Shah Rukh Khan Quits Smoking : बॉलीवूडचा किंग खान, अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांना शाहरुखविषयी नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडते. पण, फार कमी लोकांना माहीत असेल की, एकेकाळी शाहरुख खान हा खूप जास्त धूम्रपान करायचा; पण आता त्याने धूम्रपान करणे सोडले आहे. खरे तर हे त्याने आरोग्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे अन् चांगले पाऊल आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्याने याविषयी सांगितले.

शाहरुख खान म्हणाला, “एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो, मी आता धूम्रपान करीत नाही. मला वाटले की, धूम्रपान सोडल्यानंतर मला दम लागणार नाही; पण तरीही मला श्वास घेण्यात अडचण येत आहे. पण देवाच्या कृपेने तेही ठीक होईल.” त्याने घेतलेला हा निर्णय अनेक चाहत्यांसाठी एक सकारात्मक संदेश ठरलेला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील पल्मोनरी मेडिसिन येथील सल्लागार डॉ. सुमित सिंघानिया सांगतात, “धूम्रपान सोडल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात; जे वाढत्या वयात जीवनशैलीची गुणवत्ता आणि दीर्घायुष्य वाढवू शकतात.”

हेही वाचा : मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात

u

धूम्रपान सोडल्यानंतर कोणते आरोग्यदायी फायदे दिसून येतात?

डॉ. सिंघानिया सांगतात, “एखाद्या व्यक्तीने कितीही वेळा धूम्रपान केले असेल; पण धूम्रपान कायमचे सोडल्यानंतर लगेच आरोग्याचे दीर्घकालीन फायदे दिसून येतात. शाहरुख खानचा हा निर्णय त्याची ऊर्जा पातळी वाढवणारा ठरणार आहे. त्याच्या फुप्फुसाच्या क्षमतेमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.”
संशोधनानुसार जे लोक धूम्रपान सोडतात, त्यांच्यासाठी नंतर स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर आरोग्याच्या समस्यांचा धोका कमी होतो.

डॉ. सिंघानिया यांच्या मते, “धूम्रपान सोडणाऱ्या वृद्धांची कालांतराने फुप्फुसाची क्षमता चांगली होते आणि हृदयाचे आरोग्यसुद्धा सुधारते. तसेच गंभीर धोकासुद्धा टाळता येतो.

दीर्घकालीन धूम्रपानाचे अनेक गंभीर परिणाम दिसून येतात; जसे की फुप्फुसावर काळे डाग दिसून येतात, हृदय व रक्तवाहिन्यांच्या कार्यामध्ये बदल दिसून येतो इत्यादी.
डॉ. सिंघानिया यांच्या मते, यावर मात करता येते. धूम्रपान सोडल्यानंतर काही तासांत रक्तप्रवाहातील कार्बन मोनोऑक्साइडची पातळी कमी होते आणि त्यामुळे ऑक्सिजनची पातळी सामान्य होताना दिसून येते. त्यानंतर रक्तप्रवाह सुधारतो, श्वासनलिकेतील जळजळ कमी होते आणि श्वासाशी संबंधित आजार कमी होतात.

डॉ. सिंघानिया सांगतात, “धूम्रपान सोडल्याने ऊर्जेची पातळी वाढते आणि ऑक्सिजनच्या पातळीमध्येही सुधारणा दिसून येते. तसेच शारीरिक हालचाल व सहनशक्ती वाढते.”

हेही वाचा : Fabulous Lives vs Bollywood Wives फेम शालिनी पासीने सांगितली डाएटमधली ‘ही’ सीक्रेट गोष्ट, घरोघरी असणाऱ्या या गोष्टीचा होतो आरोग्याला फायदा, तज्ज्ञ सांगतात…

धूम्रपान सोडल्याने कर्करोग होण्याचा धोका, विशेषत: फुप्फुस आणि घशाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. अभ्यास सांगतो की, धूम्रपान सोडणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य सुधारते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते; जे कोणत्याही संक्रमणाचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतात.

कोणत्याही वयात धूम्रपान सोडणे का महत्त्वाचे?

डॉ. सिंघानिया सांगतात, “जेव्हा लोक लहान वयात धूम्रपान सोडतात तेव्हा आरोग्याचे लाभ दिसून येतात. धूम्रपान सोडल्याने धूम्रपानसंबंधित आजारांचा धोका टाळता येतो. शारीरिक त्रास कमी करता येतो. मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते; तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते मग यांमुळे कोणतेही संक्रमण रोखण्यास मदत होते.

जेव्हा वृद्ध लोक धूम्रपान सोडतात तेव्हा त्यांच्या आयुर्मानात वाढ होते आणि त्यामुळे ते निरोगी आणि अधिक सक्रिय आयुष्य जगू शकतात.
डॉ. सिंघानिया म्हणतात, “धूम्रपान सोडायला कधीही उशीर होत नाही. अनेक वर्षांच्या सवयीनंतरही धूम्रपान सोडल्याने आरोग्य आणि जीवनशैलीची गुणवत्ता या दोन्ही गोष्टींवर चांगला परिणाम व बदल दिसून येतो.

Story img Loader