scorecardresearch

किडनीचे रुग्ण हळदीचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीराला संसर्गापासून वाचवते आणि शरीर निरोगी ठेवते.

kidney failure symptoms
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो शरीरातील हानिकारक आणि विषारी टाकाऊ पदार्थ काढून टाकतो. खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली आपल्या किडनीला अनेक प्रकारे आजारी बनवत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे आपल्या शरीरात अनेक आजार होऊ लागतात. किडनीच्या आजारांबद्दल बोलायचे झाले तर किडनी कमकुवत होणे, किडनीला सूज येणे, किडनी खराब होणे यांसारखे आजार लोकांना जास्त त्रास देतात. किडनीच्या आजारात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काही पदार्थांचे सेवन किडनीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते, तर काही पदार्थांचे सेवन केल्याने त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवते.

किडनीच्या रुग्णांनी हळदीचे सेवन करू नये असे अनेकदा लोक मानतात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. हळदीचे सेवन केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. हळदीच्या सेवनाने शरीरावर औषधाप्रमाणे परिणाम होतो.

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या मते, हळद आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून किडनीच्या समस्यांमध्ये हळदीचे सेवन केले जाऊ शकते का? या मसाल्याच्या सेवनाने शरीराला कोणते फायदे होतात.

किडनीच्या आजारात हळद खाऊ शकतो का?

healthmatch तज्ज्ञांच्या मते, हळदीचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे मुख्य घटक आहे ज्यामुळे हळद एक सुपरफूड बनते. हा घटक वेदना दूर करतो आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतो. याचे सेवन केल्याने संसर्गाचा धोका कमी होतो.
आता प्रश्न असा पडतो की हळदीचे सेवन केल्याने किडनीच्या समस्या वाढू लागतात का? किडनीचा आजार आणि इतर आरोग्य स्थिती असलेल्या लोकांसाठी हळद अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या मसाल्याच्या मर्यादित सेवनाने किडनीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

हळदीच्या अतिसेवनाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरात अनेक आजार होण्याचा धोका असतो. हळदीमध्ये असलेल्या कर्क्यूमिनमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो आणि या महत्वाच्या अवयवाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. याशिवाय, कर्क्युमिनचा प्रभाव गरम असतो, ज्यामुळे अतिसार आणि अपचन होऊ शकते. हळदीचे जास्त सेवन केल्याने रक्त पातळ होऊ शकते कारण हळद रक्त गोठण्यापासून थांबवते. हळदीच्या अतिसेवनामुळे यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 10:52 IST