scorecardresearch

Premium

Binge Drinking : महिन्यातून एकदा दारूचे अतिसेवन केल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

सध्या मद्यपानामध्ये ‘बिंज ड्रिंकिंग’ (Binge drinking) नावाचा एक नवा प्रकार आला आहे. जे लोक महिन्यातून एकदाच मद्यपान करतात, पण त्यावेळी अति प्रमाणात दारूचे सेवन करतात, यालाच ‘बिंज ड्रिंकिंग’ म्हणतात. महिन्यातून एकदा अति प्रमाणात मद्यपान केले तरीही त्याचा शरीरावर आणि स्नायूंवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. नियमित मद्यपान केल्यामुळे शरीरावर जितका दुष्परिणाम होतो, तितका नकारात्मक परिणाम या ‘बिंज ड्रिंकिंग’ प्रकारामुळे होत नाही, तरीसुद्धा ‘बिंज ड्रिंकिंग’ आरोग्यास धोकादायक ठरू शकते

what is Binge Drinking
महिन्यातून एकदा दारूचे अतिसेवन केल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो का? (Photo : Loksatta Graphics Team)

Binge Drinking : मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, तरीसुद्धा काही लोक आरोग्याची पर्वा न करता मद्यपान करतात. सध्या मद्यपानामध्ये ‘बिंज ड्रिंकिंग’ (Binge drinking) नावाचा एक नवा प्रकार आला आहे. जे लोक महिन्यातून एकदाच मद्यपान करतात, पण त्यावेळी अति प्रमाणात दारूचे सेवन करतात, यालाच ‘बिंज ड्रिंकिंग’ म्हणतात.

महिन्यातून एकदा अति प्रमाणात मद्यपान केले तरीही त्याचा शरीरावर आणि स्नायूंवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. नियमित मद्यपान केल्यामुळे शरीरावर जितका दुष्परिणाम होतो, तितका नकारात्मक परिणाम या ‘बिंज ड्रिंकिंग’ प्रकारामुळे होत नाही, तरीसुद्धा ‘बिंज ड्रिंकिंग’ आरोग्यास धोकादायक ठरू शकते आणि तुमच्या फिटनेसमध्ये अडचणी निर्माण करू शकते. याविषयी उदयपूरच्या पारस हेल्थ, इंटरनल मेडिसिनचे संचालक डॉ. मधू नहर यांनी सविस्तर सांगितले.

Five Foods To Eat on Empty Stomach First Thing In Morning Detoxing Stomach Intestine Constipation Cure In Marathi Indian Dishes
रिकाम्या पोटी ‘या’ पाच भारतीय पदार्थांचं सेवन केल्याने प्रत्येक सकाळ होईल सुंदर; पोट स्वच्छ होत नसेल तर पाहाच
Temperature Fluctuations, increasing, Health Issues, Doctors, advise, caring, body parts, pune,
तापमानातील चढ-उतारामुळे आरोग्याला धोका! आरोग्यतज्ज्ञ सांगताहेत कशी काळजी घ्यावी…
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
inflammation food body reduce intake health special
Health Special: काय खाण्याने अंतर्गत शारीरिक दाह कमी होतो?

दारूच्या सेवनामुळे शरीरातील पेशी जेव्हा प्रोटिन्स बनवतात, तेव्हा अडथळा निर्माण होतो. हे प्रोटिन्स स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असतात.
डॉ. नहर सांगतात, “सतत मद्यपान केल्यामुळे वर्कआउटनंतर शरीरातील प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात.”
मद्यपानामुळे शरीरातील लघवीचे प्रमाणसुद्धा वाढते आणि सतत घाम येतो. अशा वेळी स्नायूंची ऊर्जा कमी होते, त्यामुळे वर्कआउट करताना स्नानू नीट काम करत नाही.

हेही वाचा : नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

डॉ. नहार सांगतात, अति प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरातील पेशींना स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजांसारखे पोषक तत्त्वे शोषून घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.”
दारूमुळे टेस्टोस्टेरॉनसारखे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. हे हार्मोन्स स्नायूंच्या विकासासाठी अत्यंत गरजेचे असतात. अति प्रमाणात मद्यपान केल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढतो, त्यामुळे स्नायूंची वाढ थांबते.

डॉ. नहार पुढे सांगतात, “शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणे, संतुलित आहार घेणे आणि शरीराला पुरेसा वेळ देणे, यामुळे मद्यपानाचा नकारात्मक प्रभाव कमी करता येऊ शकतो. स्नायूंच्या विकासासाठी मर्यादित प्रमाणात दारूचे सेवन करणे गरजेचे आहे, यामुळे तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Consuming excessive amounts of alcohol once a month affect muscle growth read what expert said and know more about what is binge drinking ndj

First published on: 28-09-2023 at 14:37 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×