scorecardresearch

एक पांढरा केस उपटल्याने अधिक केस पांढरे होतात का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

जेव्हा एखाद्याला त्याचा पहिला पांढरा केस दिसतो तेव्हा त्यांना दिल्या जाणाऱ्या अनेक सल्ल्यांपैकी एक म्हणजे पांढरा केस तोडू नका. का? कारण असे मानले जाते की. तुमचे पांढरे केस उपटल्याने तुमच्या टाळूवर अधिक पांढऱ्या केसांची वाढ होते. पण, हे खरे आहे का?

can plucking grey hair lead to more grey hair know expert advise
Aक पांढरा केस उपटल्याने अधिक केस पांढरे होतात का ( Image Credit : freepik)

आपल्या सर्वांना लांब, चमकदार केस हवे आहेत, ज्यामध्ये पांढरे केस दिसणार नाहीत. पण, वृद्धत्व, अनुवांशिकता आणि इतर कारणांमुळे केस लवकर किंवा उशीरा पांढरे होतातच. जेव्हा एखाद्याला त्याचा पहिला पांढरा केस दिसतो तेव्हा त्यांना दिल्या जाणाऱ्या अनेक सल्ल्यांपैकी एक म्हणजे पांढरा केस तोडू नका. पण का? कारण असे मानले जाते की, तुमचे पांढरे केस उपटल्याने तुमच्या टाळूवर अधिक पांढऱ्या केसांची वाढ होते. पण, हे खरे आहे का? याबाबत डर्मटॉलॉजिस्ट, डॉक्टर जुश्या सरीन यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी ”हे एक मोठे असत्य आहे” असे सांगतिले. पांढरे केस तोडल्यामुळे ते आणखी वाढता या मोठ्या प्रमाणावर विश्वास असलेल्या मिथकाचा पर्दाफाश केला आहे.

”प्रत्येक केस दुसर्‍यापासून स्वतंत्र आहे. तुमचे केस ऑक्सिडेटिव्ह नुकसानीमुळे रंग गमावतात. आनुवंशिकता आणि पौष्टिक कमतरता देखील याला कारणीभूत ठरू शकतात,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ”अशा प्रकारे, एक केस ओढल्याने शेजारच्या केसावर परिणाम होणार नाही. “जर तुमचे केस पांढरे होत असतील तर याचा अर्थ तुमचे केस नैसर्गिक मार्गाने जात आहेत. हे तुम्ही घेत असलेल्या पोषणावर आणि तुमच्या आनुवंशिकतेवर अवलंबून असू शकते,” असे डॉ सरीन यांनी सांगितले.

पांढरे केस उपटू नये कारण…

तुमचे केस पांढरे होत असल्यास, तुम्ही त्यांना रंगवू शकता, पण, जर तुम्हाला अजूनही केस पूर्णपणे काढून टाकायचे असतील, तर प्लकिंग हा चांगला पर्याय नाही, असे तज्ञांनी सांगितले. “कटिंग हा एक चांगला पर्याय आहे. याचे कारण असे की, केस उपटण्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांना इजा होऊ शकते, दाह होऊ शकतो आणि टक्कल पडू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

इन्फ्लूएंझा व्हायरस विरोधात लढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

एक पांढरा केस तोडल्याने इतर केस पांढरे होत नाही.

याबाबत सहमती दर्शविताना द एस्थेटिक क्लिनिक्सचे कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट आणि डर्माटो-सर्जन आणि डर्माटॉलोजिस्ट सल्लागार डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले की, जर तुम्ही ते केस तुमच्या डोक्यावरून काढून टाकले असतील तर तुम्हाला त्रासदायक केस वाढू लागतील याची काळजी करण्याची गरज नाही.

“एक पांढरा केस काढल्याने त्याच्या जागी आणखी दहा केस वाढतील हे अगदीच असत्य आहे. प्रत्येक कूपातून फक्त एकच केस विकसित होत असल्याने, एक पांढका केस उपटल्याने फक्त नवीन पांढऱ्या केसांची वाढ होते. तुमच्या आजूबाजूचे केस पांढरे होण्याआधीच त्यांच्याच कूपांमध्ये रंगद्रव्य पेशींचा नष्ट होतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तुम्ही पांढरा केस उपटता तेव्हा काय होते?

जेव्हा तुम्ही पांढरा केस उपटता तेव्हा काय होते हे स्पष्ट करताना, डर्माटोलॉजिस्ट यांनी स्पष्ट केले की, तुम्ही केस उपटल्यानंतर त्या जागी नवीन केस वाढतील. “रंगद्रव्य निर्माण करणार्‍या पेशी यापुढे सक्रिय नसल्यामुळे नवीन केस देखील पांढरे होतील. केसांच्या कूपांना उपटून दुखापत होऊ शकते आणि कोणत्याही कूपावर वारंवार ताण दिल्यास संसर्ग होऊ शकतो, चट्टे तयार होतात, आणि अगदी टक्कल पडू शकतो.

केस पांढरे होणे कसे टाळायचे?

डॉ कपूर यांनी सांगितले की, आनुवंशिकता किंवा वय दोषी असल्यास कोणतीही प्रक्रिया थांबवू शकत नाही, परंतु जर वैद्यकीय समस्येमुळे रंग कमी झाला असेल तर, पांढऱ्या केसांवर उपचार केल्याने रंगद्रव्ये पुन्हा दिसू शकतात.

“अकाली पांढऱ्या केसांसाठी आहार आणि व्हिटॅमिनची कमतरता कारणीभूत असेल तर परिस्थिती पूर्ववत होऊ शकते किंवा खराब होण्यापासून ते रोखले जाऊ शकते. आहाराच्या सवयींमुळे केस पांढरे होणे टाळता येते. अँटिऑक्सिडंट्स जास्त असलेल्या आहाराने ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी केला जाऊ शकतो ,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Diabetes: मधुमेहींनी आंबा खाणं कितपत फायद्याचं ? जाणून घ्या किती प्रमाणात खावा

पांढरे केस होऊ नये यासाठी कसा असावा आहार?

तज्ज्ञांनी सांगितले आहे की, अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नांमध्ये ताजी फळे आणि भाज्या, ग्रीन टी, ऑलिव्ह ऑईल आणि सीफूड यांचा समावेश आहे.

“ज्यांना व्हिटॅमिनची कमतरता आहे ज्यांचे केस पांढरे आहेत त्यांनी त्या जीवनसत्त्वांनी भरपूर जेवण खावे. उदाहरणार्थ, दूध, सॅल्मन आणि चीज हे व्हिटॅमिन डीचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, तर शेलफिश, अंडी आणि मांस हे व्हिटॅमिन बी-12चे अद्भुत स्रोत आहेत. ओव्हर-द-काउंटर व्हिटॅमिन सप्लिमेंट्सने देखील ही कमतरता दूर केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 11:31 IST

संबंधित बातम्या