Blood Cancer Awareness Month 2023: ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा यांसारख्या रक्त कर्करोगाने ग्रस्तांना आधार देण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर हा महिना ब्लड कॅन्सरविषयी जागरूकता [निर्माण करण्याचा महिना म्हणून पाळला जातो. रक्ताचा कर्करोग ज्याला हेमॅटोलॉजिक कर्करोग देखील म्हणतात हा विशेषतः रक्त, अस्थिमज्जा (नर्व्हस सिस्टीम) आणि लिम्फॅटिक प्रणालीवर परिणाम करतो. रक्ताच्या कर्करोगाच्या नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याविषयी ल्युकेमिया आणि लिम्फोमा सोसायटीने नमूद केले की, अंदाजे दर तीन मिनिटांनी, यूएसमधील एका व्यक्तीला ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमाचे निदान होते.

या आजराची भीषणता पाहता, या प्राणघातक रोगाच्या सुरुवातीच्या चिन्हे आणि लक्षणांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. त्याआधी, कर्करोगाची लागण कशामुळे होऊ शकतो हे जाणून घेऊया ..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

डॉ सुरज डी चिरानिया, क्लिनिकल हेमॅटोलॉजिस्ट, हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, आणि बीएमटी फिजिशियन, एचसीजी कॅन्सर सेंटर, बोरिवली यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, रक्ताचा कर्करोग सामान्यतः अनुवांशिक, विशिष्ट रसायने किंवा रेडिएशनच्या संपर्कात येणे आणि कौटुंबिक इतिहास अशा कारणांमुळे होऊ शकतो. “या स्थितीमुळे मुख्यतः विशिष्ट रक्तपेशींची असामान्य वाढ आणि पुनरुत्पादन होते. व ही वाढ रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्ताची सामान्यपणे कार्य करण्याची क्षमता बिघडवते.”

रक्ताच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे

रक्ताच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल, डॉ नीती रायजादा, वरिष्ठ संचालक, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल्स, बंगळुरू यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली आहे. त्या सांगतात, की लक्षणे व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. पण, काही सामान्य लक्षणांमध्ये थकवा, फिकट गुलाबी त्वचा, वजन कमी होणे, वारंवार संसर्ग होणे, लिम्फ नोड्स सुजणे, सहज जखम होणे, रक्तस्त्राव, हाडे दुखणे, ताप आणि रात्री घाम येणे यांचा समावेश होतो.” मात्र लक्षात घ्या, ही लक्षणे आरोग्याच्या बिघाडामुळे देखील होऊ शकतात.

लक्षात घ्या, रक्ताचा कॅन्सर रोखणे नेहमीच नियंत्रणात असू शकत नाही, विशेषत: जेव्हा अनुवांशिक घटक किंवा महत्त्वपूर्ण जोखीम घटक गुंतलेले असतात, तेव्हा व्यक्ती त्यांचा धोका कमी करण्यासाठी काही पावले उचलू शकतात. यासाठी, डॉ रायजादा यांनी काही खबरदारीचे उपाय सांगितले आहेत.

  • बेन्झिन आणि कीटकनाशकांसारख्या हानिकारक रसायनांच्या संपर्कात येण्याचा कालावधी कमी करा
  • किरणोत्सर्गाच्या संपर्कात असलेल्या व्यवसायांमध्ये सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.
  • संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे निरोगी जीवनशैली राखा.
  • धुम्रपान आणि जास्त मद्यपान टाळा.

हे ही वाचा<< निलेश राणेंना ‘इन्फ्लुएंझा व्हायरस’ची लागण; ऑक्टोबरमध्ये वाढतो धोका! ‘ही’ लक्षणे ओळखा, कशी घ्यावी काळजी?

रक्ताच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या, किंवा बेंझिन सारख्या रसायनांच्या संपर्कात येणाऱ्या, उच्च रेडिएशनजवळ काम करणाऱ्या आणि विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती जसे की MDS (Myelodysplastic Syndrome) असणाऱ्या लोकांनी सतर्क राहायला हवे.

Story img Loader