Ginger-lime Benefits : पावसाळ्यात अनेकांना पचनाशी संबंधित समस्या जाणवतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात; जे त्यावरील घरगुती उपचाराविषयी माहिती देतात. शेफ कीर्तीदा फडके यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी मीठ, साखर, आले व लिंबू यांचे मिश्रण एकत्रित सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

“आले व लिंबू यांच्या एकत्र सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि पचनाच्या समस्या दूर होतात. फक्त त्यासाठी लिंबू, आले, मीठ व साखर या चार घटकांची आवश्यकता आहे. हे मिश्रण अतिशय चवदार बनते आणि पावसाळ्यात पचनाच्या समस्यांपासून दूर ठेवते” असे त्या सांगतात.

viscose fabric
विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
sadhguru jaggi vasudev isha foundation
“आम्ही कुणालाही लग्न करायला वा संन्यासी व्हायला सांगत नाही”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं ‘त्या’ आरोपांवर स्पष्टीकरण!
Devendra Fadnavis on nitin gadkari
“अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Krystle D'Souza's 60-Hour Non-Stop Shoot: Impact on the Body
अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने केले होते ६० तास नॉन-स्टॉप शूट! विश्रांती न घेता काम केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

मिश्रण कसे बनवायचे?

साहित्य

  • बारीक किसलेले आले
  • साखर
  • मीठ
  • लिंबाचा रस

कृती

  • सुरुवातीला बारीक किसलेले आले एका काचेच्या बरणीमध्ये टाका.
  • त्यानंतर त्यात साखर, मीठ आणि लिंबाचा रस टाका.
  • त्यानंतर बरणीचे झाकण लावा आणि हे मिश्रण चांगले हलवा.
  • चवीनुसार साखर आणि मीठ टाका.
  • दोन ते तीन दिवस फ्रिजमध्ये ही बरणी ठेवा.
  • त्यानंतर तुम्ही या मिश्रणाचे सेवन करू शकता.
  • हे मिश्रण फ्रिजमध्ये १० ते १२ दिवस टिकते.

फडके सांगतात, “या मिश्रणामुळे पचनक्रिया सुधारते; पण त्याबरोबर हे मिश्रण एक चांगली चव प्रदान करते.”

हेही वाचा : रोजच्या आहारात सलग दोन आठवडे हळद वापरल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…

खरंच हे मिश्रण आरोग्यासाठी चांगले आहे का?

या मिश्रणाचे सेवन करावे की नाही, यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे. बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वीणा व्ही. सांगतात, “आले आणि लिंबूमध्ये आरोग्यदायी व औषधी गुणधर्म आहेत. त्यातील पोषक घटक पावसाळ्यात शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आल्यामध्ये जिंजरॉल असते, जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करते. मळमळ दूर करणे, पचनक्रिया सुधारणे, पावसाळ्यात अनेक व्हायरल फ्लूपासून संरक्षण करणे आणि सर्दी न होण्यापासून आले मदत करते.”

आले आणि लिंबू यांचे मिश्रण शरीरातील हायड्रेशन व इलेक्ट्रोलाइट संतुलित राखण्यास मदत करते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते; जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आजारांशी सामना करण्यास मदत होते.
“लिंबाच्या रसामध्ये असलेली नैसर्गिक अॅसिडिटी आपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करते; तसेच डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुरळीत करण्यात मदत करते. लिंबामध्ये वाईट जीवाणू वाढू न देणारा अँटिव्हायरल घटक असतो. त्यामुळे पावसाळ्यात लिंबाच्या सेवनाने पावसाळ्यात पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण करता येते”, असे वीणा व्ही. सांगतात.

हेही वाचा : अभिनेता मोहसिन खानला ३१ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका! फॅटी लिव्हरसाठी ‘या’ वाईट सवयी ठरल्या कारणीभूत, वाचा डॉक्टरांचे मत

वीणा सांगतात, “आले आणि लिंबाच्या मिश्रणामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व फायटोन्यूट्रिएंट्स असतात; जे नैसर्गिकरीत्या ऊर्जा वाढवतात. आले आणि लिंबाच्या अतिसेवनाने दुष्परिणामसुद्धा दिसू शकतो. त्यामुळे आले आणि लिंबाचे सेवन कमी प्रमाणात करा.