Boiled tea or Brewed tea : चहा हे सर्वांच्याच आवडीचं पेय. चहा अनेकांना आवडतो. भारतात एक कप चहाने भारतीयांची दिवसाची सुरुवात होते. चहा जास्त उकळला तर आणखी चविष्ट वाटतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो? न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल यांनी Traya.Health. यांच्याशी संवाद साधताना आपण चुकीच्या पद्धतीने चहाचे सेवन करतो असे सांगितले. त्या म्हणाल्या, “चहा उकळण्याऐवजी ब्रू करून प्यावा.”( do you drink Boiled tea or Brewed tea read nutritionist told right way to make tea)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रू चहा म्हणजे नेमकं काय? ब्रू चहा तयार करताना गरम पाण्यात चहा पत्ती टाकावी आणि तीन मिनिटांमध्ये चहाची चव आणि सुगंध येतो.

Eating Papaya With Seeds know benefits risks from experts
पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे; पण खायचे कसे हे पाहा आधी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Does Drinking Coffee On An Empty Stomach Trigger Acidity? Expert Reveals Facts Coffee benefits
२४ तासांत किती कप कॉफी पिणे आहे योग्य? सकाळच्या कॉफीने ऍसिडिटी होते का? तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
Why papaya is the perfect fruit in winter season as per Ayurveda papaya juice benefit in winter
हिवाळ्यात ‘पपईचा ज्यूस’ प्रत्येकानं प्यायलाच हवा; फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल
drinking tea is beneficial to health?
चहाची तलफ आलेय, काय करावं?
Viral Video Of Bride And Her Brother
VIDEO: भर लग्नात भावाने बहिणीची सांगितली हटके सवय; नवऱ्याचे उत्तर ऐकून नवरी झाली लाल, नेटकरी म्हणाले “सात वचनांमध्ये…”
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
is alcohol good for health
दारू प्यावी का? आयुर्वेद काय सांगतं?

सुमन अग्रवाल पुढे सांगतात, “चहा असा पदार्थ आहे, जो सर्व भारतीयांना आवडतो. खूप जास्त उकळलेल्या मसाला चहामध्ये खूप जास्त टॅनिन असते, पण त्याबरोबरच त्यात अनेक हानिकारक घटक असतात. त्यापैकी एक म्हणजे अॅक्रिलामाइड. अशा चहाचे दीर्घकाळ सेवन इतके हानिकारक ठरू शकते की कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. उकळलेला मसाला चहा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यायला पाहिजे.”

त्या सांगतात, “गरम पाण्यात चहा पत्ती टाका आणि तीन मिनिटांमध्ये या चहा पावडरची चव गरम पाण्यात उतरते. चहाचे सेवन करण्याचा हा सर्वसामान्य प्रकार आहे.”

याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

खरंच चहा उकळून पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

बॅलेंस्ड बाइटच्या संस्थापक न्यूट्रिशनिस्ट अपेक्षा चांदूरकर, सांगतात, ” चव आणि आरोग्याचे फायदे टिकवून चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यावा.”चांदूरकर सांगतात, “चहा ब्रू करणे म्हणजे योग्य तापमानात चहा पावडर गरम पाण्यात उकळू न देता मिक्स करणे होय. कारण जर चहा पावडर पाण्यात उकळून घेतली तर चहा कडू होतो, त्यातील काही रासायनिक घटक नष्ट होतात.”
चांदूरकर पुढे सांगतात, “मसाला चहा जर खूप जास्त उकळत असाल तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.”

चांदूरकर यांनी चहाचे तापमान सांगितले आहे. काळ्या चहाचे योग्य तापमान सुमारे २००-२१२°F (९३-१००°C) असते, तर कडू चव टाळण्यासाठी ग्रीन टीचे तापमान १६०-१८०°F (७१-८२°C) असावे.
हर्बल चहा तयार करताना पाणी किती प्रमाणात उकळावे हे प्रकारानुसार अवलंबून आहे. चहाची चव टिकवण्यासाठी चहा पावडर योग्य प्रमाणात टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही चहाची चव वाढवण्यासाठी त्यात दूध, साखर आणि लिंबू मिसळू शकता.

Story img Loader