'या' ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला | Cashew Can Increase threat of Blood Pressure Heart Attack Kidney Stone Watch Side Effect of Kaju For Three diseases | Loksatta

‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला

Bad Side Effects of Cashews: रिकाम्या पोटी चुकूनही काजूचे सेवन करू नये. असे कोणते आजार आहेत ज्यात काजूच्या सेवनाने धोका उद्भवतो हे जाणून घेऊयात..

‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
'या' ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Bad Side Effects of Cashews: सुका मेवा खाणे हे शरीरासाठी लाभदायक असल्याचे आपण वर्षानुवर्षे ऐकलं आहे. विशेषतः काजू बदामाचे सेवन थंडीत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते. काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, लोह, मँगनीज व सेलेनियम यांसारखी सत्व आढळतात. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका लेखातही याविषयी विशेष उल्लेख आढळतो, संशोधन सांगते की, सुका मेवा खाल्ल्याने हृदय विकार, कॅन्सर, श्वसनाच्या समस्यांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो. काजूमध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण मुबलक असते परिणामी याचे फायदेही अनेक आहेत. मात्र काही व्यक्तींसाठी काजूचे सेवन हे अत्यंत अपायकारक ठरू शकते. विशेषतः रिकाम्या पोटी चुकूनही काजूचे सेवन करू नये. असे कोणते आजार आहेत ज्यात काजूच्या सेवनाने धोका उद्भवतो हे जाणून घेऊयात..

हाय ब्लड प्रेशर

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार १०० ग्राम काजू मध्ये तब्बल ८ ते १० चमचे तेल असू शकते, तसेच काजूमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तीला सोडियममुळे आणखी त्रास होऊ शकते. याशिवाय काजूमध्ये ट्रायग्लिसराईडही अधिक प्रमाणात आढळते परिणामी हृदय विकारांचा धोका वाढू शकतो.

हे ही वाचा<< ‘या’ ब्लड ग्रुपला असतो हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! यात तुमचा तर सहभाग नाही ना? जाणून घ्या

एसिडिटी किंवा गॅस

डॉक्टरांच्या माहितीनुसार काजूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जेव्हा आपण रिकाम्या पोटी काजूचे सेवन करता तेव्हा शरीरात फायबरचे प्रमाण वाढून ऍसिडिटी व गॅसची समस्या वाढू शकते.

किडनीचे विकार

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार ज्यांना किडनी संबंधित विकारांचा त्रास आहे त्यांना काजू अपायकारक ठरू शकतो. काजूमधील पोटॅशियममुळे किडनीच्या समस्यां आणखीन गंभीर होऊ शकतात. यामुळेच जर मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांना सुद्धा काजूचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

हे ही वाचा<< हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल; वेळीच सावध व्हा

किती काजू खाणे आहे योग्य?

जरी तुम्हाला वरीलपैकी कोणताही त्रास नसेल व तुम्ही पूर्णतः स्वस्थ असाल तरीही तुम्हाला काजूचे प्रमाणात सेवन करायला हवे. अभ्यासकांच्या माहितीनुसार एका स्वस्थ व्यक्तीने दिवसात ४-५ काजू खाल्ल्यास शरीराला फायदा मिळू शकतो. काजूचे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट, नटी इन्फ्लेमेंटरी घटक शरीरासाठी गुणकारी ठरू शकतात. मात्र तुम्हाला वरीलपैकी कोठेही त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काजूचे सेवन करावे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 14:12 IST
Next Story
‘हे’ ५ पदार्थ ५०% यूरिक ॲसिड झपाट्याने काढून टाकतील; जाणून घ्या यादी