Diarrhea homemade remedies: पोटाचे विकास फार त्रासदायक असतात. त्यातही डायरिया हा आजार जास्त गंभीर समजला जातो. डायरिया म्हणजेच अतिसारची समस्या झाल्यावर व्यक्तीला वारंवार मलविसर्जन करण्यासाठी पोटामध्ये कळ येत असते. पोट साफ झाल्याने ते खाली होते. त्यात पुन्हा मलविसर्जन झाल्यास पोटात दुखू लागते. सतत मलविसर्जन झाल्याने शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते. अशक्तपणा, ताप येणे अशा गोष्टी देखील संभवतात. डायरिया होण्यामागे इन्फेक्शनस, अन्नाद्वारे झालेलं फूड पॉइजनिंग, आतड्यांना झालेली दुखापत अशी अनेक कारणे असू शकतात. अतिसार झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचार करवून घेणे उत्तम मानले जाते. पण काही वेळेस ठराविक घरगुती उपाय करुनही या आजारापासून स्वत:चा बचाव करता येतो.

१. जिऱ्याचे पाणी प्यावे.

जिरे घातलेले पाणी प्यायल्याने अतिसार दरम्यान होणारी पोटदुखीचे प्रमाण कमी होते. याने पोटामध्ये होणारी जळजळ थांबण्यास मदत होते. हे पचन संस्थेसाठी खूप फायदेशीर असते. जिऱ्यामध्ये थायमॉल असते, यामुळे गॅस्ट्रिक ग्रंथींंमधील स्राव उत्तेजित होतो. त्याचबरोबर प्रोटीन्स, फॅट्स आणि शुगर या घटकांचे विघटीकरण होते. परिणामी पोट निरोगी राहण्यास मदत होते. जिरे पाण्यामध्ये उकळावे आणि थंड करुन ते मिश्रण प्यावे. डायरियावर होऊ नये यासाठी तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा हे मिश्रण पिऊ शकता.

actor Sachin Deshpande exit from paaru marathi serial
‘पारु’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, पोस्ट करत म्हणाला, “काम फार…”
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”
पोटात गडबड

२. ताकाचे सेवन करावे.

ताक प्यायल्याने पाचन संस्था सुधारते असे म्हटले जाते. दही-पाणी एकत्र करुन तयार केलेल्या ताकाचे सेवन करणे फायदेशीर असते. अतिसारदरम्यान पोटामध्ये दुखत असल्यास ताण प्यायले जाते. यामुळे जुलाब थांबण्यास देखील मदत होते.

३. लिंबूपाणी प्यावे.

लिंबामध्ये असणाऱ्य़ा औषधी गुणांमुळे शरीराला नेहमीच फायदा होतो. लिंबाचे पाणी प्यायल्यामुळे पोट साफ होते. सतत जुलाब होत असल्याने शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते. ही कमतरता लिंबूपाणी प्यायल्याने भरली जाते. हा उपाय केल्याने आतड्यांमधील विषारी पदार्थ निघून जातात. पोटदुखी शांत होण्यासाठी लिंबाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मळमळत असताना लिंबाच्या रसामध्ये साखर, पाणी आणि किंचित मीठ टाकून ते मिश्रण प्यावे.

४. पुदिना आणि मध यांच्या मिश्रणाचे सेवन करावे.

हे मिश्रण तयार करण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने एकत्र करुन त्यांचा रस काढावा. त्या रसामध्ये मध आणि लिंबाचा रस घालून ते मिश्रण मिसळावे. पुदिन्यामध्ये वाईट बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. परिणामी आतड्यामध्ये इन्फेक्शन होण्यास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचा नाश होतो. बॅक्टेरियल गॅस्ट्रोएन्टेरिटिस असलेल्या रुग्णांसाठी मधाचे सेवन करणे योग्य मानले जाते. यामुळे अतिसाराचे प्रमाण कमी होते.

५. कॅमोमाइल चहा प्यावा.

कॅमोमाइल चहा प्यायल्याने पाचक स्नायूंना आराम मिळतो. अतिसारमध्ये गॅस, मळमळ, उलट्या, अपचन अशा गोष्टींवर उपचार म्हणून कॅमोमाइल चहा प्यायला जातो. कॅमोमाइल फुले आणि पेपरमिंटची पाने गरम पाण्यामध्ये उकळून हा चहा तयार करता येतो. याचा डायटमध्येही समावेश केला जातो. दररोज किमान दोन ते तीन वेळा हा चहा प्यायल्याने पोट शांत राहते. कॅमोमाइल फुलांमध्ये अनेक औषधी गुण आढळले जातात.