Can I Get Pregnant Due To Sex In Periods: मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्यास गर्भधारणेचा धोका नसतो असा एक सर्वसाधारण समज आहे. पण हे लक्षात घ्यायला हवे की पिरीएड्स मध्ये सेक्स केल्याने गर्भधारणेचा धोका कमी असला तरी ही बाब अशक्य नाही. स्त्रीची प्रजनन क्षमता ओव्हुलेशन दरम्यान सर्वाधिक असते. ओव्हुलेशनवर अनेक गोष्टी प्रभाव टाकू शकतात, काही महिलांच्या बाबत ओव्हुलेशन हे मासिक पाळीच्या वेळीच सुरु झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते. पण नक्की यात किती तथ्य आहे का? शिवाय यासाठी कारणीभूत घटक कोणते या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. प्रसूती आणि स्त्रीरोग, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम येथील प्रमुख सल्लागार, डॉ आस्था दयाल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली माहिती पाहूया…

मासिक पाळीचे गणित काय? ओव्ह्युलेशन कधी होते? (How To Identify Ovulation Day)

२८ दिवसांच्या मासिक पाळीच्या चक्रात ओव्हुलेशन साधारणपणे १४ व्या दिवसाच्या वेळी सुरु होऊ शकते. पाळी सुरू होण्याच्या सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ओव्हरी मधून एग्ज सोडले जातात. याचा अर्थ असा की गर्भधारणेसाठी सर्वात ऍक्टिव्ह दिवस सामान्यतः १२ व्या आणि १६ व्या दिवसाच्या दरम्यान असतो. या काळात, प्रजनन दर २० ते ५८ टक्के असतो थोडक्यात, गर्भवती होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या जास्त असते. इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, हे गणित प्रत्येक महिलेच्याबाबत वेगळे असू शकते. सर्व स्त्रियांसाठी २८ -दिवसांचे नियमित चक्र नसते.

whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…
Mpsc Mantra General Science Question Analysis career
Mpsc मंत्र: सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद

अनेक स्त्रियांना अनियमित मासिक पाळी येते, त्यामुळे त्यांचे मासिक पाळी चक्र २० ते ४५ दिवस किंवा त्याहून अधिक असू शकते. त्यामुळे एखाद्या महिलेला महिन्यातून एकदा मासिक पाळी आली तरी, नंतर तिचे एक महिन्याचे २५ दिवसांचे, २७ दिवसांचे किंवा अचानक २६ दिवसांचे चक्र असू शकते. अशा प्रकरणांमध्ये, ओव्हुलेशनचा नेमका दिवस निश्चित करणे कठीण होते. वय, वजन, जीवनशैली, धूम्रपान, तणाव पातळी, हार्मोनल औषधे, वैद्यकीय परिस्थिती या सर्व घटकांचा ओव्हुलेशनच्या कालावधीवर परिणाम होऊ शकतो. परिणामी, मासिक पाळी दरम्यान गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.

स्त्रीच्या शरीरात पुरुषाचे स्पर्म तीन ते पाच दिवसांपर्यंत टिकून राहू शकतात, याचा अर्थ असा की जर या कालावधीत संभोग झाला, आणि पुढील काही दिवसांत ओव्हुलेशन झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते. यामुळे हे स्पष्ट होते की, मासिक पाळीच्या दरम्यान गर्भधारणा होऊ शकत नाही हा पूर्णपणे गैरसमज आहे. ओव्हुलेशन दरम्यान हलके रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंगचा अनुभव येऊ शकतो, ज्याला मिटेलश्मेर्झ म्हणतात. या कालावधीतही गर्भधारणा होऊ शकते.

भारतात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि हार्मोनल असंतुलन महिलांमध्ये खूप कॉमन समस्या आहेत. या परिस्थितीमुळे अनियमित रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होऊ शकते, ज्यामुळे ओव्हुलेशन सुरु होते. अशावेळी लैंगिक संबंधांमुळे रक्तस्त्राव देखील सुरू होऊ शकतो. परिणामी, PCOS असलेल्या स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीतही शरीरसंबंध ठेवल्यास गरोदर होऊ शकतात.

हे ही वाचा<< मासिक पाळी अनियमित असताना गर्भधारणा होऊ शकते का? PCOS वर पूर्ण मात करण्यासाठी डॉक्टरांचा फंडा

दरम्यान, गर्भधारणा टाळण्यासाठी कॉन्डोम, हार्मोनल गोळ्या, इंट्रायूटरिन उपकरणे (IUD) किंवा नसबंदी शस्त्रक्रिया यासारख्या अधिक विश्वासार्ह पद्धती वापरण्याचा सल्ला दिला जातो.