वारंवार पोटफुगी होणे, पोटात जडपणा जाणवणे आणि अवेळी शौचास जाणे या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी क्लिनिकमधील वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या तक्रारी आहेत. ग्लूटेन इन्टॉलरेंस असलेल्या लोकांमध्ये, पोट फुगणे किंवा मळमळणे यांसारखी लक्षणे ग्लूटेन खाल्ल्यानंतर काही तासांतच किंवा २४ तासांनंतरही दिसू शकतात. अनेक रुग्णांना ग्लूटेनयुक्त पदार्थ खाल्यास त्रास होत असल्याचा संशय असला तरी, तज्ञांच्या मते या स्थितीबद्दल अनेकदा गैरसमज होतो आणि आहारात बदल करण्यापूर्वी योग्य वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. एस. एल. रहेजा हॉस्पिटल – अ फोर्टिस असोसिएट येथील सल्लागार – गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक जीआय एंडोस्कोपिस्ट डॉ. साईप्रसाद लाड यांच्या मते, “ग्लूटेन-संबंधित लक्षणे अनेकदा नॉन-सिलियाक ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी (NCGS) शी संबंधित असतात.”
दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. लाड सांगतात की, “रुग्ण अनेकदा माझ्याकडे दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या पोटदुखीची आणि पोट फुगीची तक्रार घेऊन येतात. अनेकांना आतड्यांमध्ये अडथळा (bowel obstruction) येण्याची समस्या देखील जाणवते, विशेषतः जेव्हा ते ग्लूटेन असलेले काहीही खातात. ग्लूटेन हे गहू, बार्ली आणि राईमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे.”
ग्लूटेन इन्टॉलरेंस विरुद्ध सेलिॲक डिसीज (Gluten Intolerance vs. Celiac Disease)
डॉ. लाड स्पष्ट करतात की, एनसीजीएस (NCGS) हा सेलिॲक डिसीजपेक्षा वेगळा आहे. सेलिॲक डिसीज ही एक स्वयंप्रतिरोधक (autoimmune) स्थिती आहे, ज्यामध्ये ग्लूटेनमुळे लहान आतड्याच्या अस्तराला नुकसान पोहोचते. याउलट, एनसीजीएसमुळे रचनात्मक नुकसान होत नाही, परंतु तरीही त्याची लक्षणे जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकतात.
नगर रोड येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट, डॉ. विक्रम उत्तम पाटील दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट करतात की, “नॉन-सिलियाक ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी (ज्याला ग्लूटेन इन्टॉलरेंस असेही म्हणतात) जठरांत्र मार्गाच्या(Gastrointestinal tract) अस्तराला त्रास देऊन आणि पचनमार्गातील अन्न पचनाच्या प्रक्रियेत अडथळा आणून आतड्यांचे दीर्घकालीन विकार निर्माण करू शकते; तथापि, सिलियाक डिसीच्या विपरीत, या स्थितीमुळे स्वयंप्रतिरोधक प्रतिक्रिया सुरू होत नाही.”
ते पुढे सांगतात की,”गव्हाची ऍलर्जी ही एक वेगळी स्थिती आहे आणि त्यामुळे अंगावर पित्ताच्या गाठी उठणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी ऍलर्जीची तात्काळ लक्षणे दिसू शकतात. गव्हाची ऍलर्जी कमी प्रमाणात आढळते.
ग्लूटेन इन्टॉलरेंसमध्ये, ग्लूटेनच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये दाह वाढू शकतोत, परंतु सेलिॲक डिसीजमध्ये दिसणारा स्वयंप्रतिरोधक (ऑटोइम्यून) स्थितीमुळे होणारे आतड्याच्या अस्तराचे नुकसान होत नाही.
डॉ. पाटील म्हणतात की,”यामुळे Intestinal permeability वाढू शकते (‘Leaky Gut’) शौचास अनियमितता येऊ शकते आणि आतड्यातील सूक्ष्मजंतूंमुळे खाल्लेल्या अन्नाचे किण्वन होऊ शकते. “यामुळे व्यक्तीला गॅस आणि अस्वस्थता जाणवू शकते, ज्यामुळे पोट फुगणे आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.”
- गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, ग्लूटेन इन्टॉलरेंसकडे निर्देश करणारी काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- पोट फुगणे आणि पोटात गोळे येणे
- अतिरिक्त गॅस आणि वात येणे
- अतिसार किंवा बद्धकोष्ठता
- मळमळ आणि थकवा
- जेवणानंतर जडपणा किंवा अपूर्ण पचन
डॉ. पाटील पुढे असेही नमूद करतात: “ग्लूटेन इन्टॉलरेंस असलेल्या व्यक्तींना पचन अपूर्ण झाल्याचा अनुभव येतो, जो अनेकदा ग्लूटेनयुक्त जेवणानंतर जाणवतो.”
इरिटेबल बाऊल सिंड्रोमच्या (IBS) लक्षणांशी साधर्म्य असल्यामुळे, निदान करणे अनेकदा आव्हानात्मक असते.
निदान आणि स्व-उपचारांविरुद्ध खबरदारी (Precautions against self-diagnosis and self-treatment)
वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय स्वतःहून निदान करणे किंवा ग्लूटेन वर्ज्य करणे टाळावे, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. डॉ. लाड यांनी इशारा दिला आहे की,”वेळेआधीच ग्लूटेन-मुक्त आहार सुरू केल्यास सेलिॲक डिच्या चाचणीत अडथळा येऊ शकतो.”
डॉ. पाटील स्पष्ट करतात: “ग्लूटेन इन्टॉलरेंसचे निदान मुख्यत्वे इतर शक्यता वगळून केले जाते. सुरुवातीला, रक्ताच्या चाचण्या आणि आवश्यक असल्यास एंडोस्कोपीद्वारे सेलिॲक रोग आणि गव्हाची ॲलर्जी यांसारख्या स्थिती वगळल्या जातात.”
ते पुढे सांगतात की,”जेव्हा चाचण्यांचे निष्कर्ष नकारात्मक येतात, तेव्हा पुष्टीकरणासाठी डॉक्टरांच्या देखरेखीखालील एलिमिनेशन डाएट आणि त्यानंतर ग्लूटेन चॅलेंज चाचणी वापरली जाते, कारण एनसीजीएससाठी (NCGS) कोणतीही विशिष्ट प्रयोगशाळा चाचणी उपलब्ध नाही.
व्यवस्थापन आणि प्रतिबंध (व्यवस्थापन आणि प्रतिबंध)
उपचार निदानावर अवलंबून असतात. सेलिॲक डिसीजसाठी आयुष्यभर ग्लूटेन टाळण्याचा कठोर नियम आवश्यक असतो, तर एनसीजीएस (NCGS) असलेल्या रुग्णांमध्ये फक्त ग्लूटेनचे सेवन कमी करणे पुरेसे असू शकते. पोषक तत्वांची कमतरता टाळण्यासाठी आणि खाण्यापिण्याची नोंद ठेवण्यासाठी डॉक्टर आहारतज्ज्ञांची मदत घेण्याची शिफारस करतात.
आतड्यांच्या सुरक्षित आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी, तज्ञांच्या मते, पचनाची लक्षणे सतत जाणवत राहिल्यास त्यावर स्वतःच उपचार करण्याऐवजी नेहमी वैद्यकीय सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.
