शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पोषक तत्वांची आवश्यकता असते. सोडियम हा शरीरातील सर्वात महत्वाचा घटक आहे. शरीरातील पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी ते आवश्यक असते. शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण संतुलित असणे आवश्यक आहे आणि रक्तदाब नियंत्रित करणे आवश्यक आहे. हे सर्व सोडियममुळे शक्य होऊ शकते. सोडियम रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करते. शिवाय सोडियम हे स्नायूंना योग्य प्रकारे काम करण्यासही मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा शरीरात सोडियमची पातळी कमी होते तेव्हा आपणाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे यकृत खराब होऊ शकते किंवा त्या संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. सोडियम कमी होणं जसं शरीरासाठी हानिकारक आहे तसंच सोडियमचे प्रमाण जास्त असणे देखील हानिकारक आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जास्त सोडियममुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे, ताप, उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. सोडियमच्या जास्त सेवनामुळे लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवणे महत्वाचे आहे.

हेही वाचा- रोज सकाळी ‘या’ वनस्पतींची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर राहील नियंत्रणात? सेवनाची पद्धत जाणून घ्या

सोडियमची पातळी कशी कमी करावी ?

CDC च्या अहवालानुसार, दररोज खाल्लेल्या १० प्रकारच्या अन्नामध्ये ४० टक्के सोडियम आढळते. ब्रेड, पिझ्झा, सँडविच, कोल्ड कट्स, सूप, बरिटो, स्नॅक्स, चिकन, चीज, अंडी आणि आमलेट हे सोडियमचे प्रमुख स्त्रोत आहेत. आरोग्य तज्ञ नेहमी शरीरातील सोडियम नियंत्रित करण्याचा सल्ला देतात. तुम्हालाही तुमच्या शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता. ते खाद्यपदार्थ कोणते याबाबत जाणून घेऊया.

लिंबाचा रस –

हेही वाचा- शरीरात लोह कमी झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणं; पाहा वयानुसार तुम्हाला किती लोह गरजेचं आहे

लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. शिवाय लिंबाचा रस शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यास लिंबाचा रस तुम्ही पिऊ शकता.

सफरचंद –

सोडियम नियंत्रित ठेवाण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही रोज एक सफरचंद खाऊ शकता. सफरचंदामध्ये पेक्टिन भरपूर प्रमाणात असते. याशिवाय त्यात तांबे, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, सेलेनियम, मॅंगनीज, जस्त, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम आढळतात. जे अनेक आजारांवर फायदेशीर असतात. शिवाय सफरचंदात सोडियमचे प्रमाण अत्यंत अल्प असते. शिवाय ते किडनीसाठी फायदेशीर आहे.

अंडी –

हेही वाचा- चिकन किंवा वांगी खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास शरीरावर पांढरे डाग पडतात का? जाणून घ्या

अंडी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच अंड्याला सुपरफूड असं म्हटले जातं. अंड्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. तसंच ती शरीरातील सोडियम नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

काकडी –

काकडीत ९६ टक्के पाणी असते. त्यामुळे काकडी खाल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय काकडीत सोडियमचे प्रमाणही खूप कमी असते. अर्ध्या काकडीत फक्त 3 ग्रॅम सोडियम असते. म्हणूनच सोडियम नियंत्रणात काकडी उपयुक्त मानली जाते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you also urinate frequently high sodium makes water in your blood health tips jap
First published on: 06-02-2023 at 12:31 IST