Can garlic replace Metformin : सकाळी उपाशी पोटीवर लसणाच्या दोन कळ्या चावून खाल्ल्याने मधुमेह कायमचा बरा होऊ शकतो का? इंटरनेट आणि सोशल मीडियावर अनेकदा असा दावा केला जातो की, “लसूण खाल्ल्याने मेटफॉर्मिनसारख्या औषधांपासून कायमची सुटका मिळू शकते.”
मेटफॉर्मिन हे एक औषध आहे जे प्रामुख्याने टाईप २ मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दिले जाते. ते शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. पण या बाबतीत कोणी वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे का, की हे औषध धोकादायक आहे? मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील रुग्णांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की एक लहानसा निष्काळजीपणा त्यांच्या आरोग्यावर किती परिणाम करू शकतो. पारंपरिक औषधोपचारांमध्ये लसणाला फार पूर्वीपासून महत्त्वाचे मानले गेले आहे आणि काही संशोधनानुसार ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते. पण मधुमेहाच्या पूर्वस्थितीने ग्रस्त असलेली व्यक्ती(प्री-डायबेटिक रुग्ण) फक्त लसूण खाऊन मेटफॉर्मिन घेणे थांबवू शकते का?
प्री-डायबेटिक रुग्ण मेटफॉर्मिन बंद करून लसूण खाऊ शकतो का?
“प्री-डायबेटिक व्यक्तीने जर मेटफॉर्मिन घेणे थांबवून त्याऐवजी लसूण खाऊ शकतो का? असा प्रश्न एका वापरकत्याने Quora वर विचारला. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्सप्रेसने सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्समधील सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी लसणाबाबतचा हा गैरसमज दूर केला आणि सांगितले की,”लसूण मेटफॉर्मिन किंवा प्री-डायबिटीजसाठी दिलेल्या कोणत्याही औषधाची जागा घेऊ शकत नाही.
मेटफॉर्मिन कसे काम करते?
विशेष म्हणजे, मेटफॉर्मिन इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारून आणि यकृतातील ग्लुकोज उत्पादन कमी करून मदत करते. “त्याच्या परिणामांचा वैद्यकीय व्यावसायिकांकडून चांगला अभ्यास केला जातो आणि त्यावर देखरेख ठेवली जाते. लसणामुळे आरोग्यास काही फायदे मिळू शकतात, परंतु त्याचा परिणाम तितकासा विश्वसनीय नसतो.”
खरं तर, जीवनशैलीतील इतर बदलांकडे दुर्लक्ष करून किंवा मार्गदर्शनाशिवाय औषधोपचार थांबवून आहारात अधिक लसूण समाविष्ट केल्यास योग्य उपचारांना विलंब होऊ शकतो आणि टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो”.
लसूण मधुमेहाच्या औषधाऐवजी का घेऊ नये?
डॉ. घोडी स्पष्ट केले की, “प्री-डायबिटीज हे दर्शवते की, शरीराला इन्सुलिन रेझिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. निरोगी आहार, नियमित व्यायाम, वजन व्यवस्थापन, तणाव नियंत्रण आणि पुरेशी झोप यांसारख्या जीवनशैलीतील बदलांमुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते, परंतु लसणासारख्या एकाच पदार्थावर अवलंबून राहणे सुरक्षित किंवा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.”
सुपरफुड नव्हे जीवनशैलीत बदल करून औषधे होतील कमी किंवा बंद
प्री-डायबिटीज असलेले अनेक लोक कालांतराने औषधे कमी करू शकतात किंवा पूर्णपणे बंद करू शकतात, परंतु हे सहसा एखाद्या ‘सुपरफूड’च्या सेवनाने नव्हे, तर कायमस्वरूपी जीवनशैलीतील बदलांमुळे घडते. “वैयक्तिक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा फायबर, भाज्या, संपूर्ण धान्य, सुकामेवा, बिया आणि कमी चरबीयुक्त प्रथिने असलेला संतुलित आहार अधिक प्रभावी आहे,” असे डॉ. घोडी यांनी सांगितले.
चुकीच्या दाव्यांना बळी पडू नका
स्वयंपाकघरातील पदार्थांना “नैसर्गिक उपाय” म्हणून प्रोत्साहन देण्याचा कलही वाढत आहे. “लोकांनी या दाव्यांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. नैसर्गिक म्हणजे नेहमीच प्रभावी किंवा सर्वांसाठी सुरक्षित असेलच असे नाही.
लसणाच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम
काही लोकांमध्ये, लसणाचे अतिसेवन केल्याने आम्लपित्त, पोट फुगणे, रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत रासायनिक क्रिया होणे किंवा पोटाच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात,” असे डॉ. घोडी म्हणाले.
स्वतःहून मेटफॉर्मिन घेणे थांबवून त्याऐवजी लसूण नका
वैयक्तिक काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. “जर वजन कमी करणे, व्यायाम आणि आहाराने रक्तातील साखरेची पातळी सुधारली, तर डॉक्टर औषधांच्या गरजेवर पुनर्विचार करू शकतात. पण स्वतःहून मेटफॉर्मिन घेणे थांबवून त्याऐवजी लसूण खाणे ही चांगली कल्पना नाही,” असे डॉ. घोडी यांनी पुन्हा अधोरेखित केले.
लसणाकडे वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून नव्हे, तर तुमच्या जेवणातील एक आरोग्यदायी पूरक घटक म्हणून पाहा.
