Bitter gourd juice can control uric acid naturally know the benefits from ayurvedic expert gps 97 | Loksatta

यूरिक ॲसिड झपाट्याने नियंत्रणात आणेल ‘या’ कडू भाजीचा रस; जाणून घ्या या चमत्कारिक भाजीबद्दल..

uric acid control: कारल्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्त शुद्ध होते.

यूरिक ॲसिड झपाट्याने नियंत्रणात आणेल ‘या’ कडू भाजीचा रस; जाणून घ्या या चमत्कारिक भाजीबद्दल..
photo: freepik

बिघडलेला आहार, अनियमित जीवनशैली आणि जंकफूडचे अतिसेवन यामुळे काही लोकांचे युरिक अॅसिड झपाट्याने वाढू लागते. शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी, जडपणा आणि किडनीशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखीसारख्या आजारांचा धोका वाढतो. शरीरातील प्युरीन नावाचे प्रोटीन तुटल्यामुळे युरिक अॅसिड वाढते. युरिक अॅसिडवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात

काही पदार्थांचे सेवन युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. कारली ही अशीच एक भाजी आहे जी चवीला कडू असते. या कडू भाजीच्या रसाचा वापर केल्यास युरिक अॅसिडवर सहज नियंत्रण ठेवता येते. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात जे शरीराला निरोगी ठेवतात आणि यूरिक ऍसिड नियंत्रित ठेवतात. कारल्याची भाजी करून किंवा त्याचा रस बनवून खाल्ल्याने युरिक अॅसिड सहज नियंत्रित करता येते.

( हे ही वाचा: शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल ‘या’ ३ आयुर्वेदिक टिप्सने कमी करा; मिळेल झटपट आराम)

कारल्याचा रस युरिक ऍसिड कसे नियंत्रित करतो?

पतंजलीचे संस्थापक आणि प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, कारल्याचा रस युरिक ऍसिड नियंत्रित करतो आणि किडनीच्या आजारांपासून बचाव करतो. याच्या सेवनाने किडनी स्टोनवरही उपचार करता येतात.हे यूरिक ऍसिड वाढल्यामुळे हाडांच्या दुखण्याला प्रतिबंध करते. चवीला कडू असलेले कारले औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयरन, मॅग्नेशियम यांसारखे खनिजे आढळतात जे रक्त स्वच्छ करण्यास मदत करतात. कारल्याचा रस रक्तात जमा झालेले गलिच्छ यूरिक ऍसिड काढून टाकतो. दररोज एक ग्लास कारल्याचा रस घेतल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.

कारल्याचे आरोग्यदायी फायदे

कारला ही अशी भाजी आहे जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारले, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध , मधुमेह नियंत्रित करते आणि अगदी कर्करोगावर देखील उपचार करते. डॉ. बिमल छाजेर यांनी सांगितले की १०० ग्रॅम कारल्याच्या सेवनाने शरीराला १९ कॅलरीज, २.४ मिलीग्राम फायबर आणि ०.१ मिलीग्राम फॅट मिळते. कारल्याचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.

( हे ही वाचा: Mouth Ulcer: तोंडात फोड आल्याने खाणं अवघड झालंय? ‘हे’ घरगुती आराम देतील चटकन आराम)

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध, कारले शरीरातील सर्व पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करतो. कारल्याचा रस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. याचे सेवन केल्याने लिव्हर डिटॉक्स होते. हे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकारांपासून बचाव होतो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 16:50 IST
Next Story
साधी सर्दी समजून ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करताय? ‘सायनस’चा धोका आजच ओळखा, पाहा टिप्स