आपल्यापैकी अनेक जण च्युईंगम चघळतात. कोणी कंटाळा आल्यानंतर काहीतरी खाण्याचा पर्याय म्हणून किंवा कोणी माउथ फ्रेशनरचा पर्याय म्हणून च्युईंगम चघळतात. जर तुम्ही नियमितपणे च्युईंगम चघळत असाल, तर ही रोजची सवय होण्याआधी तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घ्या आणि त्याचे फायदे आणि संभाव्य तोटे अशा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा.

नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट प्रोस्टोडोन्टिस्ट व इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. निनाद मुळ्ये यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, च्युईंगम चघळणे ही सामान्य गोष्ट असली तरी अनेक जण त्याचे आरोग्यदायी फायदे आणि धोके याकडे दुर्लक्ष करतात.

Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
importance of cleanliness
कुत्र्याला स्वच्छतेचे महत्त्व कळले, माणसाला कधी कळणार? नदीतून कचरा बाहेर काढून कचरापेटीत टाकला, VIDEO एकदा पाहाच
Eating Sprouts At Night: Is It A Healthy Choice? Here's What Experts Say Sprouts benefits
Sprouts: तुम्हीही रात्रीचे कडधान्य खाता का? पोषणतज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचाच
healthy lifestyle
महिनाभर गोड खाऊ नका, नियमित १० हजार पावले चाला अन् फक्त घरचं अन्न खा; तज्ज्ञांकडून जाणून घ्या, आरोग्यावर कसा होईल सकारात्मक परिणाम
Gas Stove Explosion In Kitchen While Making Food Shocking Video Goes Viral on social media
महिलांनो तुम्हीही काचेची शेगडी वापरता का? मग किचनमध्ये ही चूक करू नका; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

च्युईंगमचे आरोग्यदायी फायदे (Health benefits associated with chewing gum)

मौखिक आरोग्यात सुधारणा (Oral health) : शुगरफ्री च्युईंगम चघळणे, विशेषत: ज्यामध्ये xylitol असते, ते तोंडाचे आरोग्य सुधारू शकते. त्यामुळे लाळेचे उत्पादन आणि तोंडाची नैसर्गिक संरक्षण यंत्रणेच्या कार्यास मदत मिळते. लाळ हानिकारक अॅसिडस् तटस्थ (neutralises) करते, अन्नाचे कण धुऊन टाकते आणि दातांवर मुलामा चढवणे, दातांच्या जखमा नैसर्गिकरीत्या दुरुस्त होण्यासाठी मदत करते, पोकळी आणि हिरड्यांचे आजार होण्याचा धोका कमी करते. पण, दात किडणे टाळण्यासाठी साखरमुक्त पर्याय निवडण्यावर डॉ. मुळे भर देतात.

संज्ञानात्मक कार्यात सुधारणा आणि तणावात घट (Cognitive and stress-relief benefits) : च्युईंगममुळे मेंदूमधील रक्तप्रवाह वाढतो. संभाव्यतः एकाग्रता, स्मरणशक्ती आणि एकूणच संज्ञानात्मक कार्यक्षमतेत सुधारणा होते.

नेहमी प्रवास करणाऱ्यांसाठी टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान च्युईंगममुळे लाळ गिळण्यास प्रोत्साहन मिळते. अशा स्थितीत लाळ गिळल्याने कानाचे पडदे उघडतात आणि कानावरील दाब संतुलित होऊन, कानाला होणारा त्रास कमी करण्यास मदत होते.

हेही वाचा –‘ताल’च्या क्लायमॅक्स शूटिंगपूर्वी अनिल कपूरने का घेतली होती रेकी! तज्ज्ञांकडून जाणून घ्या, रेकी म्हणजे काय?

आपण खूप वेळ च्युईंगम चघळल्यास काय होते? (What happens if you chew gum for too long?)

जबड्याच्या स्नायूंचा थकवा आणि वेदना (Jaw muscle fatigue and pain) : जास्त प्रमाणात च्युईंगम चघळल्याने, विशेषत: तोंडाच्या एका बाजूला ठेवल्यास, टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट (TMJ)वर ताण येऊ शकतो. त्यामुळे जबडा दुखणे, डोकेदुखी, कान दुखणे व चघळण्यास त्रास होतो.

दातांचा मुलामा नष्ट होणे (Dental erosion) : साखर नसलेल्या च्युईंगममध्येही आम्लयुक्त चव असू शकते आणि त्यामुळे ते दीर्घकाळ चघळल्यास दातांवरील आवरण(कठीण बाह्य थर) नष्ट होऊ शकतो. एकदा दातांवरील आवरण नष्ट झाले की ते पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. तोंडातील हानिकारक जीवाणू साखरेचा अन्न म्हणून वापर करतात, ते आम्ल तयार करतात आणि त्यामुळे दात किडतात आणि पोकळी निर्माण होते.

पोटाच्या समस्या (Gastrointestinal issue) : सतत च्युईंगम चघळल्याने जास्त प्रमाणात हवा गिळली जाते आणि त्यामुळे सूज येणे, गॅस होणे व अस्वस्थता यांसारखे त्रास होतात. शुगरफ्री च्युईंगमधील कृत्रिम स्वीटनर्स, जसे की सॉर्बिटॉलमुळे पचनास त्रास होऊ शकतो आणि पोट साफ होण्यावर, विशेषत: संवेदनशील व्यक्तींमध्ये त्याचा प्रभाव पडू शकतो. भूक कमी करण्यासाठी च्युईंगम वापरल्याने खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीदेखील लागू शकतात; जसे की जेवण न करणे किंवा अस्वास्थ्यकर स्नॅक्स निवडणे.

हेही वाचा –World Heart Day 2024 : रोज एक कप गरम कोको पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…

डॉ. मुळे यांनी जेवणानंतर १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ साखरमुक्त च्युईंगम चघळण्याची शिफारस केली. लाळेचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी आणि जबड्याच्या स्नायूंना जास्त काम न करता, दात स्वच्छ करण्यासाठी हे पुरेसे आहे. “तुमच्या शरीराने दिलेले संकेत ओळखा. तुम्हाला जबडा किंवा पचनामध्ये अस्वस्थता जाणवत असेल, तर च्युईंगम चघळण्याचा कालावधी किंवा वारंवारता कमी करा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader