scorecardresearch

सीताफळ खाल्ल्याने वजन वाढते का? डायबिटीज व PCOD रुग्णांनी तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला नक्की वाचा

Custard Apple For Diabetes, PCOD: आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये सीताफळ खाण्याबाबत लोकांना पडणाऱ्या सामान्य प्रश्नांची माहिती दिली आहे.

सीताफळ खाल्ल्याने वजन वाढते का? डायबिटीज व PCOD रुग्णांनी तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला नक्की वाचा
सीताफळ खाल्ल्याने वजन वाढते का? डायबिटीज व PCOD रुग्णांनी तज्ज्ञांचा 'हा' सल्ला नक्की वाचा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Custard Apple For Diabetes, PCOD:डायबिटीज हा एक क्रोनिक आजार आहे ज्याने आज जगभरातील कोट्यवधी लोकसंख्या त्रासलेली आहे. डायबिटीज रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला आहारासह जीवनशैलीचीही खास काळजी घेणे आवश्यक असते. असे पदार्थ ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे त्यापासून लांब राहण्याचा सल्ला डायबिटीजच्या रुग्णांना दिला जातो. अनेक फळांमध्ये असणारी फ्रुक्टोज रूपातील साखर सुद्धा डायबिटीजमध्ये घातक ठरू शकते. आज आपण थंडीच्या महिन्यांमध्ये येणाऱ्या सीताफळाविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत.

सीताफळ हे मुख्यतः थंड फळ आहे. यामध्ये शरीराला आवश्यक अनेक पोषण सत्व असतात, यामध्ये फायबर, लोह व तांबे मुबलक प्रमाणात असते तसेच शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन बी ६,कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम सुद्धा यामध्ये आढळून येते. आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये सीताफळ खाण्याबाबत लोकांना पडणाऱ्या सामान्य प्रश्नांची माहिती दिली आहे. सीताफळाचे सेवन शरीरात ब्लड शुगर वाढवते का? सीताफळ खाल्ल्याने वजन वाढते का शिवाय PCOD असल्यास हे फळ खावे का अशा तीन प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.

सीताफळाचे सेवन शरीरात ब्लड शुगर वाढवते का?

रुजुता दिवेकर सांगतात की सीताफळ हे डायबिटीज रुग्णांसाठी गुणकारी ठरू शकते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फारच कमी असतो यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

हे ही वाचा<<कोलेस्ट्रॉल वाढताच पायाच्या टाचा व नखांमध्ये दिसतात ही ५ गंभीर लक्षणे; शरीर देतं हृदयविकाराचे संकेत

सीताफळ खाल्ल्याने वजन वाढते का?

डायबिटीज रुग्णांना वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कमी कॅलरीज असलेला आहार त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शक्रो. सीताफळात असणारे व्हिटॅमिन बी ६ हे पचनप्रक्रियेला वेग देण्याचे काम करते. यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडून वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदय विकाराच्या रुग्णांसाठी सुद्धा सीताफळ गुणकारी ठरू शकते कारण यामध्ये मुबलक प्रमाणात मँगनीज व व्हिटॅमिन सी तसेच अनेक निरलस उपलब्ध असतात. हे घटक हृदयाला सुरळीत रक्तप्रवाह करण्यासाठी तसेच अँटी एजिंग सत्व म्हणून काम करतात.

हे ही वाचा<< बिअर प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका होतो ५० टक्के कमी? डॉक्टरांचं उत्तर ऐकून व्हाल थक्क

PCOD असल्यास हे सीताफळ खावे का?

PCOD (Polycystic Ovarian Disease) चा त्रास सीताफळाच्या सेवनाने बराच कमी होऊ शकतो. शरीराला सीताफळ खाल्ल्याने भरपूर लोह मिळते ज्यामुळे सततची चिडचिड, थकवा दूर होण्यास मदत होते. याशिवाय प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा सीताफळ बराच फायदेशीर ठरू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 14:52 IST

संबंधित बातम्या