disadvantages of coconut: नारळ हा अनेक प्रकारे खाल्ला जातो. नारळ कच्चा खाल्ला जाते, त्याचे पाणी प्यायले जाते आणि त्याचे तेल काढल्यानंतर सेवन केले जाते. हे अनेक गोड किंवा चवदार पदार्थांमध्ये वापरले जाते. नारळाच्या पाण्यापासून ते नारळाच्या सेवनापर्यंत आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त नारळ शरीर निरोगी ठेवते. कच्च्या नारळात तांबे, सेलेनियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक सारखी खनिजे असतात जी शरीराला निरोगी ठेवतात.

नारळ तर उपयोगी आहेच पण त्याचे पाणी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. अँटी-ऑक्सिडंट गुणांनी युक्त नारळ त्वचा निरोगी ठेवते. व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी ३ आणि व्हिटॅमिन सी समृद्ध नारळाच्या पाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते.

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज

नारळाचे तेल काढल्यानंतर त्याचे सेवन देखील केले जाते, जे त्वचेपासून केसांपर्यंतच्या समस्या टाळण्यास प्रभावी आहे. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, औषधी गुणधर्मांनी समृद्ध खोबरेल तेलाचे सेवन काही आजारांमध्ये आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. काही आजारांमध्ये नारळाच्या सेवनाने शरीरावर दुष्परिणाम होतात. चला जाणून घेऊया कोणत्या आजारांमध्ये खोबरेल तेल आरोग्यावर विषासारखे काम करते.

( हे ही वाचा: ‘हे’ ५ पदार्थ ५०% यूरिक ॲसिड झपाट्याने काढून टाकतील; जाणून घ्या यादी)

हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते: (Coconut Harmful For Heart Health)

नारळाचे अतिसेवन आरोग्यावर विषासारखे काम करते. यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननेही नारळ आणि त्याचे तेल हृदयासाठी धोकादायक मानले आहे. याचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढते ज्यामुळे हृदयविकार वाढतात.

वजन जास्त असल्यास नारळ खाऊ नका: (Coconut Can Increase Weight)

ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी चुकूनही नारळाचे सेवन करू नये. नारळाचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. नारळात कॅलरी कमी, साखर आणि तेल जास्त असते. त्याच्या अतिसेवनाने वजन झपाट्याने वाढू शकते.

( हे ही वाचा: ‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या)

पचनाची समस्या असल्यास नारळापासून दूर राहा: (Harmful For Digestion)

ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी नारळ, नारळ पाणी आणि त्याचे तेल वापरणे टाळावे. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे सूज येणे, जुलाब आणि पोट फुगणे या समस्या वाढू शकतात.