केळी हे अनेकांचे आवडते फळ आहे, केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळ हे उत्तम फळ मानले जाते. पण तुम्हाला माहितेय का कच्ची केळी खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत कच्ची केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घ्या यामुळे आरोग्याला कसा फायदा मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कच्ची केळी खाण्याचे फायदे

आणखी वाचा: उलट चालण्याचे फायदे माहित आहेत का? कंबरदुखी, गुडघेदुखीवर ठरते सोपा उपाय; लगेच जाणून घ्या कारण

पचनक्रियेसाठी फायदेशीर
कच्च्या केळ्यामध्ये भरपूर फायबर असते. हे पचनक्रियेसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते
कच्ची केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आढळते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर
कच्ची केळी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कच्ची केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा: वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ‘या’ भाज्या; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर
केळ्यांमध्ये आढळणारे विटामिन बी६ मधुमेह आणि मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात ग्लुकोज रेग्युलेट करण्यास फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the amazing health benefits of raw banana can be beneficial in many ways pns
First published on: 07-12-2022 at 21:11 IST