Premium

Health special: तुम्हाला होणाऱ्या वेदनेची तीव्रता कशावर ठरते?

पेन एज्युकेशन इज ऑल अबाऊट ट्रीटिंग अ पर्सन, नॉट ओन्ली द प्रॉब्लेम’. आता हे वेदनेचं शिक्षण द्यायचं म्हणजे नक्की काय कारायचं तर त्याच्या चार पायर्‍या आहेत.

human psychology of pain
वेदनेची तीव्रता photo source फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

डॉ. वैभवी उन्मेष वाळिम्बे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडील काळात भौतिक उपचारपद्धतीत नव्याने उदयास आलेली संकल्पना म्हणजे पेन न्युरोसायन्स एज्युकेशन किंवा पेन एज्युकेशन. आज मी तुम्हाला या संकल्पनेबद्दल थोड विस्ताराने सांगणार आहे. शरीराच्या ज्या भागात संवेदना आहे त्या भागांच दुखणं म्हणजे वेदना. ही वेदना ठसठसणं, कळ निघणं, टोचल्या सारख वाटणं, चिमटा काढल्यासारख वाटणं या आणि अशा कोणत्याही प्रकारची असू शकते. आता हा प्रश्न पडणं फार स्वाभाविक आहे की, ही वेदना तर वर्षानुवर्षे आहेच मग त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची काय गरज, मुळात ‘वेदनेबद्दल जागरूकता’ ही संकल्पना का उदयास आली असावी त्याच उत्तर असं की, अनेक प्रभावी औषधं देऊन आणि इतरही बरेचसे उपाय करूनही वेदनेचे काही प्रकार हे अनुत्तरीत राहिले (विशेषतः जुनाट वेदना म्हणजेच क्रॉनिक पेन) यावर संशोधन केलं असता हे लक्षात आलं की ‘पेन इज नॉट मीअरली अ सेन्सेशन बट इट इज अ पर्सेप्शन ऑर मोअरओव्हर ॲन एक्सपिरअन्स!’ जर वेदना हा एक अनुभव आहे तर साहजिकच तो व्यक्तिनुरूप वेगळा म्हणजेच सबजेक्टिव आहे.

हेही वाचा >>> Health special: मुलांना विकार आणि आजारांपासून दूर कसे ठेवाल?

मूलभूत मानवी शारीरिक रचना आणि त्यात होणारे बिघाड हे बर्‍याच अंशी सारखे आहेत पण मग दोन सारख्या वयाच्या, सारखे शारीरिक बिघाड किवा व्याधी असणार्‍या माणसांमधील वेदनेची तीव्रता वेगळी का आहे? कारण या दोन व्यक्तींची मानसिक, सामाजिक, वैचारिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जडणघडण वेगवेगळी आहे. ही जडणघडण त्या व्यक्तिला जाणवणार्‍या वेदनेची तीव्रता ठरवते आहे. आणि आपले उपचार हे फक्त वेदनेच्या शारीरिक पैलूंपर्यंत सीमित आहेत, साहजिकच ते अपुरे पडताहेत. ‘पेन एज्युकेशन इज ऑल अबाऊट ट्रीटिंग अ पर्सन, नॉट ओन्ली द प्रॉब्लेम’. आता हे वेदनेचं शिक्षण द्यायचं म्हणजे नक्की काय कारायचं तर त्याच्या चार पायर्‍या आहेत.

१) वेदना शरीरात नेमकी कशी उद्भवते (पेन फिजिओलॉजी) – वेदना शरीरात कशी उत्पन्न होते, ती आपल्याला कशी जाणवते (पेन फिजिओलॉजी) हे अगदी सोप्या भाषेत (रुग्णाच्या बोलीभाषेत) समजावून सांगितली जाते. यासाठी बर्‍याचदा चित्र, रेखाचित्र- चलचित्र यांची मदत घेतली जाते, यानंतर त्याला झालेल्या आजाराची माहिती दिली जाते.

हेही वाचा >>> Health special: नॉर्मल काय नि ॲबनॉर्मल काय? कसा ओळखाल मानसिक विकार?

२) विकाराची प्रक्रिया समजावून सांगणे- वेदनेची माहिती देताना नकारात्मक भाषेचा वापर कटाक्षाने टाळला जातो.  उदाहरणादाखल सांगायचं तर “तुमच्या गुडघ्याची झीज झाली आहे” असे न सांगता “गुडघ्यामध्ये वयानुरूप बदल झाले आहेत आणि योग्य व्यायाम, आहार आणि जीवनशैलीत बदल केले तर या बदलांशी जुळवून घेणं तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे” अशा प्रकारे सांगितलं जातं.

३) वेदनेबाबत वेगळा दृष्टिकोन देणे- रुग्णाच्या मनातील वेदनेविषयी भीती दूर करणे हे यामागचं प्रमुख उद्दीष्ट  आहे. ‘पेन इज नॉट इक्वल टू डेंजर’ उलटपक्षी वेदना म्हणजे संभाव्य दुखापत किंवा इजा टाळण्यासाठी शरीराने आपल्याशी साधलेला संवाद आहे तो व्यवस्थित एकून आणि समजून घेऊन त्यावर योग्य तो उपाय करण गरजेचं आहे, हे रुग्णाला समजावून देणं महत्त्वाचं असतं.

हेही वाचा >>> Health special: नेटफ्लिक्सवरील मालिकांचा आणि डोपामिन व व्यसनाचा काय संबंध?

४) कायनेसिफोबिया –  ईनड्युसिंग पॉजिटिव पेन कोपिंग अँड रेड्युसिंग फियर ऑफ मूवमेंट (Kinesiophobia)- तुम्हाला होणारी वेदना ही तुमच्याच आटोक्यात आहे, ती कमी करण्यासाठी तुम्हाला उपचारपद्धतीत सहभाग घेणं व्यायाम, आहार आणि जीवनशैलीत योग्य ते बदल करणं आवश्यक आहे. विशिष्ट हालचाली या सध्या जरी त्रासदायक वाटत असल्या तरीही त्यात फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते बदल करून त्या केल्या जाऊ शकतात. हालचाल ही शरीराची मूलभूत गरज आहे आणि हालचाल केल्याने शरीरात कोणताही बिघाड होणार नाही, हे यामध्ये सांगितलं जातं. (हे विशेषतः कंबरेच्या दुखण्याने किंवा कंबरेतून वाकण्यासंदर्भात असलेल्या भीतीसाठी सांगणं अतिशय आवश्यक असतं.) आता बर्‍याच जणांना हा प्रश्न पडला असणार की फक्त वेदनेबद्दल माहिती देऊन रुग्ण बरा कसं होणार म्हणूनच इथे हे सांगणं आवश्यक आहे की वेदना जाणीवजागृती ही स्वतंत्र उपचारपद्धती नसून व्यायाम (व्यायाम थेरपी), मॅन्युअल थेरपी आणि इलेक्ट्रोथेरपी यांची परिणमकरकता वाढवण्यासाठी दिली जाणारी जोड आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 18:45 IST
Next Story
Health special: मुलांना विकार आणि आजारांपासून दूर कसे ठेवाल?