Pre Diabetes Expert Advice: मधुमेह हा आजार एक जागतिक आव्हान ठरले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मधुमेह असणाऱ्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह होण्यापूर्वी शरीर सूचना देते की, भविष्यात तुम्हाला मधुमेह होऊ शकतो, त्याला पूर्व-मधुमेह किंवा प्री-डायबिटीस, असे म्हणतात.

प्री-डायबिटिस ही एक स्टेज आहे, जी मधुमेहाविषयी सतर्क राहण्यास सांगते. तसेच, टाईप-२ मधुमेहाचा धोका रोखण्यास आणि आपल्या जीवनशैलीमध्ये महत्त्वाचे बदल करण्याची संधी आपल्याला देते.

प्री-डायबिटीसची समस् अनेकदा आनुवंशिक घटक आणि तुमची जीवनशैली कशी आहे, यावर अवलंबून असते. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारून, हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी करता येतो. आहार, व्यायाम, वजन नियंत्रण व नियमित काळजी घेतल्यामुळे आपण सुदृढ जीवन जगू शकतो.

हेही वाचा : Lower Back Pain : मासिक पाळीदरम्यान पाठदुखी कमी होण्यास किंवा टाळण्यास मदत करतील ‘हे’ सात उपाय? वाचा, डॉक्टरांचा सल्ला

दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील अँडोक्रायनोलॉजीचे प्रमुख डॉ. धीरज कपूर आणि क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट कनिक्का मल्होत्रा ​​यांच्या हवाल्याने प्री-डायबिटीसवर कसे नियंत्रण मिळवावे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

१. निरोगी आहाराला महत्त्व द्या

प्री-डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रक्रिया न केलेल्या पदार्थांचे सेवन करावे आणि पोषक समृद्ध आहार घ्यावा, असा सल्ला क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट या नात्याने कनिक्का मल्होत्रा यांनी दिला.

आहारात काय घ्यावे? फळे, भाज्या, धान्य, प्रोटीन्स आणि चांगल्या फॅट्सचा आहारात समावेश करावा

आहारात काय घेऊ नये? साखरयुक्त स्नॅक्स, गोड पेये, जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू नये.

संतुलित पौष्टिक आहार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो आणि स्वादुपिंडावरील ताण कमी करतो.

२. शरीराची हालचाल करा

इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल फायदेशीर ठरते.

डॉ. कपूर सांगतात, “वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यांसारखे व्यायाम आठवडाभरात १५० ते १८० मिनिटे करा.”

स्नायूचे आरोग्य चांगले राहावे म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. व्यायामामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.

हेही वाचा : “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” स्वत:च्या हळदीत मराठमोळ्या गाण्यावर नवरीचा धम्माकेदार डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले फॅन्स

३. वजन नियंत्रित ठेवा

डॉ. कपूर सांगतात की, जर तुमचे वजन जास्त असेल, तर ते वजन ५-७% कमी करण्याचे ध्येय ठरवा. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स सुधारू शकतो. तसेच आहारावर नियंत्रण ठेवून, रक्तातील साखरेची पातळी कमी करता येते. शारीरिक हालचाल किंवा व्यायाम अवश्य करा.

४. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवा

मल्होत्रा ​​सांगतात की, रक्तातील ग्लुकोजची तपासणी करा आणि नियमितपणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवा.

नियमित तपासणी केल्याने आहार, व्यायाम आणि इतर जीवनशैलीतील बदल रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करतात याविषयी माहिती मिळते. जीवनशैली सुधारण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

५. चांगली झोप घ्या आणि तणावमुक्त जीवन जगा

दोन्ही तज्ज्ञ सांगतात की, नीट झोप न झाल्याने आणि अति तणावामुळे शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स बिघडू शकतो.

रात्री सात ते आठ तास विश्रांती घ्या. नियमित ध्यान, दीर्घ श्वास किंवा योगा करा. उपचार घेऊन किंवा पूर्व-काळजी करून मधुमेह टाळता येतो; पण त्याचबरोबर आपले एकंदरीत संपूर्ण आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

Story img Loader