scorecardresearch

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; कॅल्शियमची पातळी वाढविण्याचे उपाय जाणून घ्या

निरोगी आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियमची खूप आवश्यकता असते

Calcium Deficiency
कॅल्शियम हे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे. (Photo : Freepik)

कॅल्शियम हे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे. आपल्या हाडांचे आणि दातांचे आरोग्य चांगले राखण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय हृदय आणि शरीराच्या स्नायूंसाठीही कॅल्शियम आवश्यक असते. कॅल्शियम शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ देत नाही. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियमची खूप आवश्यकता असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू, हाडे आणि दातांवर तसेच मानसिक आरोग्यावर अनेक परीणाम होऊ शकतात.

तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब, स्नायू आणि सांधे कडक होणे, दातदुखी, त्वचा कोरडी होणे, नखे कमजोर होणे, तुटणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दूध, दही, पनीर आणि हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवावे लागेल.

हेही वाचा- ‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्याने वाढतो डायबिटीज व कॅन्सरचा धोका? तज्ञांनी दिले स्पष्ट उत्तर

कॅल्शियमचे सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत. पण काही लोकांना दुधाची अॅलर्जी असते. अनेकांना ते आवडत नाहीत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही असे खाद्यपदार्थ सांगणार आहोत ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर करता येऊ शकते.

ड्राई फ्रूट्स –

जर तुम्हाला कॅल्शियम नसलेल्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात नट्सचा समावेश करू शकता. हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. बदाम सर्वाधिक कॅल्शियम देतात. अनेक वैद्यकीय जर्नल्स सांगतात की, एक कप बदामामध्ये सुमारे २८५ मिलीग्राम कॅल्शियम असतात. यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स देखील भरपूर असतात. बदाम हे मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ई चाही चांगला स्रोत आहे.

पालेभाज्या –

हेही वाचा- अशुद्ध रक्तामुळे निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या; रक्त शुद्ध करण्याचे ‘हे’ नैसर्गिक उपाय जाणून घ्या

हिरव्या पालेभाज्या हा एक कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. हिरव्या भाज्या खाल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढू शकते. या भाज्या कॅल्शियम चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतात. शिवाय त्या आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन अशी अनेक तत्व या भाज्यांमध्ये असतात.

बीन्स आणि डाळ –

बीन्स आणि कडधान्ये अतिशय पौष्टिक असतात. त्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, फोलेट, झिंक आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामध्ये आढळणारे पोषक तत्व पचनक्रिया सुधारतात आणि आपली ऊर्जा पातळी देखील वाढवतात.

बीया –

तीळ हे कॅल्शियमचे उच्च स्रोत आहेत जे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. १०० ग्रॅम तीळ तुम्हाला दररोज ९५ टक्के कॅल्शियम पुरवू शकतात. चिया, भोपळा आणि जवळजवळ सर्व प्रकारच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, जस्त आणि सेलेनियम आढळतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 14:53 IST