स्वयंपाकघरातील एखादा गोड पदार्थ बनविण्यासाठी काजू; तर परीक्षेदरम्यान अनेकदा आई आपल्याला बदाम खायला देते. त्यामुळे काजू, बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर असे वेगवेगळे सुक्या मेव्याचे प्रकार प्रत्येकाच्या घरात हमखास दिसून येतात. या सुक्या मेव्यामध्ये अनेक पोषक घटक असतात; ज्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने याचा डाएटमध्येही उपयोग करून पाहतात. पण, ही गोष्टही तितकीच खरी आहे की, आरोग्यासाठी सुका मेवा हा फारच फायद्याचा असतो. तर या काजू, बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर यांबरोबरच ब्राझील नट (Brazil nut) खाण्याचेसुद्धा आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझील नट म्हणजे काय?

अनेक आवश्यक पोषक घटकांचे स्रोत असणारे ‘ब्राझील नट’ हे दक्षिण अमेरिकेतील झाडापासून मिळतात. तसेच हे सॅलड, सॉस, स्मूदी व बटर यांसह विविध पदार्थांमध्ये वापरले जातात.

हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय ?

न्यूट्रिशनिस्ट आणि कंटेंट क्रिएटर दीपशिखा जैन यांनी अलीकडेच एका रीलमध्ये दावा केला आहे की, हायपोथायरॉइडिझम असलेल्यांसाठी हे ब्राझील नट खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. तर हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? हायपोथायरॉइडिझम; ज्याला अंडरॲक्टिव्ह थायरॉईडदेखील म्हणतात. यामध्ये थायरॉईड ग्रंथी तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात थायरॉईड संप्रेरक तयार करीत नाही.थायरॉईड ही एक छोट्या आकाराची ग्रंथी आहे; जी बहुदा तुमच्या गळ्याच्या येथे असते.

हेही वाचा…कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे ब्राझील नट खाण्यापूर्वी ते स्वच्छ भिजवून घ्यावेत. ब्राझील नट्समध्ये योग्य प्रमाणात सेलेनियम असते; जे हायपोथायरॉईड रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असते आणि ते थायरॉईड ग्रंथी पुन्हा सक्रिय करण्यास मदत करतात’, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

तर या थिअरीची (Theory) पुष्टी करण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार, आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक, कनिक्का मल्होत्रा ​​आणि बीएलके मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डायबिटीज, थायरॉईड, लठ्ठपणा व एंडोक्रायनोलॉजीचे वरिष्ठ संचालक डॉक्टर अशोक कुमार झिंगन यांच्याशी संवाद साधला.

अशोक कुमार झिंगन आणि डॉक्टर कनिक्का मल्होत्रा ​​यांच्या म्हणण्यानुसार, हायपोथायरॉइडिझमची लक्षणे सुरुवातीला सूक्ष्म असू शकतात. जसे की थकवा, वजन वाढणे व थंडी जाणवणे. पण, या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास त्यामुळे अधिक गंभीर आणि प्रतिकूल आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. थायरॉईड टिश्यूमध्ये सेलेनियमचे प्रमाण सर्वाधिक असते; जे थायरॉईड संप्रेरक T3, तसेच प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक असतात; जे थायरॉइडचे सेल्युलर नुकसानीपासून (डॅमेज) संरक्षण करतात.

ब्राझील नट्समध्ये अशी काही विशिष्ट पोषक किंवा संयुगे आढळतात का; ज्यामुळे हायपोथायरॉईडिझम असलेल्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो?

डॉक्टर अशोक कुमार झिंगनदेखील या गोष्टीशी सहमत आहेत की, ब्राझील नट्समध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त असते; जे शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात. जसे की, सेलेनियम थायरॉईडचे कार्य सुनिश्चित करते आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यास मदत करते. सेलेनियमची उच्च पातळी तुमची रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत करण्यास मदत करू शकते. तसेच डॉक्टर कनिक्का मल्होत्रासुद्धा एकमताने म्हणाल्या की, हायपोथायरॉइडिझम असलेल्यांना थायरॉइडच्या योग्य कार्यास समर्थन देण्यासाठी ब्राझील नट्समधील सेलेनियम सामग्रीचा फायदा होऊ शकतो.

ब्राझील नट्सचे सेवन थायरॉईड औषधांमध्ये व्यत्यय आणू शकते किंवा थायरॉईडशी संबंधित लक्षणे वाढवू शकते का?

जास्त प्रमाणात ब्राझील नट्सचे सेवन केल्याने मळमळ, उलट्या आणि तुमच्या तोंडात मेटॅलिक चव (टेस्ट) आदी समस्या उदभवू शकतात. तसेच उच्च सेलेनियम सामग्रीमुळे ब्राझील नट्सचे अति प्रमाणात सेवन केल्याने थायरॉईड औषधांमध्ये व्यत्यय येऊ शकतो किंवा थायरॉईडशी संबंधित लक्षणे वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी सेलेनियमचे संतुलित सेवन करण्याचा सल्ला आणि थायरॉईड औषधांबरोबर ब्राझील नट्सचा वापर किती करायचा हे ठरविण्यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे.

हेही वाचा…१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

दिवसातून ब्राझील नट्सचे किती सेवन करावे?

डॉक्टर अशोक कुमार झिंगन म्हणतात की, दिवसातून फक्त दोन ब्राझील नट्स खाल्ल्याने तुमचे सेलेनियमचे प्रमाण प्रभावीपणे टिकवून ठेवण्यास किंवा वाढविण्यास मदत होऊ शकते.

हायपोथायरॉइडिझमच्या लक्षणांपासून आराम मिळविण्याच्या इतर पद्धती कोणत्या?

हायपोथायरॉइडिझमची लक्षणे दूर करण्यासाठी ब्राझील नट्सचा समावेश करण्याव्यतिरिक्त डॉक्टर अशोक कुमार झिंगन आणि मल्होत्रा ​​यांनी सुचविलेले काही पर्याय खालीलप्रमाणे :

१. आयोडीन, झिंक, लोह आणि जीवनसत्त्वे ए, डी व ई सारख्या आवश्यक पोषक घटकानी समृद्ध संतुलित आहाराचे सेवन करणे.

२. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि थायरॉईड कार्य सुधारण्यास दह्यासारख्या प्रो-बायोटिकने समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करणे.

३. थायरॉईड संप्रेरकांच्या उत्पादनास आणि चयापचय प्रक्रिया सुधारण्यास झिंकने समृद्ध अन्नाचे सेवन करावे.

४. चयापचय आणि आरोग्यास समर्थन देणारे व्यायाम नियमित करणे.

५. थायरॉईडच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मायक्रोबायोटासाठी आंबलेल्या पदार्थांचे सेवन करणे.

६. पुरेशी झोप घ्यावी.

७. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यासाठी ऑटोइम्युन थायरॉईड रुग्णांनी ग्लुटेनमुक्त आहाराचे सेवन करावे.

८. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर विपरीत परिणाम टाळण्यासाठी आयोडीनचे जास्त सेवन टाळणे आणि आहारातील पूरक आहाराबाबत सावधगिरी बाळगणे.

९. तसेच जळजळ कमी करण्यासाठी आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्याला समर्थन देण्यासाठी फॅटी माशांमध्ये आढळणाऱ्या ओमेगा -3 फॅटी ॲसिडचे सेवन वाढवा. अशा रीतीने आज आपण या लेखातून ब्राझील नट्सच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे पाहिले

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consuming brazil nut nuts to help relieve the symptoms of hypothyroidism benefits of nuts help provide some relief asp