HbA1c vs Fasting Sugar: HbAlc आणि उपाशीपोटी रक्तातील साखर या दोन्ही महत्त्वाच्या रक्त चाचण्या आहेत, मात्र रक्तातील साखरेची पातळी समजून घेण्यासाठी त्यांची भूमिका वेगवेगळी असते. डायबिटीजच्या व्यवस्थापनात रूग्णांना अनेकदा संभ्रम असतो की, त्यांच्या आरोग्याबद्दल सर्वात अचूक माहिती कोणती चाचणी देते. लोक अनेकदा त्यांच्या रक्तातील साखर तपासण्यासाठी उपाशीपोटी रक्तातील साखर आणि जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची चाचणी वापरतात.

उपाशीपोटी रक्तातील साखरेची चाचणी सकाळी रिकाम्या पोटी तुमच्या तुमच्या रक्तातील साखरेची पातळी दर्शवते, तर HbAlc चाचणी गेल्या तीन महिन्यांतील तुमच्या रक्तातील साखरेच्या सरासरी पातळीची तपशीलवार नोंद देते. आरोग्य तज्ज्ञ या दोन चाचण्यांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, एक तात्काळ अहवाल देते, तर दुसरी जीवनशैलीतील बदलांचा दीर्घकालीन परिणाम देते. पण प्रश्न असा आहे की, औषधांची मात्रा आणि उपचार ठरवताना डॉक्टर कशावर अधिक अवलंबून राहतात?

वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल इथल्या सल्लागार एंडोक्रोनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडे यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, फास्टिंग ब्लड ग्लुकोज ही चाचणी ८ ते १० तासांच्या उपवासानंतर म्हणजेच रात्रभर काहीही न खाता, रक्तातील साखरेची पाळी मोजते. ही चाचणी त्यावेळची रक्तातील साखरेची पातळी दर्शवते. डायबिटीज किंवा प्री-डायबिटीज ओळखण्यासाठी एफबीजी चाचणी अनेकदा प्राथमिक तपासणी म्हणून वापरली जाते. डायबिटीज नियंत्रणासाठी एफबीजी की HbAlc चाचणी अधिक प्रभावी आहे तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

Award Banner

रक्तातील साखरेची पातळी ठरवण्यासाठी HbAlc कशी मदत करते?

डॉ. घोडे यांच्या मते, HbAlc चाचणी अधिक व्यापक आणि सुसंगत मोजमापन देते. ही चाचणी लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनला जोडलेल्या ग्लुकोजची टक्केवारी मोजते आणि गेल्या २ ते ३ महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते. म्हणूनच आधीपासून डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये दीर्घकालीन साखर नियंत्रण समजून घेण्यासाठी HbAlcचा वापर केला जातो. यामुळे एखाद्या दिवशी उपाशीपोटी केलेली चाचणी सामान्य असली तरी, रक्तातील साखर सातत्याने जास्त आहे की नाही हे डॉक्टरांना पाहता येते. तज्ज्ञांनी सांगितले की, उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज आणि HbAlc चाचण्या एकमेकांना पूरक मानल्या पाहिजेत, अदलाबदल करण्यायोग्य नाहीत. कारण एकत्रितपणे त्या चयापचय आरोग्याचे अधिक स्पष्ट माहिती देतात.

साखरेच्या देखरेखीसाठी आणि उपचारांसाठी HbAlc कसा मदत करतो?

डॉ. घोडे यांनी स्पष्ट केले की, दीर्घकालीन देखरेख आणि उपचारांमध्ये बदल करण्यासाठी HbAlc अधिक विश्वसनीय आहे, तर फास्टिंग ग्लुकोज प्राथमिक तपासणी, लवकर निदान आणि शरीर रात्रभर साखरेची पातळी कशी नियंत्रित करते हे समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. दोन्ही चाचण्यांच्या काही मर्यादा आहेत. अॅनिमिया किंवा रक्ताचे काही विकार यासारख्या लाल रक्तपेशींवर परिणाम करणाऱ्या परिस्थितींमुळे HbAlcवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, केवळ उपाशीपोटीच्या ग्लुकोजवर अवलंबून राहिल्यास जेवणानंतर ज्यांच्या साखरेची पातळी वाढते अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष होऊ शकते.

डॉक्टर अनेकदा या दोन्ही चाचण्यांसोबतच जेवणानंतर ज्यांच्या साखरेची पातळी वाढते अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष होऊ शकते. डॉक्टर अनेकदा या दोन्ही चाचण्यांसोबतच जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी आणि रूग्णाची लक्षणे यांचाही विचार करतात. या चाचण्या एकत्र केल्.ाने व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी आणि रूग्णाची लक्षणे यांचाही विचार करतात. या चाचण्या एकत्र केल्याने व्यक्तीच्या रक्तातील साखरेच्या पद्धतींची संपूर्ण माहिती मिळते आणि त्यानुसार योग्य उपचार ठरवले जातात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ५.७ टक्क्यांपेक्षा कमी HbAlc पातळी सामान्य असते, तर ६.५ टक्के किंवा त्याहून अधिक पातळी डायबिटीज दर्शवते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, उपाशीपोटी साखरेचे प्रमाण १०० एमजी/डीएलपेक्षा कमी असावे.

उपाशीपोटी साखरेच्या पातळीत अचानक बदल कशामुळे होऊ शकतो?

सकाळी शरीर स्वत:ला जागे करण्यासाठी कॉर्टिसोल आणि ग्लुकागॉनसारखे हार्मोन्स सोडते. ते लिव्हरला साखर सोडण्यास प्रवृत्त करतात. यामुळे सकाळच्या साखरेत अचानक वाढ होऊ शकते. तणाव, अपुरी झोप, रात्रीचे जड जेवण, डिहायड्रेशन, आजार किंवा संसर्गामुळे देखील उपाशीपोटीच्या साखरेत बदल होऊ शकतो.

HbAlcमध्ये अचानक बदल का होऊ शकतो?

काही विशिष्ट परिस्थितींमध्ये HbAlc चुकीचा ठरू शकतो. अॅनिमिया, रक्त संक्रमण किंवा जास्त रक्तस्त्राव, किडनी किंवा लिव्हरचा आजार आणि गर्भधारणा यामध्ये रक्ताचे प्रमाण वाढल्याने आणि पेशींमध्ये बदल झाल्यामुळे HbAlcची अचूकता कमी होऊ शकते.