scorecardresearch

Premium

स्विमिंगआधी किती तास काही खाऊ नये? पूलमध्ये जाण्यापूर्वी काय खायला-प्यायला हवे? तुमचे प्रश्न ‘इथे’ सोडवून घ्या

Swimming and Eating: बॉलिवूड स्टार्सचे हेल्थ एक्स्पर्ट डॉ. मिकी मेहता यांनी स्विमिंगपूलमध्ये उतरण्याआधी पाळायच्या नियमांविषयी व अनेकांना पडणाऱ्या प्रश्नांविषयी स्पष्ट उत्तरे दिली आहेत.

Can I swim immediately after eating What food should I take before plunging into the Swimming pool Health News By Bollywood Doctor
स्विमिंगसंबंधित सगळे प्रश्न 'इथे' सोडवून घ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Swimming and Eating: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला घामाघूम करेल असा व्यायाम नकोसा वाटतो. त्यामुळे अनेकजण हालचालही होईल आणि गंमतही वाटेल अशा पोहण्याच्या व्यायामाला प्राधान्य देतात. पोहायला जाताना त्वचेची काळजी घेण्याबाबत आता बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे. क्लोरीनयुक्त पाण्याने त्वचा काली पडू नये यासाठी किमान सनस्क्रीन लावून जाणे हे प्रत्येकानेच पाळायला हवे. याशिवाय पोहण्याच्या आधी व नंतर सुद्धा काही नियम प्रत्येकाने नेटाने पाळायला हवेत. बॉलिवूड स्टार्सचे हेल्थ एक्स्पर्ट डॉ. मिकी मेहता यांनी या नियमांविषयी व अनेकांना पडणाऱ्या प्रश्नांविषयी स्पष्ट उत्तरे दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊया, निळ्याशार स्विमिंगपूल मध्ये डाइव्ह मरण्याआधी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात..

स्विमिंगला जाण्याआधी किती वेळ खाऊ नये? (How Long You Should Wait For Swimming After Eating)

स्विमिंला जाताना पोट पूर्ण पॅक असेल तर पोट आणि आतड्यांमधील पायलोरस किंवा क्रॅम्प येऊन वेदना होऊ शकतात असा सर्वसाधारण समज आहे. पोहण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात जेवण केल्याने जडपणा जाणवू शकतो आणि अपचन आणि अस्वस्थता होऊ शकते.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

जेव्हा पोटात अन्न असते तेव्हा पोटात आणि आतड्यांमध्ये पचनप्रक्रियेसाठी रक्त व ऑक्सिजनची गरज असते. अन्न पचण्यास सुमारे चार तास लागतात आणि या कालावधीत, ऑक्सिजन आणि ऊर्जा दोन्ही पचनाकडे निर्देशित केले जातात. मात्र व्यायामादरम्यान स्नायूंमध्ये तयार होणारे लॅक्टिक ऍसिड काढून टाकणे व ऊर्जा पातळी राखून ठेवणे यासारख्या इतर उपयोगांसाठी रक्त व ऑक्सिजन वापरल्यास पचनप्रक्रिया मंदावण्याची शक्यता असते. यामुळेच पचनासाठी जेवल्यानंतर लगेच पोहण्याचा सल्ला दिला जात नाही. पोहायला जाण्यापूर्वी जेवणानंतर किमान ३० ते ६० मिनिटे थांबणे आवश्यक आहे.

जेवल्यावर लगेच स्विमिंग केल्यास काय होते? (What Happens If You Swim After Eating)

जेवणानंतर कमीत कमी तीन तासांचा ब्रेक द्यावा लागतो जेणेकरून अन्नाचे पचन होईल, पोटाला आराम मिळेल आणि अतिरिक्त ताण पडणार नाही. अन्यथा, पायलोरस गेटवर ताण येऊन आपण क्रॅम्पिंग, उबळ, मळमळ, ऍसिडिटी, ढेकर आणि ऍसिड रिफ्लक्सची असे त्रास अनुभवू शकता. कोणत्याही प्रकारच्या ऍसिड रिफ्लक्स आणि उचकीमुळे पोहताना नाकात पाणी जाऊ शकते.

दुसरीकडे, काही अभ्यासात असे दिसून आले आहे की, जर तुमचे शरीर स्विमिंगच्या आधी डिहायड्रेटेड असेल तर इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊन क्रॅम्पिंगचा त्रास उद्भवू शकतो. त्यासाठीच स्विमिंगआधी हायड्रेटेड असणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही थकवा टाळू शकता.

पोहण्याआधी ऊर्जेसाठी नेमकं काय खावं? (What To Eat Before Swimming)

पोहण्याच्या काही तास आधी योग्य पोषण महत्वाचे आहे कारण ते ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. योग्य पोषक तत्वांचे सेवन केल्याने क्रॅम्प येण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे पोहण्याच्या आधी सफरचंद, केळी, कोशिंबीर, सूप आणि नारळ पाणी यासारखी लवकर पचणारे व पोहण्यास शक्ती देणारे पदार्थ खावे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रासदायक पदार्थ खाणे टाळा. तळलेले, मसालेदार, तंतुमय पदार्थ, उच्च साखर कार्बोनेटेड पेये आणि कॅफिन-आधारित पेये या सर्वांमुळे सूज येणे आणि अस्वस्थता येऊ शकते.

हे ही वाचा<< पिरीएड्समध्ये सेक्स केल्यास गर्भधारणा होऊ शकते का? डॉक्टर सांगतात, ओव्ह्युलेशन दिवस कसा ओळखाल?

निष्कर्ष: आजवर झालेल्या अभ्यासात जेवण झाल्यावर पोहायला गेल्यास बुडण्याचा प्रकार घडलेला नाही पण यामुळे क्रॅम्प येऊन प्रचंड वेदना होऊ शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can i swim immediately after eating what food should i take before plunging into the swimming pool health news by bollywood doctor svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×