Premium

डिझायनर रोहित बाल हृदय बंद पडल्याने व्हेंटिलेटरवर; अशी स्थिती का उद्भवते, प्राथमिक लक्षणे कशी ओळखाल?

Heart Failure: हृदय बंद पडणे हे अनेकदा रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि प्लेक तयार होण्यासारख्या गोष्टींचा परिणाम असू शकते. यामुळे हृदयात ब्लॉकेज होणे, हृदयातील रक्त प्रवाह कमी होणे व हृदयाच्या पंपिंग कार्यावर परिणाम होणे अशा समस्या उद्भवतात. याची लक्षणे..

Designer Rohit Bal heart failure Primary Signs When heart Stops pumping Blood And Oxygen How To Detect Heart Fail Condition
हार्ट फेल्युअर म्हणजे काय? लक्षणे व उपचार (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rohit Bal Heart Failure: डिझायनर रोहित बाल यांना हार्ट फेल्युअर (हृदय बंद पडणे) चा त्रास झाल्यावर पुन्हा एकदा हृदयविकारांबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अलीकडेच धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे सुद्धा हृदयविकाराने निधन झाले होते. त्यापाठोपाठ आता ही घटना लगेचच घडल्याने हृदय जपण्यासाठी काय करावे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरत आहे. रोहित यांना झालेला त्रास हा भीतीदायक असला तरी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की, हा हृदय निकामी होण्याचा शेवटचा टप्पा नाही उलट याबाबत सतर्क राहून लक्षणे नीट पडताळल्यास तुम्हाला ही स्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. आज आपण इंडियन एक्सस्प्रेसने, डॉ रॉकी कथेरिया, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांच्याशी संवाद साधून हार्ट फेल्युअर विषयी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदय बंद पडणे हे अनेकदा रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि प्लेक तयार होण्यासारख्या गोष्टींचा परिणाम असू शकते. यामुळे हृदयात ब्लॉकेज होणे, हृदयातील रक्त प्रवाह कमी होणे व हृदयाच्या पंपिंग कार्यावर परिणाम होणे अशा समस्या उद्भवतात.

हार्ट फेल्युअर म्हणजे काय?

हार्ट फेल्युअर अशी स्थिती आहे जेव्हा हृदयाचे स्नायू शरीराला सतर्क ठेवण्यासाठी रक्त पंप करू शकत नाहीत. जेव्हा असे होते तेव्हा, रक्त साचायला सुरुवात होते आणि फुफ्फुसांमध्ये द्रव तयार होऊ लागते, यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर गुंतागुंत होऊ शकते. या स्थितीत, हृदय त्याच्या सामान्य कार्यक्षमतेसह काम करू शकत नाही, त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचू शकत नाही, ज्यामुळे महत्वाच्या अवयवांच्या एकूण कार्यावर परिणाम होतो.

हार्ट फेल्युअरचे सहसा, दोन प्रकार आहेत. सिस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणजे जेव्हा हृदयाचे डावे वेंट्रिकल, हृदयाच्या खालच्या कक्षांपैकी एक, कमकुवत होते आणि हृदयाचे ठोके सामान्यपणे आकुंचन पावत नाहीत. या कमकुवतपणाचा अर्थ संपूर्ण शरीरात कमी रक्त संचार होतो.

तर दुसरे म्हणजे, डायस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणजे जेव्हा हृदयाचे कप्पे मोठे होतात आणि त्यांची आकुंचन आणि प्रसरण करण्याची क्षमता कमी होते. हृदयाचे कक्ष रुंद होत असताना ते कमकुवत होतात. ही प्रक्रिया सहसा हृदयाच्या खालच्या चेंबरपासून सुरू होते आणि वरच्या चेंबरपर्यंत जाते.

काही परिस्थितींमध्ये ह्रदय खूप कमकुवत होते आणि अजिबातच रक्त पंप करू शकत नाही. हृदयातील धमन्या अरुंद होणे आणि उच्च रक्तदाब हे त्रास वाढू लागतात.

हृदय का मोठे होते?

कमकुवत हृदय योग्यरित्या आकुंचन पावू शकत नाही किंवा आराम करू शकत नाही. शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अशा स्थितीत हृदयाचे स्नायू ताणले जातात आणि कालांतराने हृदय मोठे होऊ लागते. दुसरीकडे रक्तदाब संतुलित राखण्यासाठी रक्तवाहिन्या संकुचित होतात. मूत्रपिंड देखील जास्त मीठ आणि पाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे पंपिंग कार्यासाठी आवश्यक रक्तदाब निर्माण होतो. पण हे लक्षात घ्यायला हवा हा शरीराने स्वीकारलेला मार्ग असला तरी हा असामान्य असून यामुळे हृदयावर जास्त ताण येऊ शकतो.

चिन्हे आणि लक्षणे

हृदय कमकुवत झाल्यामुळे थकवा आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो, काही लोकांना जास्त खोकला येतो. चालणे, पायऱ्या चढणे किंवा किराणा सामान वाहून नेणे यासारख्या दैनंदिन कामात सुद्धा अडथळे येऊ लागतात. पाय, घोट्या आणि पायांना सूज येणे हे हृदयाच्या समस्यांचे सुरुवातीचे संकेत आहेत. त्यानंतर जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके आणि चक्कर येणे हे त्रास सुद्धा होऊ लागतात.

तुम्हाला कोणत्या चाचण्यांची गरज आहे?

इकोकार्डियोग्राम, इजेक्शन फ्रॅक्शन (जे प्रत्येक वेळी हृदय धडधडताना किती टक्के रक्त शरीरात सोडते याचे मोजमाप करणारी चाचणी), ट्रेडमिल चाचण्या, अँजिओग्राम आणि काही प्रकरणांमध्ये हृदयाचे एमआरआय स्कॅन आवश्यक आहे.

हे ही वाचा<< १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्यामध्ये किती कॅलरीज असतात? पोषणसत्वांचे प्रमाण व शरीरावर होणार परिणाम वाचून व्हाल थक्क

उपचार

योग्य उपचारांमुळे हार्ट फेल्युअरची लक्षणे कमी करता येऊ शकतात. यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचवलेल्या औषधांसह जीवनशैलीतील बदल करण्याची सुद्धा गरज आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, व्यायाम करा, मीठ कमी वापरा आणि तणाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. गंभीर प्रकरणांमध्ये, हृदय प्रत्यारोपण हा हृदयाला रक्त पंप करण्यास मदत करणारा एक पर्याय ठरू शकतो. पण तत्पूर्वी तुमची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी तुमची वैद्यकीय माहिती असलेल्या डॉक्टरांशी चर्चा करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Designer rohit bal heart failure primary signs when heart stops pumping blood and oxygen how to detect heart fail condition svs

First published on: 28-11-2023 at 17:18 IST
Next Story
Health Special : एसी आणि मीठाचं कनेक्शन काय असतं?