do you have wheezing during sleep : चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप या बाबी आवश्यक आहेत. आरोग्य चांगले असेल, तर दिवसभराच्या कार्यशैलीवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. जर झोप नीट झाली नाही, तर दिवसभर आळस येतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कामावर होतो. त्यामुळे रात्री सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा श्वास घेताना तुमच्या घशातून आवाज येतो का? जर येत असेल, तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली.

लक्षणे

झोपेत असताना तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

  • श्वास न घेता येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
  • सतत खोकला येणे. विशेषतः रात्री किंवा पहाटे पहाटे खोकला येणे.
  • छातीत घट्टपणा किंवा जडपणा येणे किंवा अस्वस्थता जाणवणे.
  • दिवसभर थकवा जाणवणे.
  • झोपताना खूप जोरजोराने घोरणे (स्लीप ॲप्नियाचे प्रमुख लक्षण).

हेही वाचा : हळद, काळी मिरी, दालचिनी अन् धणे; कोणते मसाले आरोग्यासाठी चांगले?

Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
do really fruits may be causing cold and congestion | What is the right time to consume fruits
फळे खाल्ल्याने सर्दी होते? जाणून घ्या, फळे कधी खावीत?
Find out what happens to the body if you drink lauki juice once a week during summer health benefits of doodhi lauki bottle gourd
आठवड्यातून एकदा दुधीचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या डॉक्टरांकडून…
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
ginger-lime benefits
आले-लिंबाच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात….
Heart Attack and Ice cream
Heart Attack : आईस्क्रीम खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात..
Hindenburg Research Updates in Marathi
Hindenburg Research : हिंडेनबर्गप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया, सेबी आणि माधबी पुरी बुचबाबत म्हणाले…

झोपेदरम्यान श्वास घेताना तुमच्या घशातून का आवाज येतो?

दम्याचा त्रास : जेव्हा वायुमार्गाच्या जवळपासच्या स्नायूंना सूज येते आणि वायुमार्ग लहान होतो तेव्हा व्यक्तीला खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घशातून आवाज येणे, अशी लक्षणे दिसतात.

सीओपीडी (Chronic Obstructive Pulmonary Disease) : सीओपीडी म्हणजे दीर्घ कालावधीसाठी श्वास घेण्यास अडचण निर्माण करणारा फुप्फुसांचा आजार होय. तंबाखूचा धूर किंवा इतर धोकादायक रसायनांचा फुप्फुसांवर परिणाम होतो; ज्यामुळे फुप्फुसांचा वायुमार्ग खराब होतो आणि श्वास घेताना अडचण येते.

हायपरव्होलेमिया : हायपरव्होलेमिया म्हणजे जेव्हा रक्तामध्ये जास्त प्रमाणात पाणी किंवा द्रव निर्माण होतो आणि रक्ताची पातळी कमी होते. जेव्हा हृदय शरीराच्या कार्यासाठी जास्त प्रमाणात रक्त तयार करू शकत नाही तेव्हा फुप्फुसांमध्ये द्रव पदार्थ वाढू शकतात; ज्यामुळे खोकला, श्वास घेण्यास त्रास व घशातून आवाज, असे त्रास जाणवतात. जर तुम्ही अशा स्थितीत झोपत असाल, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे गरजेचे आहे.

स्लीप ॲप्निया : झोपताना श्वास घेण्यास त्रास होण्यामुळे स्लीप ॲप्निया होऊ शकतो. झोपताना घोरणे हे स्लीप ॲप्नियाचे प्रमुख लक्षण आहे.

अ‍ॅलर्जी : धूळ किंवा अ‍ॅलर्जीक घटकांच्या संपर्कात आल्याने वायुमार्ग लहान होऊ शकतो; ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होऊ शकते.

लठ्ठपणा : लठ्ठपणामुळे झोपेदरम्यान शरीरातील अतिरिक्त फॅट्समुळे अडचण निर्माण होते. हे फॅट्स फुफ्फुसाभोवती जमा होतात; ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि घशातून आवाज येऊ शकतो. स्लीप ॲप्निया असलेल्या लोकांसाठी लठ्ठपणा आणखी घातक आहे. अशा वेळी श्वासाशी संबंधित आजारांसाठी CPAP म्हणजेच कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअर वे प्रेशर ही उपचार पद्धत वापरावी.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घेणे गरजेचे आहे?

जर तुम्हाला झोपेदरम्यान वारंवार घशातून आवाज येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होणे, सतत खोकला येणे इत्यादी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी करू शकतात; ज्यामुळे नेमकी समस्या कोणती आणि त्यावरील उपचार कोणते, हे तुम्हाला समजून घेता येईल.