scorecardresearch

Premium

चुकीच्या पद्धतीने फळे खाणे ठरू शकते धोकादायक? फळे खाताना लक्षात ठेवा तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी…

एकाच वेळी वेगवेगळी फळे खाणे योग्य की अयोग्य? त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात…

how to have fruits according to ayurveda
जेवणादरम्यान फळे खाणे योग्य की अयोग्य? (Photo : Pexels)

आपल्यापैकी अनेकांना फळे खायला आवडतात. फळे आवडत नाहीत, अशी व्यक्ती शोधून सापडणे कठीण आहे. फळे आपल्या शरीरासाठीही खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे लोक रोज फळे खाणे पसंत करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, फळे खाण्याचीही एक पद्धत असते. विशेषतः जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये फळे खाण्याचे काही नियम असतात. त्यामुळे आपण नेमकी कोणती फळे, कोणत्या वेळी खावीत आणि ती खाताना काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती जाणून घेऊ.

आयुर्वेद अभ्यासक निधी पंड्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, “तुम्हाला फळं आवडतात का? आवडत असतील; परंतु माझ्यापेक्षा जास्त नाही. कारण- मला खूप फळं आवडतात. परंतु, मागील १० वर्षांत मी फळं खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला; ज्यामुळे माझं शरीर पूर्णपणे बदललं आहे.” निधी सांगतात की, फळं खाण्याचेही काही नियम आहेत.

Put Two Drops Of Ghee In Nostril Before Sleeping at Night Check the Magical Results Perfect Way to Do Ayurveda Nasya Karma
रात्री झोपण्याआधी नाकात तुपाचे 2 थेंब घालण्याचे चमत्कारिक फायदे वाचा; काय आहे योग्य पद्धत?
Peanuts Cashew nuts Dry coconut can help for eliminate stress
Stress Eating: ताण वाढल्यावर तुम्हाला खाण्याची सवय आहे का? मग, तज्ज्ञांनी सांगितलेले हे पदार्थ खा; मिळेल आराम
What Happens To Body If You Eat Dry Fruits Kaju Badaam Manuka Everyday Health Expert Tells Benefits What to Do and Not
तुम्ही रोज काजू, बदाम, मनुक्यासारखा सुकामेवा खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
healthy Diet
रोजच्या आहारातील ‘हे’ ४ पदार्थ ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त! जाणून घ्या या पदार्थांचे महत्त्व…

निधी यांनी फळे खाण्याच्या बाबतीत सांगितलेले काही नियम

  • एकाच वेळी विविध फळे जास्त प्रमाणात खाऊ नका. प्रत्येक फळामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. तसेच एकाच वेळी एक किंवा दोन समान गुणधर्म असलेली फळे खा.
  • फळे लवकर खराब होतात. त्यामुळे ती खराब होण्याआधी खा.
  • सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० च्या दरम्यान फळे खा; तसेच नाश्त्याला फळे खाऊ नका.
  • सर्व फळे सारखी नसतात. त्यामुळे ती खूप काळजीपूर्वक निवडा. तांदूळ आणि गहू यांच्या पौष्टिक सामग्रीमध्ये जेवढा फरक असतो, तेवढाच फरक दोन फळांमध्ये असतो.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजारी असताना फळे खाऊ नये. विशेषतः ताप किंवा सर्दीमध्ये फळे खाणे टाळण्याचा सल्ला निधी यांनी दिला आहे. परंतु, डाळिंब मात्र कोणीही, कधीही खाऊ शकते. जरी तुम्ही आजारी असाल तरीही डाळिंब खाऊ शकता.

हेही वाचा- दिवसातून दोनदा कॉफी प्यायल्याने तुमच्या यकृताचे रक्षण होऊ शकते का? संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या…

जेवणादरम्यान फळे खाणे योग्य की अयोग्य?

जेवणादरम्यान फळे खाणं कधीही चांगलं असतं. कारण- ती चांगलं पोषण शोषण्यास मदत करतात, असं पवित्रा एन. राज (मुख्य आहारतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल, यशवंतपूर, बंगळुरू) यांनी सांगितलं, तर त्या पुढे सांगतात की, फळांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ती जेवणादरम्यान खाण्याचा सल्ला दिला जातो; जेवणाबरोबर एकत्रित खाण्याचा सल्ला दिला जात नाही.

पुढील प्रकारची फळे कधीही एकत्र खाऊ नयेत :

  • तुरट फळे : सफरचंद, बेरी, चेरी व नासपती.
  • गोड फळे : पपई, आंबा, केळी, पीच व अॅव्होकॅडो
  • आंबट फळे : संत्री, लिंबू व द्राक्षे

तसेच तज्ज्ञांच्या मते, फळं एकत्र केल्यानं काही पचन आणि पोट फुगण्याशी संबंधित समस्या उदभवू शकतात. त्यामुळे एकाच वेळी एक फळ खाणं केव्हाही चांगलं असतं. कारण- प्रत्येक फळाचे गुणधर्म वेगळे असतात. जसे की, काही लिंबूवर्गीय असतात, काही कार्बोहायड्रेट्सयुक्त असतात आणि काही व्हिटॅमिन व पोटॅशियमयुक्त असतात, असेही पवित्रा सांगतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can eating fruits the wrong way be dangerous while eating fruits keep in mind these things said by the experts jap

First published on: 20-11-2023 at 15:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×