Dead or alive, cockroaches can trigger allergies : बदलत्या वातारणामुळे सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे अनेकदा सामान्य संसर्गाचे लक्षण समजून दुर्लक्षित केले जाते. यामागील कारण तुमच्या घरातील काना-कोपऱ्यात दडलेले झुरळ असू शकते. एवढंच नव्हेतर जिवंत झुरळ तर त्रासदायक असतेच पण मेलेले झुरळ देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. वैद्यकीय विज्ञानानुसार, फक्त जीवंत नाही तर मेलेले झुऱळ देखील घरातील हवेला विषारी करू शकते जे गंभीर अॅलर्जीच कारण ठरू शकते. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती अस्थमाने पिडित असतील तर तज्ज्ञांच्या मते काय आहे ते जाणून घ्या.
बहुतांश लोक झुरळाला घाबारतात कारण ते अस्वच्छता पसरवते पण तुम्हाला माहित आहे का की फक्त जिवंत झुरळ नव्हे तर मेलेले झुरळ देखील तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. नुकतेच बंगळुरूच्या कॉमेडियन आणि स्टोरीटेल वर्नन जेआर सोशल मीडियावर दावा केला की, त्यांना जीवंत नव्हे मृत झुरळाची अॅलर्जी आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ॲलर्जीचे कारण विषारी वायू नसून, झुरळांद्वारे सोडले जाणारे ॲलर्जन्स आहेत.
तुमच्या घराच्या काना-कोपऱ्या लपलेल्या जीवंत आणि मृत झुरळ अॅलर्जीचे कारण कसे ठरते आणि अस्थमाच्या रुग्णांचा त्रास कसा वाढतो ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
झुरळामुळे कशी होते अॅलर्जी ट्रिगर?
याबाबत शारदा केअर हेल्थ सिटीमध्ये एसोसिएट डायरेक्टर, पल्मोनरी मेडिसिन आणि क्रिटिकल केयर डॉ. हरीश वर्मा के अनुसार,जिवंत आणि मृत दोन्ही प्रकारचे झुरळ अॅलर्जी ट्रिगर करू शकतात. जीवंत झुरळ आपली लाळ, मळ आणि इतर कण मागे सोडून निघून जातात जे घरातील धुळीत मिसळून हवेत पसरतात. तर मृत झुरळाचे शरीराचे विघटनापासून निर्माण झालेल सुक्ष्म कण देखील श्वासातून शरीरात प्रवेश करू शकतात.
डॉ. वर्मा सांगतात की, झुरळाची अॅलर्जी इतकी दुर्मिळ नाही जितकी लोकांना वाटते. ही समस्या विशेषत: गर्दीच्या शहरी ठिकाणी, ओलावा असलेल्या वातावरणात आणि चुकीच्या जीवनशैलीत खराब स्वच्छता असलेल्या स्थानी जास्त पाहायला मिळते. अस्थमा किंवा इतर दुसऱ्या अॅलर्जीमध्ये पीडित लोकांना आणि वयस्कर लोकांना याचा धोका जास्त असतो.
झुरळाची अॅलर्जीचे कारण काय आहे?
झुरळाची अॅलर्जीचे मुख्य स्वरुप मळ, लाळ आणि विघटन झालेले त्वचेचे कण आणि मृत शरीरात असलेले प्रोटीनमुळे होते. हे अलर्जन धुळ आणि हवेद्वारे घरातील वातावरणामध्ये पसरू शकतात. सवेंदनशील लोकांमध्ये या कणांच्या संपर्कात येताच त्यांची रोगप्रतिकारशक्तीवर खूप परिणाम होतो आणि अॅलर्जीचे लक्षण दिसू लागतात.
झुरळाच्या अॅलर्जीमुळे कोणते लक्षण दिसतात
- शिंका येणे
- नाकातून पाणी येणे
- डोळ्यांची खाज होणे
- त्वचेवर लालसर चट्टे उठणे
- खोकला
- सौम्य घरघर जाणवू शकते.
गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
काही प्रकरणामध्ये झुरळाची अॅलर्जी गंभीर स्वरुप घेऊ शकते त्यामुळे
- श्वास घेण्यास अडचण
- तीव्र घरघर
- छातीतमध्ये घट्टपणा जाणवतो
- ओठ निळे पडतात
- चक्कर येणे
- चेहरा अथावा गळ्यावर सूज आल्यासारखे लक्षण दिसू शकतात.
तज्ज्ञांच्या मते,”श्वास घेण्यास अडचण वाढली किंवा चेहरा आणि गळ्याभोवती सूज दिसत असेल तर ती आपात्कालीन स्थिती मानले पाहिजे आणि त्वरित डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.”
जीवाला धोका निर्माण होऊ शकतो का
डॉ. वर्मा यांच्यामते,”गंभीर झुरळाची अलर्जी दम्यांच्या रुग्णांमध्ये धोकादायक अटॅकचे कारण ठरू शकते. वेळीच यावर उपचार न मिळाल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. अशी स्थिती जीवाला धोका निर्माण करू शकते पण लहान मुले, वृद्ध आणि फुप्फुसांच्या आजारांने पीडित लोकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे.
उपाय आणि उपचार
मेडिकल हिस्ट्री, लक्षणे, त्वचा किंवा रक्ताच्या अलॅर्जीचे चाचणीद्वारे झुरळाची अॅलर्जी ओळखता येऊ शकते. यापासून वाचण्यासाठी घरात स्वच्छता ठेवा आणि झुरळांची पैदास रोखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. गरज भासल्यास, डॉक्टर अँटीहिस्टामाइन, नेझल स्प्रे, इनहेलर किंवा इम्युनोथेरपी घेण्याचा सल्ला देऊ शकतात.
