Calcium rich foods is not only in milk but also in these 10 things gps 97 | Loksatta

केवळ दुधातच नाही तर ‘या’ १० गोष्टींमध्येही असते भरपूर कॅल्शियम; आजच करा आहारात समावेश

High Calcium Foods:आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश केल्याने शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण होते आणि हाडे मजबूत होतात.

केवळ दुधातच नाही तर ‘या’ १० गोष्टींमध्येही असते भरपूर कॅल्शियम; आजच करा आहारात समावेश
photo: freepik

Top 10 Calcium-Rich Foods: कॅल्शियम हे केवळ एक आवश्यक खनिज नाही तर ते आपली हाडे देखील मजबूत करतात. कॅल्शियम मिळविण्यासाठी तुम्हाला नेहमी दुधावर अवलंबून राहावे लागते. मात्र दुधासोबत असे देखील काही विशिष्ट पदार्थ आहेत ज्यामधून कॅल्शियम मिळते. तर जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल…

दही

दही बहुतेक भारतीय घरांमध्ये दररोज बनवले जाते. बर्याच लोकांना लैक्टोजची ऍलर्जी असते, म्हणून दही यासाठी योग्य आहे. त्यात दुधाइतके कॅल्शियम असते, फक्त यामध्ये साखर घालून खाऊ नये.

सार्डिन

सार्डिन हे मांसाहार करणार्‍यांसाठी परवडणारे खाऱ्या पाण्यातील मासे आहेत जे भारतातील फिश मार्केट आणि बजेट रेस्टॉरंट्समध्ये आणि विशेषतः दक्षिण, पश्चिम आणि पूर्व भारताच्या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मिळू शकतात.

( हे ही वाचा: युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा)

पनीर

पनीर हा आणखी एक सहज उपलब्ध होणारे दुग्धजन्य पदार्थ आहे जे कॅल्शियमने समृद्ध आहे. खरं तर, पर्मियन पनीरमध्ये कोणत्याही पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम असते.

अंजीर

अंजीर तुमच्यासाठी चांगले आहे, कारण ते केवळ कॅल्शियमचे उत्तम स्रोत नसून त्यामध्ये फायबर आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते.

हिरव्या भाज्या

ब्रोकोलीपासून पालकापर्यंत, हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमसह अनेक आवश्यक खनिजे असतात.

( हे ही वाचा: ‘या’ रसांच्या सेवनाने किडनी स्टोन लघवीतून सहज बाहेर पडेल; ऑपरेशनची देखील गरज भासणार नाही)

बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते उष्णता निर्माण करतात. कृपया दिवसातून फक्त मूठभर बदाम खा.

ओट्स

ओट्स हेल्दी आहेत आणि तृणधान्यांपेक्षा जास्त महाग नाहीत. ओट्स फायबर आणि कॅल्शियमने भरलेले असतात.

भेंडी

भेंडीमध्ये भरपूर पोषकतत्त्वे असतात, विशेषत: कॅल्शियम. एक वाटी भेंडी तुम्हाला १७५ मिलीग्राम कॅल्शियम देईल.

अंडी

एका उकडलेल्या अंड्यामध्ये ५० मिलीग्राम कॅल्शियम असते. याशिवाय उकडलेल्या अंड्यांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते.

( हे ही वाचा: ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल)

खजूर

कॅल्शियम आणि लोहाच्या बाबतीत खजूर तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. याशिवाय हे खायलाही खूप चविष्ट आहे.

फक्त लक्षात ठेवा: तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास, तुम्हाला या पदार्थांमधून पुरेसे कॅल्शियम मिळणार नाही, कारण व्हिटॅमिन डी तुम्हाला तुमच्या अन्नातून कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 16:36 IST
Next Story
सतत मानदुखी ‘हे’ असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण; आजच धोका ओळखून ‘हे’ घरगुती उपचार करा सुरु