Diabetes Reversal Tips: मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहाबाबत बरेच संशोधन झाले आहे. एका संशोधनानुसार, मधुमेही रुग्णांचा मेंदू सामान्य व्यक्तीच्या तुलनेत २६ टक्के वेगाने म्हातारा होतो. एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचे निदान होईपर्यंत, मेंदूचे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात ७.५० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. गेल्या ३० वर्षांत हा आकडा १५० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. देशातील सुमारे ८ कोटी लोक मधुमेहाच्या सीमेवर उभे आहेत. म्हणजेच एक छोटीशी चूक तुम्हाला मधुमेहाचा रुग्ण बनवू शकते. चला बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घेऊया मधुमेहापासून कायमची सुटका कशी करता येईल.

योगगुरू स्वामी रामदेव यांच्या मते, काही योगासने आणि प्राणायाम आहेत ज्यांच्या मदतीने आपण मधुमेहापासून मुक्ती मिळवू शकतो.जर आपण हे सोपे आणि प्राणायाम नियमित केले तर आपण मधुमेह आणि त्याच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.

( हे ही वाचा: डायबिटीज रुग्णांसाठी ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान? काजू बदाम खाल्ल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल )

सर्वांगासन

बाबा रामदेव यांच्या मते, सर्वांगासन केल्याने वय वाढल्यानंतर दृष्टी चांगली राहते. याशिवाय हे आसन केल्याने मधुमेही रुग्णांना ब्लॅक फंगस सारखा घातक आजार होण्याची शक्यताही कमी होते. यासोबत थायरॉईड ग्रंथी सुरळीतपणे काम करते. ही ग्रंथी पचन, तंत्रिका प्रजनन प्रणाली, चयापचय आणि श्वसन प्रणालीच्या योग्य कार्यासाठी जबाबदार आहे. बाबा राम देव यांच्या मते, हे आसन केल्याने मधुमेह दूर होऊ शकतो.

शशांकासन

बाबा रामदेव यांच्या मते हे आसन बद्धकोष्ठता, गॅस, भूक न लागणे, अपचन, मधुमेह यांसारख्या विकारांमध्ये फायदेशीर आहे. हे आसन हृदय, फुफ्फुस, डोळे आणि मेंदू निरोगी ठेवते. हे मेंदूला रक्तपुरवठा वाढवून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. मात्र, पाठ आणि मान दुखत असेल तर हे आसन करू नये.

( हे ही वाचा: रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास ‘लाडू’ची रेसिपी पाहा )

मंडुकासन

बाबा रामदेव यांच्या मते मंडुक हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ बेडूक असा होतो. या आसनाला ‘मंडुकासन’ म्हणतात कारण हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बेडकासारखा दिसतो. पोट कमी करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. या आसनाचा सराव केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनाच्या सरावाने हृदयाची कार्यक्षमताही सुधारते. या आसनाचा सराव केल्याने पोटाच्या सर्व अवयवांना भरपूर व्यायाम होतो. हे आसन पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, भूक न लागणे असे अनेक विकार या आसनाच्या सरावाने दूर होतात. मधुमेही रुग्णांसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes can be reversed know the effective method from ramdev baba gps
First published on: 06-12-2022 at 15:59 IST