मधुमेह असणाऱ्यांना हिवाळ्यात लागू शकते जास्त भूक; नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतील 'हे' पदार्थ | Diabetes can lead to increased appetite in winter these foods will help control it | Loksatta

मधुमेह असणाऱ्यांना हिवाळ्यात लागू शकते जास्त भूक; नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतील ‘हे’ पदार्थ

भूक नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेह असणारे रुग्ण कोणते पदार्थ खाऊ शकतात जाणून घ्या

मधुमेह असणाऱ्यांना हिवाळ्यात लागू शकते जास्त भूक; नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतील ‘हे’ पदार्थ
मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारे पदार्थ (फोटो : Freepik)

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हवामानातील बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी लागते. विशेषतः हिवाळ्यात मधुमेहाचा त्रास वाढू शकतो. तसेच या रुग्णांना आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. हिवाळ्यात मधुमेह असणाऱ्यांना जास्त भूक लागू शकते. यामागचे कारण काय जाणून घ्या.

हिवाळ्यात मधुमेह असणाऱ्यांना जास्त भूक का लागते
हिवाळ्यात थंडी वाढल्याने शरीराला अधिक ऊर्जेची आणि अधिक इन्सुलिनची गरज असते. या कारणामुळे तसेच या वातावरणात मेटाबॉलिजम बुस्ट होते त्यामुळे जास्त भूक लागते. जेव्हा जास्त भूक लागते तेव्हा कोणतेही पदार्थां अनियंत्रित पद्धतीने खाल्ले जातात. पण यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊन, गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी हिवाळ्यात जास्त भूक लागत असेल तर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे जाणून घ्या.

आणखी वाचा : रिकाम्या पोटी ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने उद्भवू शकते गंभीर समस्या; लगेच जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांना या पदार्थांचे सेवन करणे ठरेल फायदेशीर

कडधान्य
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्व आढळतात. एक कप मोड आलेल्या कडधान्यांमध्ये १४ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि ६ ग्रॅम फायबर आढळते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात नाश्त्यात कडधान्यांचा समावेश करावा.

भाज्यांचे सुप
हिवाळ्यात भाज्यांचे सुपचे सेवन करू शकता, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्याबरोबर, आरोग्यासही अनेक फायदे मिळतात.

भोपळ्याच्या बिया
भोपळ्यांच्या बियांमध्ये शरीरासाठी उपयुक्त असणारे फॅट्स आढळतात. तसेच या बिया रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतात.

आणखी वाचा : तुम्हालाही रात्री उशीरा जेवायची सवय आहे का? याचा शरीरावर काय परिणाम होतो लगेच जाणून घ्या

काजू
काजूमध्ये थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि जास्त प्रमाणात शरीरासाठी चांगले असणारे फॅट आढळते. ज्यामुळे काजू आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यासह काजू रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 21:00 IST
Next Story
यूरिक ॲसिड झपाट्याने नियंत्रणात आणेल ‘या’ कडू भाजीचा रस; जाणून घ्या या चमत्कारिक भाजीबद्दल..