Ranbir Kapoor Fitness :बॉलीवूडचा अभिनेता रणबीर कपूर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. कधी त्याच्या चित्रपटाची चर्चा होते तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होते. आता त्याच्या एका मुलाखतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, कारण त्याने या मुलाखतीत त्याच्या फिटनेसविषयी सांगितले. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, ४१ वर्षीय रणबीर कपूरच्या फिटनेसमागील रहस्य काय? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.

निखिल कामथला दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर सांगतो की, तो प्रत्येक नवीन प्रोजेक्टसाठी त्याची वर्कआउट करण्याची स्टाइट बदलतो. रणबीर सांगतो, “माझ्या पूर्वीच्या वर्कआउटमध्ये डंबल, पुशिंग, चेस्ट प्रेस, प्रोटीन इत्यादी घटकांचा समावेश होता; पण सध्या मी नमबरोबर काम करत आहे, जो कोरियाचा अत्यंत उत्तम ट्रेनर आहे. त्याच्यामुळे ट्रेनिंगविषयीचा माझा संपूर्ण दृष्टिकोन बदलला आहे, मी त्याच्याबरोबर दिवसातून तीन तास ट्रेनिंग करतो.”

रणबीर पुढे त्याच्या दिनचर्येविषयी सांगतो, “मी सकाळी ११ ते १२ मोबिलिटी, स्ट्रेचिंग आणि कार्डिओ करतो. त्यानंतर मी दुपारी थोडा झोपतो. त्यानंतर संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मी वर्कआउट करतो. मी आता अशा नवीन गोष्टी पाहिल्या, ज्यांचा मशीन किंवा वजनाशी काहीही संबंध नाही. हे पुल-अप्स, स्क्वॅट्स आणि डेडलिफ्ट्सह खूप जास्त बॉडीवेट ट्रेनिंग आहे, तेच वजन मी वापरतो. जेव्हा मला पंपिंग करण्याचा कंटाळा येतो तेव्हा मी हँडस्टँड किंवा हेडस्टँड करतो.”

हेही वाचा : मेरी कोमने पोलंडमधील स्पर्धेदरम्यान चार तासांत केले दोन किलो वजन कमी! खरंच व्यायाम केल्याने काही तासांत वजन कमी होते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

“खरं तर हे वर्कआउट एका भूमिकेसाठी आहे. मला आजवर मिळालेले सर्वात आव्हानात्मक पात्र आहे. त्यासाठी एक विशिष्ट तयारी आवश्यक आहे, म्हणून मी गेल्या सात महिन्यांपासून तयारी करत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मी एकाही चित्रपटाचे शूटिंग केले नाही, त्यामुळे हा काळ माझ्यासाठी पितृत्व रजेसारखा आहे,” असे रणबीर कपूर पुढे सांगतो.

कोणत्याही प्रकारचे वजन न उचलता तुम्ही तुमची फिटनेस कशी जपू शकता, याविषयी आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली. त्या सांगतात,” व्यायामाचा फायदा घेण्यासाठी शरीराला त्रास देण्याची काहीही गरज नाही. बॉडीवेट व्यायाम, योगा किंवा स्ट्रेचिंगसारखे कमी तीव्रतेचे व्यायामसुद्धा शरीराची लवचिकता आणि ताकद वाढवू शकतात.”

बॉडीवेट हा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम आहे, जो आपल्या स्वतःच्या शरीराचा प्रतिकार म्हणून वापर करतात, त्यासाठी वजन उचलण्याची किंवा कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नसते. गोयल सांगतात, “हे व्यायाम स्नायू मजबूत करण्यासाठी, शरीराची लवचिकता सुधारण्यासाठी आणि संपूर्ण फिटनेस वाढवण्यासाठी तुमच्या शरीराच्या वजनाचा वापर करतात; त्यात काही पुशअप्स, स्क्वॅट्स, लंग्ज आणि प्लँक्स इत्यादींचा समावेश असतो.”

हेही वाचा : Vinesh Phogat : पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वजन कमी करणे अधिक कठीण का असते? आहारतज्ज्ञ काय सांगतात? वाचा…

बॉडीवेट व्यायाम हा चांगला वर्कआउट करण्यासाठी शरीराला सक्षम बनवतो. गोयल सांगतात की, बॉडीवेट व्यायाम शरीराविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि समन्वय सुधारण्यासाठी महत्त्वाचे काम करतो.
गोयल पुढे सांगतात, “बॉडीवेट व्यायाम हा कोणत्याही उपकरणांशिवाय स्ट्रेंथ, लवचिकता आणि तुमचा फिटनेस सुधारण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. बॉडीवेट व्यायाम हा अष्टपैलू आहे, जो वेगवेगळ्या प्रकारच्या फिटनेसशी जुळवून घेतो आणि चांगले आरोग्य प्रदान करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो.”