PCOS Pregnancy Problems: सौ. अबक यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली.. त्यांचा बॉडी मास इंडेक्स २८ आहे.. त्यांना काही वर्षांपूर्वीच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) चे निदान झाले होते. यामुळे त्यांना अनियमित पाळी, पुरळ आणि हर्सुटिझमचा त्रास होताच. अशा स्थितीत त्या मागील तीन वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होत्या. जीवनशैलीत बदल, आहार आणि व्यायामामुळे त्यांनी आठ महिन्यांत सुमारे २३ किलो वजन कमी केले. यामुळे त्यांना पाळी नियमित येण्यास मदत झाली. आणि काहीच दिवसात त्यांना नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा झाली. नऊ महिन्यांच्या शेवटी त्यांनी निरोगी बाळाला जन्म दिला.

सौ. अबक यांच्याबाबत हे जरी शक्य झाले असले तरी इथे महत्त्वाचा प्रश्न आहे की, PCOS असलेल्या महिला नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकतात का? आज आपण याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर व यावरील उपाय डॉ शफालिका, सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोग, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

PCOS महिलांच्या जननक्षमतेवर कसा परिणाम करते? (PCOS Effect On Pregnancy)

PCOS असणा-या महिलांना साधारणपणे अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि मुरुमांचा त्रास होतो. हार्मोनल असंतुलनामुळे PCOS चे त्रास वाढत जातात. अशात शरीरामध्ये पुरुषांच्या हार्मोन्सची वाढ किंवा जास्त इन्सुलिनमुळे मासिक पाळीत अडथळा येतो आणि हार्मोनल असंतुलन वाढते. PCOS रुग्णांमध्ये अनियमित मासिक पाळी गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण करते कारण हार्मोनल असंतुलन झाल्याने ओव्हरीच्या भिंती अधिक जाडसर होतात आणि ओव्हरीमधून एग्ज (अंडी) सोडण्यास अडथळा निर्माण होतो.

PCOS असलेल्या महिलांमध्ये त्यांच्या एक किंवा दोन्ही अंडाशयांवर सामान्य अँट्रल फॉलिकल संख्या (20 ते 30+) जास्त असते. अ‍ॅन्ड्रोजेन आणि इतर सेक्स हार्मोन्सचे अधिक प्रमाण एंट्रल फॉलिकलच्या वाढीमध्ये व्यत्यय आणतात. याशिवाय, हार्मोनल असंतुलनामुळे फॉलिकल्स अयोग्यरित्या परिपक्व होऊ शकतात. मासिक पाळीच्या दरम्यान जेव्हा एग्ज (अंडी) रिलीज करत नाही, तेव्हा त्याला अॅनोव्ह्यूलेशन म्हणतात. एनोव्ह्युलेटरी वंध्यत्व असलेल्या बहुतेक स्त्रिया PCOS ने ग्रस्त असल्याचे आढळले आहे.

PCOS वयानुसार वाढू शकते का? (PCOS Increases With Age)

PCOS साधारण तरुण वयात वाढू शकतो. अलीकडील जीवनशैलीतील बदलांमुळे १७ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना सुद्धा या समस्येने ग्रासले आहे. मासिक पाळीच्या व्यत्ययाव्यतिरिक्त, PCOS मुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जसजसे वय वाढते तसतसे PCOS ची तीव्रताही वाढते.

PCOS असताना नैसर्गिक गर्भधारणेसाठी काय करायला हवे? (How To Cure PCOS)

आठवड्यातून किमान पाच दिवस किमान ४५ ते ५० मिनिटांचा उच्च तीव्रतेचा व्यायाम आवश्यक आहे. याशिवाय योग आणि ध्यानाद्वारे तणाव कमी करणे, फळे, भाज्या, पालेभाज्या आणि संपूर्ण धान्य या स्वरूपात भरपूर फायबर घेणे यामुळे हार्मोनल असंतुलन निश्चितपणे कमी होऊ शकते. २५ टक्के आहार सूत्राचे पालन करा, म्हणजे प्रत्येकी 25 टक्के भाज्या, प्रथिने, फळे आणि कार्ब्स. लक्षात घ्या, अगदी पाच टक्के वजन कमी करणे ही सुद्धा हार्मोनल असंतुलन कमी करू शकते.

शरीरातील हार्मोनल असंतुलन कमी झाल्यावर, अंडाशयातून एग्ज सोडण्याची किंवा उत्स्फूर्त ओव्हुलेशनची शक्यता आपोआप वाढते. एकदा ही प्रक्रिया नियमित झाली की, नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता अधिक असते.

हे ही वाचा<< तुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि… 

याशिवाय आपल्याला काहीवेळा वैद्यकीय मदत घ्यावी लागू शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टर प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंट्ससह सायकलच्या दुसऱ्या सहामाहीत ओव्हुलेशन इंडक्शन ड्रग्ससह मदत करतात. साधे वैद्यकीय उपाय आणि जीवनशैलीतील बदल अयशस्वी झाल्यास, लॅपरोस्कोपिक डिम्बग्रंथि ड्रिलिंग या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो.