Blood Sugar: डायबिटीज असल्यास पथ्य पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. हा एक क्रोनिक आजार आहे. जे पदार्थ इतर वेळीस शरीराला पोषक ठरतात तेच पदार्थ डायबिटीजच्या रुग्णांना मात्र जीवघेणे सिद्ध होऊ शकतात. याचं मुख्य उदाहरण म्हणजे सुका मेवा. सुक्या मेव्यात असे अनेक पोषक सत्व असतात ज्यामुळे शरीराची दैनंदिन ऊर्जेची गरज पूर्ण होऊ शकते. पण म्हणून सुक्या मेव्यातील सर्वच घटक हे शरीराच्या फायद्याचे आहेत असं नाही. सुका मेवा खाताना असे काही पदार्थ आहेत ज्याने ब्लड शुगरची पातळी अचानक वाढू शकते. दुसरीकडे, असेही काही पदार्थ आहेत जे तुमच्या शरीराला आवश्यक सत्व पुरवून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. नेमका कोणता सुका मेवा खावा व काय खाऊ नये याचा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डायबिटीज रुग्णांसाठी नुकसानदायी सुका मेवा (Harmful Dry Fruits For Diabetes)

प्लम: प्लम हे फळ डायबिटीजच्या रुग्णांच्या रक्तातील साखर बूस्ट करू शकते.

अंजीर: अंजीर खाल्ल्याने ब्लड शुगर एकाएकी वाढू शकते. एक कप अंजीर मध्ये तब्बल २९ ग्रॅम साखर असते, यामुळे ज्यांना रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवायचे असेल त्यांनी अंजीर खाणे टाळावे.

खजूर: हेल्थ लाईनच्या माहितीनुसार डायबिटीजच्या रुग्णांनी खजूर खाणे सुद्धा टाळायला हवे. तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही योग्य तो आहार व आवश्यक व्यायाम करणार असाल तर डायबिटीज असताना आपण दिवसात जास्तीत जास्त तीन खजूर खाऊ शकता. अन्यथा आपली जीवनशैली बैठी असल्यास खजूर खाणे टाळणेच हिताचे ठरेल.

हे ही वाचा<< रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास ‘लाडू’ची रेसिपी पाहा

डायबिटीज रुग्णांना ‘हा’ सुका मेवा ठरू शकतो फायदेशीर

अक्रोड: हेल्थ लाईनच्या माहितीनुसार, डायबिटिज रुग्णांना अक्रोड खाणे हिताचे ठरू शकते. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते शिवाय यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. आपल्याला टाईप २ डायबिटीज असल्यास अक्रोड खाल्ल्याने ४७% ब्लड शुगर कमी होण्यास मदत होऊ शकते.

बदाम: मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार बदामाचे सेवन हे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी फायद्याचे असते. अनेक अभ्यासांमधून समोर आलेल्या माहितीनुसार बदामाच्या सेवनाने शरीरात इंसूलिन तयार होते व ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते.

काजू: हेल्थ लाईननुसार काजू हा एक असा सुका मेवा आहे ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रण अगदी सहज होऊ शकते. मर्यादा पाळून काजूचे सेवन केल्यास हृदय रोगाचा धोका सुद्धा कमी होऊ शकतो.

हे ही वाचा<< काजू- बदाम, मनुके भिजवून खावेत की सुके? सर्वाधिक पोषणासाठी ‘हा’ मार्ग आहे बेस्ट

पिस्ता: डायबिटीज रुग्णांनी पिस्त्याचे सेवन करणे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याचे ठरू शकते. पिस्ता हा फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम या सत्वांचा मुबलक साठा असणारा सुका मेवा आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes which dry fruits can increase blood sugar and which dry fruits sugar patient can consume svs
First published on: 25-12-2022 at 14:07 IST