How To Stop Overeating : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात घरच्या जेवणाऐवजी अनेकदा आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जेवण करायला जातो आणि मनाप्रमाणे जेवण मागवतो. अशा वेळी आवडते पदार्थ आपण नेहमीपेक्षा जास्त खातो; पण या सवयीमुळे आपले वजन वाढू शकते. त्यामुळे ही सवय कशी कमी करावी, यासाठी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत; पण त्यापूर्वी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने केवळ वजनच वाढत नाही, तर पचनाच्या समस्यासुद्धा निर्माण होतात.
त्याविषयी न्युट्रिशनिस्ट निधी शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर अतिप्रमाणात खाणे टाळण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. निधी शर्मा सांगतात –

१. जेवण करणे कधीही टाळू नका

जेवण करणे कधीही टाळू नका; पण प्रमाण मात्र १५ ते २० टक्क्यांनी कमी करा. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी थोडे खा. त्यामुळे तुम्हाला खूप भूक लागणार नाही. जर तुम्हाला कार्यक्रमात खूप भूक लागली, तर तेथील आवडीचे पदार्थ पाहून तुम्ही अतिप्रमाणात खाऊ शकता.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

२. तुमच्या आवडत्या पदार्थांपासून जेवणाची सुरुवात करा

तुम्हाला गोड आवडत असेल किंवा कोणताही पदार्थ आवडत असेल, तर त्या पदार्थांपासून जेवणाची सुरुवात करा. मुख्य कोर्स त्यानंतर खा.

हेही वाचा : अति प्रमाणात खाण्याची सवय आहे? वजन वाढू शकते, खाण्याची सवय अशी करा संतुलित

३. कमी कॅलरी असलेले पदार्थ

जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करीत असाल, तर तळलेल्या भाज्या, ग्रिल्ड पदार्थ जसे की पनीर टिक्का, तंदुरी चिकन इत्यादी पदार्थ आणि सूप प्या. गोड पदार्थ खाणे टाळा.

४. सावकाश जेवण करा

प्रत्येक घासाचा आनंद घ्या आणि सावकाश जेवण करा.

त्याशिवाय निधी शर्मा सांगतात, “लिंबू पाणी यांसारखे उपचार पचनसंस्थेची पीएच पातळी बदलण्यास मदत करतात आणि तात्पुरता आराम देतात; पण जे अन्न पचवायला मदत करीत नाही. उलट ते तुमच्या शरीरात फॅट्स जमा करतात.”

मुंबई येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल सांगतात, “कॅलरी कमी करण्यासाठी प्रमाणात जेवण केले पाहिजे. भरपूर प्रमाणात फायबरयुक्त अन्न खाल्ले पाहिजे. आहारात बीन्स, भाज्या, ओट्स व फळांचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही.”
याचबरोबर डॉ. पटेल सांगतात, “अतिप्रमाणात खाणे टाळण्यासाठी तुम्ही काय खावे, याकडे लक्ष द्या. प्रोटीनयुक्त आहार घ्या. आहारात जर प्रोटीन असेल, तर तुम्हाला फार भूक लागणार नाही.”