ऑस्ट्रेलियाच्या औषध नियामकाने म्हटले आहे,”जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी६ घेतल्याने दुष्परिणामही होतात, ज्यामध्ये मज्जातंतूंचे नुकसानही समाविष्ट आहे. हे आपल्या कल्पनेपेक्षा जास्त व्यापक असू शकते. या आठवड्याच्या सुरुवातीला एबीसीच्या एका अहवालात, थेराप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशन (टीजीए) च्या प्रवक्त्याने म्हटले आहे, “त्यांनी व्हिटॅमिन बी६ सप्लिमेंट्सच्या दुष्परिणामांच्या व्याप्तीला कमी लेखले असावे.”
पण, सुरक्षेच्या कारणास्तव उच्च प्रमाणाच्या विक्रीवर मर्यादा घालण्याचे प्रस्ताव मांडले आहेत.
ऑस्ट्रेलियातील रक्त नमुन्यांमध्ये व्हिटॅमिन बी ६ ची चाचणी करणारे क्लिनिक चालविणारे एक पॅथॉलॉजिस्टदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी एबीसीला सांगितले,”मे महिन्यातील डेटावरून असे दिसून येते की, ‘चाचणी केलेल्या ४.५ टक्के नमुन्यांमध्ये मज्जातंतूंचे नुकसान होण्याची ‘बहुधा’ शक्यता असल्याचे दिसून आले आहे.”
तर व्हिटॅमिन बी ६ पूरक आहार म्हणजे काय? तो विषारी कसा असू शकतो? आणि तुम्हाला कोणत्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे?
व्हिटॅमिन बी६ म्हणजे काय?(What is vitamin B6?)
व्हिटॅमिन बी६, ज्याला पायरीडॉक्सिन (pyridoxine), असेही म्हणतात. शरीर निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते अन्नातील प्रथिने, कर्बोदके व फॅट्सच्या चयापचयात सहभागी असते. मेंदूतील रासायनिक संदेशवाहक (chemical messengers) – न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन करण्यासाठीदेखील ते महत्त्वाचे आहेत, जे त्याचे कार्य करण्यास आणि तुमचा मूड नियंत्रित करतात.
व्हिटॅमिन बी६ अँटीबॉडीज तयार करण्यास मदत करून रोगप्रतिकार शक्तीलादेखील समर्थन देते, जे संक्रमणांशी लढतात आणि शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींमध्ये प्रथिने, हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी ते आवश्यक आहे.
काही महिला गर्भवती असताना व्हिटॅमिन बी६ सप्लिमेंट घेतात. असे मानले जाते,”यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात होणारी मळमळ कमी होण्यास मदत होते. काही महिला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोममध्ये मदत करण्यासाठीदेखील ते घेतात.
पण, बहुतेक लोकांना व्हिटॅमिन बी६ सप्लिमेंटची आवश्यकता नसते आणि त्याचा फायदा होणार नाही. कारण- तुम्हाला मांस, नाश्त्यातील धान्य, फळे व भाज्यांद्वारे तुमच्या आहारातून पुरेसे व्हिटॅमिन बी६ मिळते.
तुम्हाला व्हिटॅमिन बी६ ची जास्त गरज नाही. बहुतेक प्रौढांसाठी दररोज १.३-१.७ मिलिग्रॅमचा डोस पुरेसा असतो.
सध्या ५ ते २०० मिलिग्रॅमच्या दैनिक डोससह व्हिटॅमिन बी६ सप्लिमेंट्स हेल्थ फूड स्टोअर्स, सुपरमार्केट आणि फार्मसीमध्ये काउंटरवर विकले जाऊ शकतात.
सुरक्षिततेच्या कारणास्तव टीजीए त्यांची विक्री फार्मसीमध्ये मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव देत आहे आणि केवळ फार्मासिस्टशी सल्लामसलत केल्यानंतर हे ठरवले जाते. २०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त दैनिक डोससाठी आधीच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते. म्हणून प्रस्तावानुसार ते तसेच राहील.
जर तुम्ही जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी६ घेतले, तर बहुतेक प्रकरणांमध्ये जास्त प्रमाणात ते तुमच्या मूत्रातून बाहेर टाकले जाईल आणि बहुतेक लोकांना त्याचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत. परंतु, दीर्घकाळ जास्त डोसमध्ये घेणाऱ्यांबाबात चिंता वाढत आहे.
वैद्यकीय समुदायाला ज्या दुष्परिणामांची चिंता आहे, तो म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी- जिथे मेंदू आणि पाठीच्या कण्याबाहेरील नसांना नुकसान होते. त्यामुळे वेदना, सुन्नपणा किंवा अशक्तपणा येतो. सहसा तुमच्या हातपायांची ही स्थिती कशी होते हे अद्याप माहीत नाही.
नोंदविल्या गेलेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्ही सप्लिमेंट घेणे थांबवल्यानंतर ही लक्षणे गायब होतात. परंतु, काही लोकांना पूर्णपणे बरे वाटण्यासाठी तीन महिने ते दोन वर्षे लागू शकतात.
जास्त काळासाठी जास्त डोस (दररोज ५० मिलिग्रॅमपेक्षा जास्त) घेतल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. याचे पुरावे वाढत आहेत; परंतु ते कधी कधी परस्परविरोधी (contradictory) आहेत.
१९९० च्या दशकातील एका अभ्यासात ७० रुग्णांवर पाच वर्षे लक्ष ठेवण्यात आले होते, ज्यांनी दररोज १०० ते १५० मिलिग्रॅमचा डोस घेतला. त्यामधून न्यूरोपॅथीचे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नव्हते.
परंतु, अलीकडील अभ्यासातून दुष्परिणामांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.
२०२३ च्या एका केस रिपोर्टमध्ये एका पुरुषाची माहिती देण्यात आली आहे, जो अनेक सप्लिमेंट्स घेत होता. त्यामुळे त्याला दररोज ९५ मिलिग्रॅम व्हिटॅमिन बी६ चा डोस मिळाला आणि त्याला न्यूरोपॅथीसंबंधित त्रास झाल्याचा अनुभव आला.
दुसऱ्या रिपोर्टमध्ये व्हिटॅमिन बी६ असलेले एनर्जी ड्रिंक्स पिण्याशी संबंधित न्यूरोपॅथीच्या सात प्रकरणांचे वर्णन केले आहे.
टीजीएच्या प्रतिकूल घटनांच्या सूचनांच्या डेटाबेसमधील अहवाल (रिपोर्ट केलेल्या दुष्परिणामांचा रेकॉर्ड) २०२३ पासून व्हिटॅमिन बी६ वापराशी न्यूरोपॅथीसंबंधित त्रास झाल्याचे १७४ प्रकरणे समोर आले आहे.
व्हिटॅमिन बी६ घेतल्यास काय करावे? (What should I do if I take vitamin B6?)
सध्याचा सल्ला असा आहे की, जो कोणी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ दररोज ५० मिलिग्रॅम किंवा त्याहून अधिक डोस घेतो, त्याचे आरोग्य सेवा व्यावसायिकाने निरीक्षण केले पाहिजे. म्हणून जर तुम्ही नियमितपणे व्हिटॅमिन बी६ सप्लिमेंट्स घेत असाल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा फार्मासिस्टशी सतत वापरण्याबद्दल चर्चा करावी.
तीन दुष्परिणामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पहिले दोन न्यूरोपॅथीशी संबंधित आहेत:
- पाय आणि हात सुन्न होणे किंवा वेदना
- स्नायू कमकुवत झाल्यामुळे संतुलन आणि समन्वयात अडचण
- छातीत जळजळ आणि मळमळ.
व्हिटॅमिन बी६ सप्लिमेंट्स घेतल्यानंतर तुम्हाला चिंताजनक दुष्परिणाम होत असतील, तर सल्ल्यासाठी तुमच्या राज्यातील विष माहिती केंद्राशी (poison information centre ) १३ ११ २६ वर संपर्क साधा.