What Is Colon Cancer Early Signs: कोलन कर्करोग हा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो मोठ्या आतड्यात (कोलन) आणि गुदाशयात विकसित होतो. हा प्राणघातक असू शकतो. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यावर या कर्करोगाचे निदान झाल्यास तो बरा होण्याची शक्यता आहे. इतर आजार, किंबहुना कॅन्सरच्या अन्य प्रकारांपेक्षाही कोलन कर्करोगाची लक्षणे अत्यंत सामान्य असतात, त्यामुळे साहजिकच ती ओळखता येणे शक्य होत नाही. यामुळेच उपचाराला उशीर होऊन आव्हाने वाढू शकतात. आज आपण आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार कोलन कर्करोगाची काही लक्षणे जाणून घेणार आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलन कर्करोगाची लक्षणे (Colon Cancer Signs)

१) डॉ. स्नीता सिनुकुमार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, पुणे यांनी टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार पचन व शौचाच्या सवयींमध्ये बदल जाणवणे खूप सामान्य आहे. पण, जर हे वारंवार होत असेल; म्हणजेच सतत अतिसार, बद्धकोष्ठता किंवा विष्ठेच्या सुसंगततेत बदल होत असेल तर ते कोलन कर्करोगाचे लक्षण असू शकते.

२) अनपेक्षितपणे वजन झपाट्याने कमी होणे हेसुद्धा कोलन कॅन्सरसह अनेक रोगांचे लक्षण असू शकते. आहार किंवा व्यायामाच्या दिनचर्येत बदल न करता जर एखाद्या व्यक्तीचे वजन लक्षणीय प्रमाणात कमी झाले असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

३) सतत ओटीपोटात दुखणे, पेटके येणे किंवा अस्वस्थता हे कोलन कर्करोगासह अनेक परिस्थितींचे लक्षण असू शकते.

४) विष्ठेमध्ये रक्त दिसणे हे मुख्यतः मूळव्याध किंवा त्वचारोगाचेसुद्धा लक्षण असू शकते, पण या शक्यता वगळल्यासही हा त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेट देणे आवश्यक असते.

५) थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे हे कोलन कॅन्सरसह अनेक आजारांचे लक्षण असू शकते. आळशीपणा आणि अशक्तपणा सतत जाणवत असल्यास व इच्छा असूनही काम करायची इच्छा होत नसल्यास एकदा डॉक्टरांशी चर्चा करणे उत्तम ठरेल.

हे ही वाचा<< भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ व पद्धत

हे लक्षात घ्या की, यांपैकी बरीच लक्षणे इतर परिस्थितींमुळेदेखील होऊ शकतात आणि कोलन कर्करोग असलेल्या प्रत्येकाला त्या अनुभवास येत नाहीत. पण, यांपैकी कोणत्याही लक्षणांचा आपल्याला वारंवार त्रास होत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colon cancer early signs extreme tiredness constipation irregular bowl movements how to identify cancer at early stage health expert svs
First published on: 27-03-2023 at 16:31 IST