर मात्र सुरूच राहणार (Ashwagandha leaves banned; roots to Allowed to used)

एफएसएसएआयच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अश्वगंधाच्या मुळांचा (root) आणि त्यांच्या अर्काचा वापर सप्लिमेंट्स , न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहारासाठी तयार केलेल्या पदार्थांमध्ये करण्यास अद्याप परवानगी आहे. मात्र, अश्वगंधाच्या पानांचा कच्च्या स्वरूपात किंवा अर्क स्वरूपात वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

एफएसएसएआयने स्पष्ट केले की, काही उत्पादक कंपन्या अश्वगंधाच्या पानांचा वापर त्यांच्या उत्पादनांमध्ये करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नियमानुसार परवानगी नसलेल्या वनस्पतींच्या भागांचा वापर करणाऱ्या उत्पादकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश राज्य यंत्रणांना देण्यात आले आहेत. तसेच, सर्व कंपन्यांनी उत्पादनाच्या लेबलवर वापरलेल्या वनस्पतीचा नेमका भाग स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तज्ज्ञांचे पहिले स्पष्टीकरण (Expert View 1)

कन्सल्टंट डायटिशियनगरिमाम गोयल यांनी स्पष्ट केले की, ही बंदी अश्वगंधाच्या त्या भागावर आहे ज्याला अन्न वापरासाठी कधीही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नव्हती. त्यांच्या मते, मुळांचा वापर हा पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीचा मुख्य आधार आहे आणि आधुनिक संशोधन देखील याच भागावर आधारित आहे. त्यामुळे मुळांचा वापर अजूनही पूर्णपणे सुरक्षित आणि वैध आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, उत्पादक कंपन्यांना आता उत्पादनाच्या लेबलवर कोणता वनस्पती भाग वापरला आहे हे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. हे ग्राहकांच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.

अश्वगंधा लोकप्रिय का आहे? (Why Ashwagandha Is Popular)

सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह प्रशिक्षक कनिका मल्होत्रा ​​यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, अश्वगंधा ही आयुर्वेदातील एक महत्त्वाची वनस्पती मानली जाते. गेल्या काही वर्षांत ती ‘अ‍ॅडॅप्टोजेन’ (adaptogen) म्हणून जागतिक स्तरावर लोकप्रिय झाली आहे. शरीरातील ताणतणाव कमी करणे, झोप सुधारण्यास मदत करणे, ऊर्जा वाढवणे आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी तिचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषतः पुरुषांमध्ये ताकद वाढवणे आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी अश्वगंधाचे सप्लिमेंट्स मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार, अश्वगंधाच्या मुळांचा वापर पावडर, काढा (decoction) किंवा कॅप्सूल स्वरूपात केला जातो.

अश्वगंधा पानांमुळे कोणते धोके संभवतात? (Potential Risks Linked to Ashwagandha Leaves)

तज्ज्ञांच्या मते, अश्वगंधाच्या पानांमध्ये ‘विथॅनोलाइड्स’ (withanolides) नावाचे काही सक्रिय घटक जास्त प्रमाणात आढळतात. त्यापैकी ‘विथॅफेरिन-ए’ (withaferin-A) हा घटक विशेषतः अधिक प्रतिक्रियाशील मानला जातो. या घटकांमुळे पुढील प्रकारचे धोके संभवू शकतात:

  • यकृताला (liver) हानी होण्याचा धोका
  • पोटदुखी किंवा पचनासंबंधी त्रास
  • मज्जासंस्थेवर (nervous system) परिणाम होण्याची शक्यता
  • थायरॉईड हार्मोन्समध्ये बदल
  • रक्तातील साखर अचानक कमी होण्याचा धोका

तज्ज्ञांच्या मते, हे दुष्परिणाम प्रामुख्याने जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ सप्लेमेंट घेतल्यास दिसून येतात. पानांच्या अर्काविषयी संशोधन तुलनेने कमी असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत अजूनही पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

तज्ज्ञांचे दुसरे स्पष्टीकरण (Expert View 2)

डायटिशियनकनिका मल्होत्रा यांनी सांगितले की, पारंपरिक वापरात मुळांचा वापरच मुख्य आहे. आधुनिक संशोधनही प्रामुख्याने मुळांवर आधारित असल्याने ते अधिक सुरक्षित मानले जाते.

त्यांच्या मते, पानांवर आधारित उत्पादनांमध्ये संशोधनाची कमतरता आहे, त्यामुळेच नियामक यंत्रणांनी सावध भूमिका घेतली आहे.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी? (What Consumers Should Do Now)

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सध्या अश्वगंधाचे सप्लिमेंट्स घेत असलेल्या ग्राहकांनी सर्वप्रथम त्यांच्या उत्पादनाचे लेबल नीट वाचणे आवश्यक आहे. जर उत्पादनावर ‘मुळांचा अर्क’ असे स्पष्टपणे नमूद केलेले असेल, तर ते नियमानुसार मान्य असलेल्या प्रकारात येते.

मात्र, जर उत्पादनावर ‘पानांचा अर्क’ असे नमूद केलेले असेल किंवा वनस्पतीचा कोणता भाग वापरला आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले नसेल, तर अशा उत्पादनांबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत संबंधित कंपनीशी संपर्क साधणे किंवा पारदर्शक माहिती देणारे उत्पादन निवडणे अधिक सुरक्षित ठरू शकते.

ही पूर्ण बंदी नाही, स्पष्टीकरण आवश्यक (Not a Blanket Ban, Clarification Needed)

आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, ही कारवाई अश्वगंधावर संपूर्ण बंदी नसून केवळ पानांवर आधारित उत्पादनांवर निर्बंध आहे. पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीत मुळांचाच वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असल्यामुळे मुळांचा वापर केलेले सप्लिंमेंट्स अद्याप सुरक्षित आणि मान्य मानले जातात.

या निर्णयामुळे ग्राहकांसाठी पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, कारण आता कंपन्यांना उत्पादनाच्या लेबलवर नेमका वनस्पतीचा भाग नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणते उत्पादन सुरक्षित आहे, याचा योग्य निर्णय घेणे सोपे होणार आहे.