AIIMS Study Report: करोनाचे संक्रमण, दरवर्षी येणारे नवे व्हेरियंट यामुळे अगोदरच जगभरात चिंता पसरली आहे. अजूनही जगावरून करोनाचे सावट टळलेलं नाही. चीनसहित काही देशांमध्ये अजूनही करोनाचे रुग्ण आढळत आहेत. करोनावर मात केल्यावरही आपण पूर्णतः सुरक्षित आहात का हा ही प्रश्न आहेच. याचे कारण म्हणजे अलीकडे AIIMS रुग्णालयाने सादर केलेल्या अहवालातून असे समोर आले आहे की, करोना झालेल्या पुरुषांच्या वीर्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होतो. अनेक तरुण पुरुषांमध्ये यामुळेच इन्फर्टिलिटी वाढण्याची चिन्ह आहेत. एम्स पटनाच्या अभ्यासकांनी यासंदर्भात संशोधनासाठी पुरुषांच्या वीर्याचे काही नमुने गोळे केले होते.

ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ या कोविड १९ च्या काळात उपचारासाठी एम्स पटना येथे दाखल झालेल्या रुग्णांच्या वीर्याचे विश्लेषण करण्यात आले होते. हे पुरुष १९-४३ या वयोगटातील होते. यातील नमुने वेगवेगळ्या टप्प्यात गोळा केलेले होते.

dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

पहिला नमुना हा संक्रमणाच्या नंतर लगेच गोळा करण्यात आला होता.दुसरा नमुना हा अडीच महिन्यांनी गोळा करण्यात आला होता. संशोधकांना दिसून आले की करोना संक्रमणाच्या नंतर वीर्याची गुणवत्ता कमी झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान वीर्यात करोना व्हायरसचा अंश मात्र आढळून आला नव्हता. वीर्याची गुणवत्ता की शुक्राणूची संख्या, आकार व वेग यानुसार ठरवली जाते.

हे ही वाचा<< COVID विषयी Whatsapp वर माहिती शेअर केल्यास भरावा लागेल दंड? PIB ने दिलेलं उत्तर नीट वाचा

दरम्यान, क्यूरियस जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्रकाशित एका अहवालात सुद्धा याबाबतचे संशोधन झाले आहे. यासाठी करोना संक्रमणाच्या ३० दिवस नंतर वीर्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. यातील ४०% पुरुषांच्या म्हणजेच १२ पुरुषांच्या स्पर्म काउंटची संख्या कमी झाली होती. अडीच महिन्यांनी १०% म्हणजेच ३ पुरुषांचा स्पर्म काउंट कमी झाला होता.