Premium

Weight: ऑलिव्ह ऑइलच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकतं? वाचा डॉक्टर काय सांगतात

कोणत्याही प्रकारच्या चरबीच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकते, जुनाट आजारांचा धोका वाढू शकतो आणि आपल्या कोलेस्ट्रॉल वाढू शकतो.

Can overusing healthy fats like olive oil raise your bad cholesterol and weight?
ऑलिव्ह ऑइलच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकतं? (Pic source: Freepik

अलीकडच्या वर्षांत, संतुलित आहाराचा भाग म्हणून पौष्टिक पदार्थांच्या वापरावर भर दिला जात आहे. आपल्या जेवणात चांगल्या तेलाचा समावेश करणे निःसंशयपणे फायदेशीर असले तरी याच्या आहारी जाण्याने किंवा अतिसेवन आणि अतिवापराने त्रास होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, यामध्ये दोन प्रकार आहेत. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य राखण्यासाठी या दोन प्रकारांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. वरिष्ठ सल्लागार डॉ. तरुण सहानी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्टेरॉल

चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये फरक कळणे आवश्यक आहे. कारण, जास्त प्रमाणात खराब कोलेस्ट्रॉलचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. चुकीच्या आहारातील निवडी, जसे की तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ हे खराब कोलेस्ट्रॉल आहेत. बैठी जीवनशैली, धूम्रपान आणि काही वैद्यकीय परिस्थितीदेखील एलडीएल पातळी वाढवू शकतात.

चांगले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि हृदयरोग तसेच आजारांपासून बचाव करून आरोग्य राखण्यासही ते उपयुक्त आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दुसरीकडे खराब कोलेस्ट्रॉल, एलडीएल, यकृतापासून संपूर्ण शरीरातील विविध ऊतकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाहून नेतो. जास्त प्रमाणात LDL धमनीच्या भिंतींमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

प्रमाणात सेवन महत्त्वाचे

चरबी आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ऊर्जा प्रदान करतात, पोषक शोषणात मदत करतात आणि विविध महत्त्वपूर्ण कार्यांसाठी मदत करतात. फॅट्सचे चांगले स्त्रोत म्हणजे ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणा तेल, कॅनोला ऑइल, एवोकॅडो आणि सूर्यफूल तेल. मात्र त्याचे सेवन हे प्रमाणात झाले पाहिजे.

अतिवापर टाळा

चरबीयुक्त पदार्थांचे सेवन खरोखरच फायदेशीर असले तरी, समतोल राखणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकते, जुनाट आजारांचा धोका वाढू शकतो. फळे, भाज्या आणि धान्य यांसारख्या चांगल्या आहारातील इतर महत्त्वपूर्ण घटकांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा समस्या उद्भवते.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, भारतात सध्या उच्च कोलेस्ट्रॉल पातळीसह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ऑइलचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. काहीवेळा ही समस्या अनुवांशिक असते, तर काहीवेळा तळलेले पदार्थ, चरबीयुक्त तेल या समस्येस आणखी कारणीभूत ठरतात.

हेही वाचा >> योगासनामुळे मिळतो संधीवातापासून आराम; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या योगासनाच्या खास पद्धती

कोलेस्ट्रॉल व्यवस्थित राखण्यासाठी संतुलित आहार ही गुरुकिल्ली आहे. आपल्या जेवणात निरोगी स्निग्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. एकूणच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी विविध पदार्थांचा समावेश करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नियमित शारीरिक हालचाल, वजन व्यवस्थापन आणि अतिसेवन टाळणे हेदेखील महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can overusing healthy fats like olive oil raise your bad cholesterol and weight srk

First published on: 25-09-2023 at 16:17 IST
Next Story
नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…